Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी वीट भट्टी चालकाकडून २५ हजार रुपयाची लाच घेतल्याचे मौजे शिवरे दिगर येथील महिला तलाठी वर्षा काकुस्ते यांनी कबुल केल्याने, धुळे लाच लूचपत विभागाच्या पथकाने चौकशीअंती त्यांच्या विरुध्द कारवाई करत पाचोरा पोलीस स्थानकात शुक्रवार दि.२४ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर, येथील रहिवासी तक्रारदार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असुन त्यांना विट उत्पादनासाठी मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता त्यांनी वर्षा काकुस्ते, तलाठी मौजे शिवरे दिगर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्या…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी 17 मे गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे उन्हाचा पार कायम आहे तर कुठे अवकाळी पाऊस बरसतोय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार असून येत्या 20 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असा आहे हवामानाचा अंदाज  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 मेपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. असे असताना दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या…

Read More

जळगाव : परेश बऱ्हाटे सध्या लोकसभेची धामधुम सुरू असून राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान आटोपले असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता असतांनाच भाजपाचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस उद्या १७ मे रोजी आहे. खरं तर, आचारसंहिता असल्यामुळे या वाढदिवसाच्या सेलीब्रेशनवर बऱ्याच प्रमाणात मर्यादा येणार असल्या तरी हजारो कार्यकर्ते आणि लाखो चाहत्यांच्या ह्रदयसिंहासनावर विराजमान झालेल्या जननायकाचा हा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे अर्थातच पैसा आणि जातीचे पाठबळ हे होय. याच्या बळावरच कुणालाही यशस्वी राजकारणी होता येते मात्र या दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारचे भक्कम…

Read More

साईमत अमळनेर प्रतिनिधी जळगाव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मेळाव्याला अमळेनरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवून देवू, असे जाहीर आश्वासन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे महायुतीच्या मेळाव्याला अमळनेरकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या मेळाव्याला अमळनेरकरांमध्ये प्रचंड उत्साह होता. सभेचा परिसर “ अबकी बार मोदी सरकार” या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांना…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी भाजपाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एसएम मुश्रीफ यांच्या ‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ या पुस्तकाचा दाखला देत उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी निकम सरकारी वकील असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाचविण्याची भूमिका घेतली असे वडेट्टीवार म्हणाले. भाजपाने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी एसएम मुश्रीफ यांच्या पुस्तकाकडे बोट दाखविले. आता खुद्द एसएम मुश्रीफ यांनी याबद्दलची भूमिका मांडल्याने हेमंत करकरेंच्या मृत्यू प्रकरणातील वादाला अधिक पुष्टी मिळाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना एसएम…

Read More

जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत आयोजित उद्योजक मेळाव्यात सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. गिरीशभाऊ महाजन व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सुद्धा उद्योजकांना संबोधित करत त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व उद्योजकांनी महायुतीची उमेदवार व मा. नरेंद्रजी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामविकास मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन, मा. आमदार राजूमामा भोळे, उज्वलाताई बेंडाळे, अरुणदादा बोटोले, कवरलालजी संघवी, डॉ. राधेश्याम चौधरी, कांतीलालजी सानप, केतकीताई पाटील, सुनिलजी वेठ साहेब, रावजी लठा, समीरजी साने, संतोषजी रगडे, बंडूदादा काळे, चंद्रकांतदादा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नागपूर येथील अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघातर्फे आयोजित “नृत्यसंस्कृती” १३ व्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत जळगाव येथील ओजल निलेश सूर्यवंशी हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. “नृत्यसंस्कृती” नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पंडित राजेंद्र गंगानी, ललिता हरदास, ज्योती पै, शुभलक्ष्मी पाखोटे, अनुजा अमेयराव आदींची उपस्थिती होती. यावेळी ओजल निलेश सूर्यवंशी हिस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ओजल सूर्यवंशी हिस गुरुवर्य यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांना भेटण्याची संधी मिळाली. ओजल हीस तिचे कथ्थक गुरू अर्चना चौधरी तसेच आई पूजा निलेश सूर्यवंशी वडील निलेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाच वर्षाव…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आपण विज्ञान लहानपणापासून शिकत आलो आहोत, परंतु फक्त पाठांतर न करता, सर्व आंधळेपणाने न स्वीकारता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. तंत्रज्ञान प्रत्येक क्षणाला बदलत आहे. त्यामुळे कौशल्ये वाढवा , समर्पण ठेवा व संशोधनात आंनद घ्या असा संदेश देत त्यांनी कठोर मेहनत, नियमितता आणि वक्तशीरपणा याचे महत्त्व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा दुसरा दीक्षांत समारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर सचिव पदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष तथा नेते बापूसाहेब दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पाचोरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात जितेंद्र पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, शहराध्यक्ष किरण तळले, विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, चेतन पवार, सतीश सैंदाणे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शहराध्यक्ष कुणाल पवार, जनहित कक्षाचे संघटक राजेंद्र निकम यांनी जितेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले. जितेंद्र पाटील यांना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असून रुग्णालयाशी संबंधित मदतीबाबत जितेंद्र पाटील…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे. मानवी जीवनाला प्रकाशमान करणारे ठाणांग सूत्र आगम वाचना हे पाप प्रवृत्तीपेक्षा धर्मवृत्ती ही श्रेष्ठ असल्याची शिकवण देते आणि धर्माची ताकद वाढविते, असे आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी सांगितले. जैन हिल्स स्थित आकाश प्रांगण येथील ‘हिरा संस्कार छत्र’ येथे तिन दिवसीय जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ शिबीराचा समारोप झाला. यावेळी विजय रत्नसुंदरसुरीश्वरीजी महाराज साहेब श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे सेवार्थी भवरलाल आणि कांताबाई जैन परिवार यांचा हृदय सत्कार गुरूदेवांच्या सान्निध्यात यावेळी करण्यात आला. हा…

Read More