आचार्य चाणक्य यांची धोरणे कोणत्याही व्यक्तीला बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जीवनात त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने तुम्ही आनंदी आणि समृद्ध होऊ शकता. चला तर जाणून घेऊयात अशी संकेत ज्याद्वारे घरातील समृद्धी संपते आणि आर्थिक संकट सुरू होते. ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही. देवी लक्ष्मी येत नाही. पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे घर प्रसन्न राहते. त्यामुळे अचानक पूजेपासून दूर राहणे आर्थिक संकटाचे कारण बनू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की, घरातील वाद हे कोणत्याही कुटुंबासाठी शुभ नसतात. ज्या घरात मारामारी, भांडणे, कलह असतात त्या घरात गरिबी येते. मारामारी यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. कोणतेही काम करावेसे वाटत नाही.…
Author: Saimat
मुबई : प्रतिनिधी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारत देशात आणण्याकरिता केंद्र सरकारने मोहिम राबवली आहे. या भागमध्ये, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन येणारे दुसरे विमान आज पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी येथील विमानतळावर युक्रेन मधील नागरिकांचे गुलाबाचे फुल देऊन यावेळी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चेमध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या अगोदर बुखारेस्ट येथून २१९ लोकांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये आले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टमधून २५० भारतीयांना…
चोपडा : प्रतिनिधी शहरातून जाणाऱ्या धरणगाव – चोपडा रस्त्यावर आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असलेले आयसर वाहन त्यामागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होवून या अपघातात जागीच एकाच कुटूंबातील आई व मुलगी मयत होवून वडिल व मुलगा जखमी असल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की, चोपडा शहरातून धरणगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आयसर धरणगावच्या दिशेने जात असतांना आयसरच्या मागे दुचाकी होती, यावेळेस दुचाकीस्वार सरळ जात असतांना आयसरने रस्त्याच्या बाजूला वळत असतांना मागून येणारी दुचाकी आयसरच्या खाली कोसळली. या अपघातात उज्वला जगदीश मोतीराळे (वय 37) व नेहा जगदीश मोतीराळे (वय 12) या आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तर दुचाकी चालक…
जळगाव : प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनीटांनी जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते लागलीच जैन हिल्सवर दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या जळगाव दौ-यावर आले आहेत. उद्या ते कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात भेट देणार आहेत. जळगाव विमानतळावर आगमन प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,…
रावेर : प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदरसंघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या खिरोदा शेती शिवारातील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने केळी बागायती धोक्यात आली होती. या ट्रान्सफॉर्मरवरून वीज पुरवठा असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम आमदार चौधरी यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. मात्र चौधरी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन व्यथा मांडली. खडसे यांनी तत्काळ वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विनंती केली. त्यामुळे २० दिवसांपासून पाण्याविना कोमेजून जाणाऱ्या केळी बागा वाचल्या आहेत. खिरोदा येथील फैजपूर रस्त्यावरील शेती शिवारातील शेतकऱ्यांची ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे फरफट होत होती. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यास…
जळगाव : प्रतिनिधी युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय आम्बेसीने पत्रक काढून पोलंडकडे जाण्याच्या सूचना दिल्यानंतर जवळपास युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीनशे विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर तीस किलोमिटरचा प्रवास करत पोलंडच्या बॉर्डर कडे पायीच चालून प्रवास केला असता सहा ते सात किलोमीटर बार्डरआधीच थांबवून पोलंडकडे जाण्यासाठी बंदी आणली आहे. सदर ठिकाणची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः तीन अंश सेल्सिअस तापमान आहे. तिन दिवसापासून अंगावरच्या कपड्यावर असताना या ठिकाणी विद्यार्थी अतिशय अडचणीत आलेले आहेत भारतीय आम्बेसिसने काढलेल्या पत्रकात स्पष्ट नमूद केले असतानाही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी अडवले जात आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे अतिशय हाल होत आहेत. होस्टेलही खाली करण्यात आल्यानंतर बँका बंद…
उरुळीकांचन: राष्ट्रीय अरोग्य अभियान ,महाराष्ट्र अरोग्य विभाग ,जिल्हा परिषद व प्राइमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन सहकार्याने लसीकरण करण्यात आले.ह्या लसीकरणाचा शुभारंभ उरुळीकांचन ग्रामपंचायत सदश्या स्वप्नीश्या अदित्य कांचन ह्यांचे शुभ हश्ते झाला .ह्या प्रसंगी जेस्ठ समाजसेवक ,प्रव चनकार डॉ रविंद्र भोळे ,शिवानी म्हस्के सी एम ओ ,मीरा लींबोने अंगणवाडी सेविका,मक्ता डोके अंगणवाडी मदतनिस हे उपस्थीत होते व लसीकरन दोनसे वीस बालकांना करण्यात आले.ह्या मोहिमेला डॉ सुचिता कदम मुख्य वैद्यकिय अधिकारी ,डॉ संदीप सोनवणे वैध्यकीय अधिकारी प्राइमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन ह्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.डॉ रविंद्र भोळे गेली तिस वर्षे पासुन अरोग्य विविध योजना राबविण्यसाठी समर्पित भावनेने कार्य केलेले आहे.
यावल : प्रतिनिधी कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे सायंकाळी घडली. खून करणारा संशयित पती हा स्वत:हून पोलीसात जमा झाला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) रा. थोरगव्हाण ता. यावल जि.जळगाव ह्या पती प्रकाश पांडूरंग पाटील, विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव येथे कामासाठी गेला होता. तर लहान मुलगा एका गल्लीत वेगळा राहतो. त्यामुळे घरात…
बोदवड प्रतिनिधी सुहास बारी येथील कोलाडी ग्रामपंचायत येथे बुद्धवासी प्रा.प्रतापराव रामदास पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांच्या स्मरणार्थ शवपेटी भेटकोल्हाडी तसेच पंचक्रोशीतील नागरिक नोकरी व्यवसाय करिता आपल्या गावापासून दूर उदरनिर्वाह करण्याकरिता बाहेरगावी असतात या धावपळीच्या जीवनात आज आपण आपल्या परी जणांचे अंत्यदर्शन घेऊ शकत नाही याकरिता बुद्धवासी प्रा. प्रतापराव रामदास पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त शव पेटी कोल्हाडी ग्रामपंचायतीला करण्यात आली यावेळेस शव पेटी भेट देताना उपस्थित कमलाबाई प्रतापराव पवार, मनीष कुमार प्रतापराव पवार, रणधीर प्रतापराव पवार, ऋषिकेश प्रतापराव पवार, पवन मनोहर बागुल, शुभम तायडे, शुभम मनीष कुमार पवार, प्रतीक रणधीर पवार व भेट स्वीकारतांना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच वनीता सोपान…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज रोजी सकाळी ८.३० वाजता राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. यावेळी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाभरात पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रविवारी सकाळी पालकमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील, जि. प. चे आरोग्याधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, शल्यचिकित्सक कार्यालयातील प्रशासन अधिकारी डॉ. संदीप पाटील, बाह्य…