Author: Saimat

चाळीसगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय कन्याशाळा (ज्यु.कॉलेज)मध्ये ‘ बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या अभियाना अंतर्गत लाभार्थींचा बक्षीस वितरण समारंभ दि.२२-२-२०२२ मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी मा.श्री.विलास भोई साहेब, रा.स.शि.प्र.मंडळ लि.चाळीसगाव या संस्थेचे सचिव बापूसाहेब मा.श्री.अरुण भिमराव निकम,व्हाईस चेअरमन दादासाहेब मा.डॉ.श्री.संजय गोपाळराव देशमुख, सहसचिव आबासाहेब मा.श्री.संजय रतनसिंग पाटील, विषयतज्ञ मा.सौ.सुमनताई पाटील, शाळेच्या प्राचार्या मा.डॉ. सौ.साधनाताई निकम,उपप्राचार्या मा.सौ.कल्पनाताई देशमुख व पर्यवेक्षक दादासाहेब मा.श्री.विजय पवार हे उपस्थित होते सर्व प्रथम ईशस्तवन व स्वागतगीत कु.अनुराधा कसबे ईने सादर केले त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.विलास भोई…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेकॉडवरील गुन्हेगाराला भुसावळ शहरातून एक वर्षेसाठी हद्दपार केले आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलीस हद्दीत राहणारा आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल राजू टाक रा. जामनेर रोड, वाल्मिक नगर, भुसावळ याच्याविरोधात मार्च २०१९ मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्याकडून मार्च २०१९ मध्ये पोलीस कायदा कलम ५६ अन्वये हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून प्राथमिक चौकशीकामी हा अहवाल उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ यांच्याकडे देण्यात आला. गुन्हेगार विशाल राजू टाक याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याची चौकशी केल्यानंतर प्राथमिक चौकशी अहवाल प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आला.…

Read More

दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले जात असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू, असे युक्रेनने सांगितले आहे. युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिले असून त्यांची पाच लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला. युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती युक्रेनने संयुक्त राष्ट्र संघाला केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताकडेही मदत मागणार आहे. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी, अशी विनंती युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा मोदींना भेटून करणार आहेत. ते म्हणालेत की, “भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. आम्ही पंतप्रधान नरेंद्र…

Read More

मुंबई : चांगल्या आरोग्याकरिता झोपणे जितके आवश्यक आहे. तितक्याचं प्रमाणात झोप ही अतिशय महत्त्वाची आहे, आणि झोपण्याची शैली. होय, आपल्याला झोपण्याची दशा आणि दिशा ठरवतं असते, आपले आरोग्य. तसे तर लोकं स्वत:ला आरामदायक वाटणार्‍या स्थितीत झोपणे  पसंत करत असतात. पण डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत. बघू या काय आहे ते फायदे -डाव्या कुशीवर झोपणे आपल्या आरोग्याकरिता फायद्याचे आहे. यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्यामुळे हृदय योग्य पद्धतीने काम करत असते. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असते. 

Read More

यावल: प्रतिनीधी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या आदेशाने व संजय दीक्षित राज्य उपाध्यक्ष विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. यावेळी बैठकीत एक मताने रावेर लोकसभा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी यावलचे चेतन अढळकर यांची निवड करण्यात आली . संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्या आदेशाने व राज्य उपाध्यक्ष संजय दीक्षित विभागीय अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल सर्व समाज बांधवांच्या एक मताने रावेर लोकसभा पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी यावरचे चेतन अढळकर यांची निवड करण्यात आली चेतन अढळकर यांची निष्ठावान कर्तव्यदक्ष व जुने कार्यकर्ते म्हणून ओळख आहे . ते हे समाज संघटन करण्यात करण्यासाठी सदैव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते शिरसोली रोडवर असलेल्या सेंट टेरेसा स्कूलजवळ भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बापू दौलत सोनवणे (वय ४५) आणि त्यांचा सहकारी चंद्रकांत विठ्ठल मोरे दोन्ही रा. दुध फेडरेशन, जळगाव हे दोघे आचारीचे काम करतात. २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी (एमएच १९ एमएच ९३४०)ने शिरसोलीकडून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बापू सोनवणे आणि चंद्रकांत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा यांच्या 146 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला निस्वार्थ सेवा प्रतिष्ठाण, यांच्या संयुक्त उपक्रम जळगाव येथिल मेहरून परिसर व तंत्या भिल वस्तीत शाळाबाह्य व कचरावेचक मुले यांना आपले घर व परिसर स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छतेसाठी लाईफबॉय साबण, पेपसोडन्ट टूथ पेस्ट, टूथ ब्रश व बिस्कीटचा पुडा असे किट वाटप करण्यात आले. गाडगेबाबा युवा विचारमंचचे अध्यक्ष गणेश सपके, जिल्हा लॉड्री असोशियशनचे अध्यक्ष मनोज निंबाळकर, नितीन पाटील, जयंता वाघ, भरत जाधव, प्रवीण लोखंडे यांचे सहकार्य लाभले सर्व मुलांना स्वच्छतेची शपथ नीलेश निंबाळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक निस्वार्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीष शिरसाळे यांनी केले. दीपक खंगार यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 मार्च,2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. व प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Read More

धुळे : प्रतिनिधी वाईट विचारांच्या लोकांचा दृष्टिकोन कसा ओळखून घ्यायचा, हे समजावत समाजातील वाईट विचारांविरुद्ध आजची सशक्त स्त्री आपण बनूया असे आवाहन युवासेनेच्या शिवानी पवार यांनी केले. त्या येथील चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यावर प्रशिक्षण शिबीरा दरम्यान मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कोरे कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या शितल देवरूखकर-शेठ यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे संभाव्य लैंगिक शोषाण रोखण्याकरता अथवा बाल विनयभंगाच्या घटनांना पायबंद घालण्याकरता ” चांगला – स्पर्श – वाईट – स्पर्श ” या अतिशय गंभिर समस्येवर समुपदेशनाच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्याची व्यापक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला नागरिकांनी मारहाण  केल्याचा  प्रकार बुधवारी रात्री  घडला. या प्रकरणी ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.अल्पवयीन मुलीने नातेवाइकांना ‘त्या’ व्यक्तीची माहिती दिल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर रात्री येथे त्या व्यक्तीला नातेवाइकांसह नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलीसपाटील शरद पाटील यांनी मोठ्या जिकिरीने त्या व्यक्तीला जमावातून कसेबसे वाचवून औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

Read More