साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर शहराला पूर्णा नदीचे पात्रातून पाणीपुरवठा होत असतो. पूर्णा नदी ही गाळ वाहून नेणारी नदी असून पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्ये सालाबाद प्रमाणे शहरवासीयांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा चा सामना करावा लागतो. मागील महिन्यामध्ये मुक्ताईनगर येथील दोन भागातील पिण्याचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य आलेले होते. तात्काळ अयोग्य आलेले पिण्याचे पाण्याचे नमुने पुन्हा री सॅम्पल पाठवून जळगाव येथे पाणीपुरवठा रासायनिक प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्यानंतर ते पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. मुक्ताईनगर नगरपंचायती मधील पाणीपुरवठा अभियंता गेल्या दहा महिन्यापासून नसल्याने हा पदभार लेखापाल हे सांभाळत आहेत.आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करीत शहरात पुरवठा होणाऱ्या…
Author: Saimat
साईमत प्रतिनिधी | दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मंत्री यांच्या तिसऱ्यावेळी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर त्यात सहभागी खासदार ना.श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. श्रीमती रक्षाताई खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. या खात्याचे कॅबिनेट मंत्री चिराग पासवान हे असून त्यांच्या सोबत रक्षाताई खडसे यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. आज त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे.केंद्रीय मंत्री श्री.मनसुख मांडवीया यांनी रक्षाताई यांना पदभार स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
• विवेक ठाकरे • विशेष प्रतिनिधी | जळगाव : केंद्रात आता मोदी सरकारचे 3.0 पर्व सुरु होत असून आज सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकवणाऱ्या खा. रक्षाताई खडसे या सुद्धा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.खा.रक्षाताई यांची पहिल्याच यादीत मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्ह्यासह खान्देशात आंनदाला उधान आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजपला विजय मिळाला होता त्यात उत्तर महाराष्ट्रात दोन्ही विजयी जागा या जळगाव जिल्ह्यातील आहेत.विशेष म्हणजे यातील खा.रक्षाताई खडसे यांनी सलग तिसऱ्यांना विजयी होत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. एम.के.अण्णा…
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला असून त्या संदर्भात तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा ग्रामपंचायत येथे मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याच्या कारणाने संविधानिक मार्गाने जनतेच्या समोर आर्थिक घोटाळा आणण्यासाठी तसेच वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पिंप्राळा येथील राहुल गोपाळ झाल्टे तसेच मुक्ताईनगर येथील सईद खान शब्बीर खान यांनी तक्रारी केली त्यामुळे पिंप्राळा येथील रामकृष्ण उर्फ मिलिंद झाल्टे यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान राहुल झाल्टे यांनी पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला संदर्भात 2 मे 2024 रोजी…
साईमत प्रतिनिधी (विवेक ठाकरे) राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पुण्याहून नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर कृषी विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून, डॉ. प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार घ्यावा, असे म्हटले आहे. डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. डॉ. प्रवीण गेडाम यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत नाशिक मनपा आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगले परिचित आहे. शिवाय, त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे…
साईमत चोपडा प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यातर्फे आयोजीत कायरोप्रॅक्टिस ट्रीटमेंट शिबीर शहरातील हरेश्र्वर कॉलनी येथील रोटरी भवन येथे संपन्न झाले. ७ दिवस चाललेल्या शिबिराचा तब्बल ७५० रुग्णांना लाभ झाला असून, अनेक रुग्णांना अनेक वर्षांच्या जुन्या दुखण्यापासून मुक्तता मिळाली आहे. यावेळी शिबिरात कुठल्याही प्रकारची गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, सायटिका, ऍसिडिटी, पोट साफ न होणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना सेवा देण्यात आली. कायरोप्रॅक्टिस थेरपीस्ट डॉ. संदीप नायक, डॉ. राजकुमार सिंगानिया आणि त्यांच्या टिमने सात दिवस सदर कॅम्प घेतला. शरीराच्या नर्वस सिस्टीम आणि हाडांमध्ये आलेल्या त्रासाला ठीक करणाऱ्या या उपचाराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला. कुठल्याही प्रकारचे मेडिसिन अथवा औषध न…
सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे मनात विचार आला, आता जाऊन पाहिलंच पाहिजे. रूम पासून प्रदर्शन जवळच असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी प्रदर्शन पाहायला गेलो. अनेक वेगवेगळी आणि आकर्षक चित्र त्या ठिकाणी लागलेली दिसली. प्रत्येक चित्र एक खूप मोठा अर्थ घेऊन डोळ्यासमोर येत होते. त्या चित्रातून चित्रकार आपलं मत आणि आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता. जशी लेखकाची ताकद लेखणी असते तशीच चित्रकाराची ताकद पेन्सिल असते. तिथे काही लोक चित्रावरून किंमत ठरवत होते. पण मला वाटतं कलेमध्ये भाव करणं हे कलाकारासाठी अपमानास्पद असतं. पण हे त्यांना कोण सांगणार, असो… चित्र पाहत…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावमध्ये मत मोजणी नंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेल्या त्या स्ट्रॉंग रूमचे CCTV काही वेळेसाठी बंद पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला परंतु काही मिनिटातच परिस्थिस्ती पूर्वपदावर आली. वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणाने CCTV चे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र व्हिडीओ चित्रिकरण बंद पडल्यानंतर देखील सुरुच होते, असं प्रशासनान कडून सांगण्यात आले. घडलेल्या या सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी यांनी सविस्तररित्या सांगितली, चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते, परंतु व्हिडीओ रेकॉर्डिंग ही सुरुच होती. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सर्व रेकॉर्डिंग दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची तक्रार नाही. असा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढी पशुधन उष्मघात मुळे थेरोळा शिवारात मृत्यू मुखी पडलेल्या होत्या. घटनेची माहिती कळताच त्याठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार गिरीश वखारे , पशू वैद्यकीय अधिकारी यांची 8 ते 9 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन भेट दिली. या घटनेची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉल वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉ राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन द्वारे दिली. शासन व प्रशासन आपणास सर्वोतोपरी आपणा सोबत…
साईमत ओझर प्रतिनिधी एकीकडे प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणत एस टी महामंडळ हात दाखवा गाडी थांबवा या पद्धतीने विविध उपक्रम राबवत असताना मात्र काही चालक त्या उपक्रमांचा फज्जा उडवताना दिसत आहे. त्याच झालं असं शुक्रवार दि २४ मे रोजी एक महिला प्रवाशी आडगाव नाका नाशिक येथे दुगाव ता चांदवड येथे जाण्यासाठी नाशिक मनमाड बस ची वाट बघत असताना मनमाड आगाराची बस क्रं एम एच 20 बी एल 3668 ला थांबविण्यासाठी हात केला परंतु संबंधित चालकाने त्याकडे बघून ही बस न थांबावता पुढे नेली, संबंधित महिलेच्या नातेवाईकाने मोटारसायकल ने पाठलाग करून अमृतधाम जवळ बस थांबविली असता बस मध्ये फक्त थोडेच प्रवाशी असल्याचे दिसून…