जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील हुडको येथे आज रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास एका ४० वर्षीय इसमाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०, रा. शिवाजी नगर) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. सोमवारी मुसेफचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे.…
Author: Saimat
जळगाव- जिल्हा पोलिस दलातर्फे तरंग महोत्सवानिमित्त चला हवा येवू दया चा चमू जळगावात आला असता. या कलावंत चमूने वाघूर धरणाजवळील परेश हॉलिडे रिसोर्टला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाऊ कदम, भरत गणशपुरे, सागर कारडे, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे यांचे स्वागत करतांना ‘साईमत’ चे संपादक प्रमोद बऱ्हाटे, लोकहित दर्पणच्या संपादीका सुरेखाताई बऱ्हाटे, परेश हॉलिडे रिसोर्टचे संचालक परेश बऱ्हाटे, सुप्रिया बऱ्हाटे आदी. (छाया ः योगेश चौधरी)
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 31 मार्चपर्यंत तब्बल 95.25 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. निधी खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात युद्धपातळीवर कामे पुर्ण केली आहेत. त्यामुळे यंदा शासनाकडे निधी परत जाण्याचे प्रमाण घटले आहे. 536 कोटी 5 लाख 59 हजार रुपयांपैकी 510 कोटी 59 लाख 65 हजार रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. या कामांमध्ये ग्रामीण रस्ते, फर्निचरसह ग्रामपंचायत इमारती, अंगणवाड्या, स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण, साठवण बंधारे, नाविन्यपूर्ण कामे, ट्रान्सफार्मर्ससह विजेची अन्य कामे, जि.प. शाळांना संरक्षक भिंती उभारणे, सौर उर्जा कामे यांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी 90 टक्क्यांंपेक्षा जास्त निधीचा वापर करण्यात…
जळगाव ः प्रतिनिधी स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित ‘सुस्वागतं रामराज्यं’ या सुंदर नृत्य-नाटिकेद्वारे गुढीपाडव्याची सायंकाळ रंगली. नर्तन-कीर्तनाच्या सुरेल संगमाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. भवरलाल व कांताबाई फाउंडेशनच्या सहकार्याने छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. सराफा व्यावसायिक अशोक जोशी, राम मंदिर संस्थानचे गादीपती श्रीराम जोशी, जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अनिल जोशी, नृत्य नाटिका सादरकर्ते अक्षय आयरे, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरद छापेकर, दीपक चांदोरकर उपस्थित होते. अशोक जोशी, श्रीपाद जोशी, जैन इरिगेशनचे व्ही.एम. भट,डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते गुढी देऊन कलावंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गीत रामायण कीर्तन आणि नर्तन, या दोन्ही…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने पारित करण्यात आलेले सर्व आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागे घेतले आहेत. अर्थात, जिल्हा आजपासून खऱ्या अर्थाने निर्बंधमुक्त झाला असून हॉटेल्स, बार रात्री 10 नंतरही खुले राहतील. जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व घटक यांनी आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षिततेसाठी कोविड अनुरूप वर्तनासाठी चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मार्च 2020पासून महाराष्ट्रात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले होते. बाधित रुग्णसंख्येत घट झालेली असून, काही…
जळगाव ः प्रतिनिधी इंधन दरवाढ विरोधात युवासेनेतर्फे काल शहरात केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी राज्यात इंधनरवाढ विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत जळगावात युवासेनेतर्फे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. इंधन व महागाई वाढीचा निषेध करीत थाळी वाजवण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या सूचनेनुसार महानगर शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे, युवासेना जिल्हाप्रमुख…
जळगाव ः प्रतिनिधी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यातील 195 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश वितरण कार्यक्रम गणपतीनगरात रोटरी हॉल येथे झाला. जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, नाम फाउंडेशनचे जळगाव विभागाचे समन्वयक डॉ.प्रताप जाधव, संजय शहा यांच्याहस्ते हे धनादेश वितरित झाले. ‘नाम’तर्फे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी हिताचे कार्यक्रम राबवले जातात. त्यात प्रामुख्याने नदी व नाले रुंदीकरण, खोलीकरण कामाचा समावेश आहे. डॉ. प्रताप जाधव यांनी प्रास्ताविक केले. धनादेश उपलब्धतेसाठी हरीश इथापे यांचे सहकार्य लाभले. धनादेशासोबत स्व. प्रेमजी भवानजी शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाचे…
मेष : मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत स्पष्ट भूमिका ठेवा. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. मनोरंजनाच्या साधनांमध्ये रुची राहील. घराबाहेर आनंद राहील. पैशाची गुंतवणूक शुभ राहील. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी आज सर्वांशी नम्रपणे बोला. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी चांगली वेळ आहे. कौटुंबिक सुख चांगले राहील. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जुन्या सातारा भागात गुढीपाडवा आणि मरीमाता देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या महोत्सवाला गालबोट लागले आहे . ४-५ लोक चिरडले गेले असून २ लोकांचे पायांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते. यामध्ये १ व्यक्ती दगावल्याची देखील बातमी आहे.मात्र,अधिकृत रित्या पोलीस विभागाकडून या घटनेस दुजोरा मिळू शकलेला नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मरी मात्रा यात्रेत बारागाड्या ओढत असताना चेंगराचेंगरी मध्ये गाडी ओढणारे सुतार गल्लीतील गिरीश कोल्हे (वय ३९) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्यमध्ये माजी नगरसेवकाचे बंधू असल्याचे कळते.