जळगावः प्रतिनिधी येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभे तर्फे वन्य प्राणी पासुन शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासठी धरणे आंदोलनाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. विखरण चारेटकी तालुका एरंडोल परिसरातील शकतकऱ्यांचय्ा पिकांची नासाडी रोही नीलगायी रानडुक्कर करीत असतात ती थांबवावी, वनखाते जमीन ते शेतकऱ्यांची जमीन दरमय्ान तारेचे कुंपण तयार करवे व वन्य प्राण्यांना पाण्याची चाऱ्याची व्यवस्था करून त्यांचा बंदोबस्त करावा… नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांचे नुकसानीचा पंचनामे करून एमएसपी प्रमाणे नुकसान भरपाई द्या आमदार चिमणराव पाटील यांनी आमदार निधीतून शेतकऱ्यानां मदत करावी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कौन्सिल वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दि.25 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.…
Author: Saimat
भुसावळ : प्रतिनीधी येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी .ओ .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील एनमुक्टो प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी प्राध्यापक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली . अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा .ए. डी. गोस्वामी, उपाध्यक्ष प्रा . एस पी झनके, सचिव प्रा. प्रमोद अहिरे यांची वर्णी लागली. यावेळी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपप्राचार्य प्रा. एस. व्ही .पाटील तर निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. एस . व्ही. पाटील यांनी सभागृहासमोर कार्यकारिणी सदस्यांची पदे वाचून दाखवली व सभागृहाला अधोरेखित केले की आपल्या महाविद्यालयाची परंपरा निवडणूक घेण्याची नाही. ज्या प्राध्यापकांना स्वेच्छेने कार्यकारिणीवर काम करायचे आहे. जे…
मुक्ताईनगर : प्रतिनीधी संत चांगदेव मुक्ताबाई महाशिवरात्री यात्रौत्सव एक वर्षाच्या खंडानंतर आज सकाळी ध्वजपूजन करून यात्रौत्सवास आरंभ करण्यात आला. दरम्यान, संत मुक्ताबाई संस्थान व कोथळी ग्रामपंचायत, मुक्ताईनगर नगरपंचायतीची यात्रौत्सवाची तयारी पुर्णत्वाकडे आली असून पाळणे, खेळणी आदि दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. उद्या दिंड्या परिसरात दाखल होतील. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली गुरू शिष्य जोडीचे अतुट बंधन असलेली संत चांगदेव – मुक्ताबाई माघवारी महाशिवरात्री यात्रा एक वर्षांच्या खंडानंतर गजबजणार असून यात्रेची सूरूवात संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुळमंदिरात संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अँड. रविंद्र पाटील व विश्वस्त मंडळाचे हस्ते व भाविक मान्यवरांचे उपस्थितीत शुक्रवारी आज सकाळी 10 वा. ध्जजपूजन करण्यात आले. संत मुक्ताबाई संस्थानने…
मुंबई : प्रतिनीधी शिवसेनेने अग्रलेखात म्हटले की, नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला तसा अंतही झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे काम करत आहेत. आपल्या राजकीय मालकांचे बेकादेशीर हुकूम मानत आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडी नावाच्या नाझी फौजा पोहचल्या. 2003 च्या एका प्रकरणात त्यांना अटक केली . 2003 मध्ये मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. तो संबंध दाऊदशी जोडून त्यांच्यावर मनी लाँडरिंगपासून टेरर फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले. असा हल्लाबोल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केला आहे. राज्यात भाजपचं सरकार येऊ नये ही श्रींची…
बीड : प्रतिनिधी बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत . बीडच्या जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत . सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमींची नावे आहेत . बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सतीश क्षीरसागर याच्या पायाला गोळी लागली. फारुक सिद्दीकीच्या पायाला गोळी चाटून गेली आहे . हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे
जळगाव ः प्रतिनिधी ‘ब’ सत्ता प्रकार व अन्य कोणाताही सत्ता प्रकार यामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीचे भुगवटादार वर्ग 1 या धारणाधिकारामध्ये रूपांतर करण्यासाठी एका वर्ष मुदत वाढ द्यावी अश्या आशयाचे निवदेन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे यांनी मुंबई येथे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ‘ब’ सत्ता प्रकारातील निवासी जागा या गोरगरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या आहेत. त्यामुळे नजराणा भरण्यासाठी शहरातील एक वर्ष मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी काँग्रेस महानगराध्यक्ष श्यामकांत तायडे यांनी लावुन धरली त्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवेदन अभ्यावुन मान्यता देण्याचे आश्वासन दिले व सकारात्मकता…
मुंबई : प्रतिनिधी काल झालेल्या जोरदार पडझडीनंतर आज सकाळी भारतीय शेअर सावरलाय. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी काल निम्मं नुकसान भरुन काढलंय. निफ्टी सध्या जवळपास ४०० अंकांनी वधारलाय तर सेन्सेक्स सुद्धा जवळपास 1600 अंकांनी वर आलाय. कालच्या सगळ्याच दिग्गज कंपन्यांचे शेअर अगदी कमी किंमतीत उपलब्ध झाले होते. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1600 अंकांनी वाधारून 56165 अंकांवर पोहचला तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी 400हून अधिक अंकांनी वाधारून 16735 अंकावर पोहचले. त्यामुळे आज सकाळीच गुंतवणूकदारांनी अक्षरशः झडप घालून शेअर्स विकत घेण्यास सुरुवात केलीय. रिलायन्स एसबीआय, आयसीआयसीआय, हिंडाल्को, टाटा स्टील, टीसीएस अशा बड्या कंपन्यांचे समभाग साधारण तीन टक्के वधारलेआहेत.
मुंबई : प्रतिनीधी ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते रडारवर आले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेच्या नेत्याच्या घरावर आणि निकटवर्तीयांकडे आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. विशेष म्हणजे आयकर विभागाच्या टीमने स्थानिक पोलिसांची मदत न घेता सीईएसएफ या केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला सोबत घेऊन या धाडी टाकल्या आहेत. शेल कंपन्यांमधील गुंतवणूक, कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप, जवळपास १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि हे पैसे युएईकडे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील वर्षी सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील डिसेंबर २०२१ मध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळासाठी शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यासाठी ठोक तरतूद (न्यायालयीन प्रकरणे ) अंतर्गत २५० कोटी रूपयांची तरतूद मंजूर केली होती. तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा व तापी पाटबंधारे विकास महामंडळाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार यावर्षी 250 कोटी निधीची ठोक तरतूद ही आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्यता देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित करून जलसंपदा विभागाला लेखी स्वरूपात मागणी करून साकडे घातले. दरम्यान, यावर कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.…
जळगाव: प्रतिनिधी शेतकरी हा समाजाचा आत्मा असून शेती हा त्यांचा श्वास असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शिवारांना शेत रस्त्यांनी जोडण्याचे व्रत आपण हाती घेतले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील नांद्रा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी गावाच्या चौफेर विकासासाठी आपण प्रयत्नशील असून जनता हीच आपली जात आणि कामे हेच आपले कर्म असल्याचे नमूद केले. यामुळे आपल्याला सातत्याने काम करण्याची प्रेरणा आणि उर्जा मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच परिसरातील सर्व रस्ते दर्जेदार बनले असल्याने तरूणांनी येथून कमी वेगाने दुचाक्या चालविण्याचे आवाहन देखील केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील नांद्रा…