साईमत जळगाव प्रतिनिधी सरस्वती विद्या मंदिर येथे १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ पितृ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा न करता विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योग्य ते संस्कार घडावे योग्य संदेश जावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. पालकांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. पालक आणि विद्यार्थी देखील भारावून गेले. ज्योती पतंगे, दूसाने ताई, कविता चौधरी, अनिता पाटील ,गोरख बाविस्कर, शुभम दुसाने, वैष्णवी पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापिका नीलिमा भारंबे, सुदर्शन पाटील ,वैशाली बाविस्कर दिपाली जगताप , सीमा जोशी अनिता शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.तर प्रोत्साहन…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी मनोरंजन,पानाफुलांवर लिहिलेल्या कविता ह्या क्षणिक आनंद देतात व काळाच्या प्रवाहात लुप्त होतात. परंतु “सलाम” पुस्तकातील कविता ह्या देशभक्ती, सामाजिक भान जागृत करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या कधीही नष्ट होणार नाहीत, सलाम कायम अजरामर राहतील, अशा शब्दात प्रसिद्ध कवयित्री तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा माया धुप्पड यांनी “सलाम” पुस्तकाची प्रशंसा केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नुकताच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह सलाम प्रकाशित करण्यात आला.अल्पवाधित पुस्तक महाराष्ट्राभर लोकप्रिय झाला.”सलाम” पुस्तकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. सलाममध्ये कवितांचा समावेश असलेल्या काही कवींचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व सलाम पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला.…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरण होती. त्याची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. केळी पीक विम्या बाबत 2 फेब्रुवारी रोजी विविध संघटनाकडून मोर्चा काढला होता. त्याअनुषंगाने ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, मुमराबाद कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, बाळासाहेब बाळके, अभिनव माळी, भरत वारे व डी.बी. लोंढे,…
साईमत जळगाव प्रतिनिधी एका व्यक्तीने ठरवल्यास तो आठ जणांना जीवदान देऊ शकतो त्यासाठी नेत्रदान,त्वचा दान,अवयव दान आणि देहदान करण्याचा संकल्प करावा असे आवाहन कवयित्रीबाई बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी यांनी केले. नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आली. या निमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिक ते आनंदवन अशी १४३० कि.मी. ची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्रा माहेश्वरी आपल्या भाषणात…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्विक हेल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा पुरस्कारात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुण्यात झालेल्या एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण झाले. क्विक हेल फाउंडेशन आणि विद्यापीठातील संगणक शास्त्र प्रशाळा यांच्यात सामंजस्य करार झाला असून या करारान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रशाळेच्या ३८ विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती केली. जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जवळपास १०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये आणि दहा हजार सामान्य नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आले. सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आल्याबद्दल सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड २०२४ चे…
साईमत जळगाव प्रतिनिधी दि. १४ फेब्रुवारी तसा व्हॅलेंटाइन-डे(प्रेम दिवस) पण उज्ज्वलस्प्राउटर गेल्या २१ वर्षांपासून म्हणजेच २००४ पासून हा दिवस “आजी-आजोबा” दिवस म्हणून विविध पद्धतीने तसेच विविध ठिकाणी साजरा करत असतो, जसे कि मंदिरात, वृद्धाश्रमात आणि शाळेत. यावर्षीचा आजी-आजोबा दिवस हा शाळेत मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला. आजच्या आजी-आजोबा दिवसाचे उद्घाटन जमलेल्या काही निवडक आजी-आजोबा तसेच प्रशासकीय अधिकारी स्वप्नील बोरसे तसेच समन्वयक सुनयना चोरडिया यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी- आजोबांनकरिता बहारदार नृत्य, गीते तसेच कविता सादर केल्या. आजी-आजोबांच्या मनोरंजना करिता विविध खेळ ठेवण्यात आले होते. सर्व खेळांमध्ये सर्व उपस्थित आजी-आजोबानी उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जवळपास २०० आजी…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय स्काऊट गाईड शिबिर उत्साहवर्धक व निसर्गरम्य वातावरणात उत्साहात झाले. शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. या प्रसंगी गुरुकुल विभाग प्रमुख शशिकांत पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्काऊट म्हणजे काय ? शील, कौशल्य आणि शिस्त यावर रवींद्र सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड शिक्षिका सुरेखा शिवरामे व नंदिनी टाकणे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध व्यायाम प्रकार करून घेतले. त्यात व्यायाम प्रकारात नंदिनी टाकणे यांनी विद्यार्थ्यांकडून ‘एक होता डोंगर’ या कृती गीतावर काही कृती करून घेतल्या. विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगण्यात आला. सांकेतिक खुणा,…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील डोहोळे परिवारातर्फे नाशिक येथील सप्तशृंगी गडावरील देवीला दर वर्षीप्रमाणे या वर्षीही मकर संक्रांत पर्व काळात अनघा अजय डोहोळे यांनी तयार केलेल्या हलव्याच्या अलंकाराची सेवा अर्पण करण्यात आली . या वर्षी प्रथमच पारंपरिक दागिन्यामध्ये देवीला घालण्यात येणाऱ्या सोन्याचा पुतळा हार याची हलव्याच्या पुतळा हार तयार करून प्रतिकृती बनवण्यात आली.याची उंची अडीच फूट होती व भव्य असा ८ फुटाचा पद्म हार बनविण्यात आला. त्याच बरोबर तीन फुटाचे ठसठशीत असे हलव्याचे मंगळसूत्र बनविले होते. अडीच फुटाचा कंबरपट्टा. असे भव्य अलंकार बनवून देवीला अर्पण केले. यावेळी अरुण जोशी, जयश्री जोशी, उषा डोहोळे, शेखर डोहोळे यांची उपस्थिती होती.
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालयात इयत्ता १० वी च्या विद्यार्थी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय घोष यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकरजी गोरे , मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला शालेय परिसरात नव्याने तयार केलेले सायन्स पार्क, गणित प्रयोगशाळा तसेच नुतनीकरण करण्यात आलेले गुरुकुल कार्यालय, ग्रंथालय आणि जीव- भौतिक प्रयोगशाळेचे ओपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी आपल्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि. १४ फेब्रुवारीला होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांनी हे निमंत्रण अशोकभाऊ जैन यांना प्रत्यक्ष येऊन सन्मानपुर्वक दिले. अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान केली होती. मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे.…