Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते संजय राऊतांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना राऊतांनी ही पत्रकार परिषद घेतलीय. यात संजय राऊतांनी अनेकांची नावं घेतली आहे. हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना यात जितेंद्र नवलाणी हे नाव सर्वात महत्वाचे आहे, असा उल्लेख केला आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलाणी असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव राऊतांनी सांगितलं आहे. यात 60 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसुल केलेत. या कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्याची ईडीनं चौकशी केली. त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलाणी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्याप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हाशाखे तर्फे निषेध करत राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणा  देण्यात आल्या. भाजपाचे केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाचा  व व्यवसाया बद्दल अपमान केला आहे. त्यांचा वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखे तर्फे उप जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देऊन ना. रावसाहेब दानवे यांचा राजीनामा किंवा माफीनामा घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे , महिला…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी कै.बाबुरावजी काळे स्कूल, सोयगांव येथे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या पातळीवर शालेय विद्यार्थिंनींनी कार्यक्रम आयोजित केला यामध्ये विद्यार्थीनींनी शिक्षेकेचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली. त्याच प्रमाणे ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव सर व प्राध्यापक डॉ. डि.आर.पवार सर यांनी महिलांच्या कर्तुत्वावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर एलीस, शितल काटोले, मनिषा पाटील, अंजली कथलकर, शितल पवार, विद्या पाटील, आशा पंडित, पुजा सोनुने, पुजा इंगळे, मुश्ताक शहा, संजय डापके, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पाटील यांनी केले तर आभार…

Read More

मुंबई : प्रतिनिधी दुचाकी विक्रीला ग्रहण लागले आहे. दुचाकी व्यवसायात रिव्हर्स गिअर पडला आहे. देशातील पहिल्या पाच दुचाकी वाहनांची फेब्रुवारीत एकूण विक्री 10 लाख 74 हजार 303 वाहनांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या सहा महिन्यांचा डेटा गोळा केला तर देशात जवळपास 7 लाख कमी दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकी विक्रीत कमालीची घसरण वाहन उद्योगासाठी घातक ठरत आहे. कोरोनाकाळात कसेबसे तग धरणाऱ्या ऑटो सेक्टरला सेमीकंडक्टर आणि चिप तुटवड्याचा फटका सहन करावा लागला. आता विक्रीत घट झाल्याने वाहन उद्योगाचा ताप वाढला आहे. देशात बेरोजगारीचा दर 8.35% उच्चांकी पातळीवर आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत…

Read More

जळगाव – प्रतिनिधी  साहित्यातून समाजमनाचे दर्शन घडत असते तर आजच्या बालकांमधून उद्याचा समाज घडत असतो. त्यामुळे बालमनावर संस्कार घडवता घडवता समाजाचे दर्शन घडविण्यासाठी आपल्या प्रतिभाशील लेखणीला सतत तेवत ठेवणार्‍या शिक्षक साहित्यिकांचे कार्य अभिमानास्पद आहे. अशा शिक्षक साहित्यिकांकडून सातत्याने संस्कारशील साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी व्यक्त केली. जळगाव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिनानिमित्त मराठी-विज्ञान सृजनोत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, साहित्यिक अ. फ. भालेराव, मनोहर आंधळे, डॉ. चंद्रकांत साळुंखे, विद्या…

Read More

नागपूर : प्रतिनिधी फक्त एक दिवस महिलांचा साजरा करून चालणार नाही. राज्यात वर्षभरात महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडतात. कोविड सेंटरमध्येही महिलांवर बलात्कार झाले. गडचिरोलीत चित्रपटात काम देतो म्हणून अनेक मुलींना पळवून नेले. राज्यातील अनेक जिल्हयात महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांचा पाढा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाचला. नागपुरात एमडी ड्रग्ज देत दोन दिवस मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका महिलेला अत्याचाराचा गुन्हा दाखल प्रकरणात तीस लाखांची लाच मागितली. काही ठिकाणी पोलीस महिलांच्या जीवावर उठलेत, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला. राज्यात वसूल करणारे, बलात्कार करणारे, भूखंड हडप करणाऱ्यांना…

Read More

मुंबई: प्रतिनिधी युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. आयकर विभागाने एकाच दिवशी दोन शिवसेना नेत्यांच्या घरांवर छापेमारी केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर, आयकर विभागाच्या धाडीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा,…

Read More

प्रतीनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता , भडगाव येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाच्यावतीने आज भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.अविनाशराव आदिक साहेब,पक्ष निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव हे होते तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार दिलीप ओंकार वाघ होते. जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र भैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मा.वंदनाताई चौधरी,पाचोरा न.पा.गटनेते नानासो संजय वाघ,जिल्हा कार्याध्यक्ष मा.विलास पाटील,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र मानकरी मा.मनोराज पाटील, जिल्हा प्रवक्ते मा. योगेश देसले,मा.एजाज भाई मलिक, युवती जिल्हाध्यक्ष मा.कल्पिताताई पाटील,मा. दिव्या भोसले,मा.अरविंद चितोडिया,जिल्हा उपाध्यक्षा मा.योजनाताई पाटील, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक डॉ.संजीव पाटील,जिल्हा परिषद सदस्य मा.स्नेहा ताई…

Read More

यावल (सुरेश पाटील) दि. 7 मार्च 2022 रोजी रात्री पासून किरकोळ पाऊस सुरू झाला या पावसात यावल शहरातील तिरुपती नगर,फालकनगर, एस.टी.स्टँड परिसर व इतर काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तर यावल चोपडा रोडवर वढोदे गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर साकळी जवळ आज दि.8 रोजी सकाळी नदीवरील पुलावर पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.किरकोळ पावसामुळे वीजपुरवठा खंडित आणि पावसाचे पाणी पुलावर साचुन असल्यामुळे तसेच कामांमध्ये टक्केवारीचे प्रमाण वाढल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता उघड झाली आहे.अधिकारी कर्मचारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा आरोप सुद्धा नागरिकामधून होत आहे.

Read More