Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी घरातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. मात्र या आपत्तीच्या काळातही निराधारांना आधार देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आपण आयुष्यात नव्या उमेदीने वाटचाल करावी. आपल्यासोबत आम्ही आहोत, अशा भावना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील 22 महिला व पुरुषांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत 4 लाख 40 हजाराचे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. दरम्यान, यातील पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ देण्यात यावे असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले. अजिंठा विश्रामगृहात या कार्यक्रमाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यभरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यपदी विष्णू गोकुळ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही नियुक्ती केली असून यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र विष्णू मोरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. विष्णू मोरे हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष दीपक वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सावळे, धरणगाव तालुकाध्यक्ष महेंद्र चौधरी यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे यांच्या निवडीबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले, राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्याची तीव्रता जाणवता नामशेष होण्याऱ्या पक्षांना पाणी देऊन जीवनदान मिळावे या उद्देशाने बहीणाबाई उद्यान येथे पक्षांसाठी परळ व धान्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. पक्षांना उन्हाच्या तीव्रतेपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करून परळ द्वारा दाणापाण्याची सोय करावी या उद्देशाने संवेदनशील भावनेतून हा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ नीलिमा सेठीया व अध्यक्ष मनिषा पाटील यांच्या हस्ते परळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी नेहा जगताप, किमया पाटील,नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, संजय साळुंखे, कविता पाटील, उल्का पाटे ,वैशाली शिरूडे, आशा मौर्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विश्वविख्यात अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे साहेब यांचे मध्यप्रदेश मधील रावेरखेडी येथे भव्य स्मारक (समाधी) तसेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे भव्य पुतळा निर्माण करण्याचा निर्णय घेऊन पाठपुरावा करणारे राज्यसभेचे खा. विनय सहस्रबुद्धे यांची ब्रह्मदंड मासिकातर्फे संपादक अजय डोहोळे व अनघा डोहोळे यांनी सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भादली बुद्रुक येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत १३ पैकी ९ शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीचे  संचालक विजयी झाले. या माध्यमातून विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दरम्यान, नवनिर्वाचीत संचालकांनी आज पालकमंत्री  ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व शेतकरी व सोसायटीस विकास कामांकरिता सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. भादली बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये शिवसेना प्रणीत मविआ पॅनलने बहुमत मिळविले आहे. या निवडणुकीत मनोहर महाजन, जितेंद्र नारखेडे, हर्षल नारखेडे, राजेंद्र अत्तरदे, संदिप कोळी, अनिल नारखेडे, प्रकाश धनगर, विद्या सोपान कोल्हे व हेमलता प्रकाश नारखेडे हे संचालक म्हणून निवडून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी वारकरी संप्रदाय हा माणसात देव शोधतो. माणुसकी धर्म मानतो आणि सर्व जातींचा मेळा करुन गुण्यागोविंदाने नांदायचं शिक्षण देतो. तो सत्य, सदाचार आणि प्रबोधनाच्या मजबूत पायावर उभे आहे.  समाजाला याच प्रबोधनाची गरज आहे. ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था भविष्यात हेच काम करेल असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी  केले. भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात गुलाबराव वाघ यांनी धरणगाव येथील हभप हिरालाल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव येथे २०१७ पासून संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून तालुका व परिसरातील बालकांना वारकरी शिक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या ही संस्था धरणगाव येथील लोहार गल्ली परिसरात कार्यरत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील दीपनगर येथील वसाहतीत एका २९ वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शरण्या पिल्लई (वय २९, रा.केरळ, ह.मु. दीपनगर वसाहत) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, दीपनगर वसाहतीतील रहिवासी व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मेसमध्ये कामाला असलेल्या मनाेज पिल्लयांच्या त्या पत्नी आहेत. संतापाच्या भरात आत्महत्येची ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. शरण्या पिल्लई ही आपल्या चार वर्षांच्या मुलास रागावली, म्हणून पती मनाेज हे पत्नीवर रागावले. त्याचा राग आल्याने महिलेने राहत्या घरात बेडसीट पंख्याला बांधून गळफास घेतला. यावेळी पती दुसऱ्या रूममध्ये होता. पत्नी दार उघडत नसल्याने त्याने आजूबाजूच्या लाेकांना बाेलावून…

Read More

यावल : प्रतिनिधी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने शनिवार दि.23 रोजी रावेर तालुक्यातील मांगी करंजी परिसरात व यावल तालुक्यात रिधोरी गावाजवळ वाहनाच्या धडकेने हरिणचा एक पाय फॅक्चर झाल्याची घटना दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान घडली.रिधोरी ग्रामपंचायत सरपंच,सर्पमित्र,वन कर्मचारी यांच्या दक्षतेने हरीणावर फैजपूर येथे पशु पक्षीय वैद्यकीय अधिकारी यांनी औषध उपचार केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की,रिधोरी येथील सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी भ्रमणध्वनी वरून दिलेली माहिती अशी की दि.23 रोजी रिधोरी ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर सोनवणे हे आपल्या कामानिमित्त बाहेर गावी जात असताना त्यांना रिधोरी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला एक हरीण जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले,त्यांनी लगेच आपल्या…

Read More

मेष: मेष राशीच्या लोकांना आज स्वतःसाठी वेळ मिळेल. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. लवकर यश मिळवण्यासाठी अयोग्य कृतींकडे लक्ष देऊ नका. आज ८५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज शुभवार्ता मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. आज ७९% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा. मिथुन : आज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर राग राग करणे टाळा. एखाद्या विशिष्ट…

Read More