एसपी राष्ट्रवादी पक्षाचा सोशल इंजिनिअरिंगचा अफलातून फार्मुला साईमत विशेष प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नवनियुक्त शिलेदारांचा विचार केल्यास आगामी विधानसभा निवडणूकीच्या वातावरणाच्या ऐन भरात सामाजिक समीकरणावर भर दिला आहे. पक्षाने जिल्हाध्यक्ष मराठा,रावेर लोकसभेला कार्याध्यक्ष तेली, जळगावला माळी,महानगर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मुस्लिम,दोन कार्याध्यक्ष देतांना एक राजपूत आणि एक मराठा याप्रमाणे अफलातून सोशल इंजीरिंगचा फार्मुला असा मेळ साधत गुगली टाकली आहे. मावळते जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्रभैय्या पाटील यांचा गेल्या सात वर्षाचा काळ पक्षाच्या पदरात काही ठोस पाडू न शकल्याने त्यांच्याविषयी उघड तक्रारी झाल्या.लोकसभेच्या पराभवाची कारणमिमांसा असणाऱ्या चालू सभेत तत्कालीन जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्रभैय्या…
Author: Saimat
तिन्ही दादांच्या भांडणाचा मुद्दा निकाली निघाल्याच्या पार्श्वभूमिवर सुरु झाली चर्चा साईमत विशेष प्रतिनिधी (विवेक ठाकरे) अमळनेर नगरपालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत झालेल्या दंगलीतील खटल्यात माजी आ.शिरीषदादा चौधरी यांनी न्यायालयात साक्ष बदलली.यामुळे मंत्री अनिलदादा पाटील यांच्यासोबत त्यांचे मनोमिलन होईल,असे बोलले जात असले तरी त्यापेक्षा आगामी विधानसभेच्या धर्तीवर गुन्ह्यात नावे असलेल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये साखर पेरणी व्हावी म्हणून शिरीषदादा चौधरी यांनी साक्ष फिरवत वेगळाच डाव टाकल्याची चर्चा पुढे येतेय.महिनाभरात त्या भांडणाच्या खटल्याचा कोर्टात फैसला होईल पण त्यानंतर बदलणाऱ्या राजकीय समीकरणाकडे व यावर नेमका विधानसभा निवडणूकीवर त्याचा कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमळनेर तालुक्याला स्थानिक भूमिपुत्र व उपरा…
येथील पालक नाल्यावर गावाजवळ जुना आहे. साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी : येथील पालक नाल्यावर गावाजवळ जुना आहे. नाल्याला पावसाळ्यात पूर आल्यावर गावातील व धानोरासह परिसरातील नागरिकांच्या गावाशी संपर्कप्रमुख तुटतो. विशेष म्हणजे याच पुलावरून जि.प.शाळा व माध्यमिक शाळा जाण्याकरता वापर केला आहे. मात्र,याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यावर आणि वरतून पावसाची रिप्रेप सुरू असल्यावर इकडून प्रवेश करता येत नाही या पालक आल्यावर फरशी फुल बसवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. २५ हजार लोक वस्तीचे गाव असलेल्या आणि तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या धानोरा गावात पालक आल्यावर फरशी पूल बसवण्याची मागणी पुढे येत असून गावातील यांना पाणी आल्यावर पूर्णपणे गावाचा व बाहेर खेडेगावावरून येणाऱ्या लोकांचा संपर्क तुटून…
साईमत / जळगाव / विशेष प्रतिनिधी जन्मताः दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने राज्यभर जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करून अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज मंगळवार,6 ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद करण्यात आली.द स्माईल ट्रेन या संस्थेच्या माध्यमातून आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने 11 हजार 500 दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या राज्यातील व परराज्यातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना सौंदर्य व समाजात सन्मानाचं स्थान देण्याचं करण्यात आले आहे.अशी माहिती रेड स्वस्तिकचे राज्य सचिव…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई च्या वतीने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने शाळांसमोर बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासंदर्भात संघटनांच्या वतीने शासन दरवारी निवेदने देऊन पाठपुरावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. परंतु शासनाने हे प्रश्न सोडविण्यासाठी उदासिनतेचे धोरण अवलंबिलेले आहे. शाळांसमोर हे प्रश्न व त्यावरील उपाय मान्य झाल्याशिवाय प्रशासन सुकर होणार नाही. यासाठी विविध मागण्याचे निवेदन जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या वतीने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. यावेळी शैक्षणिक व्यासपिठाचे अध्यक्ष जे.के. पाटील, समन्वयक एस्.डी. भिरुड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाची मंगळवारी दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी वृक्षारोपण देखील केले. चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरु आहे. याठिकाणी महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जाणार आहे. मंगळवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, संजय चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संदीप…
नाशिक रोड आरपीएफ कार्यालयातून होणार पाहणी साईमत/नाशिक/प्रतिनिधी : आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प, इगतपुरी, मनमाड रेल्वे स्थानकावर दर्जात्मक आणि गुणात्मक बदल होत आहे. वाढणारी गर्दी व सुरक्षेचे कारण लक्षात घेता देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन येथे सध्या ३८ सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सीसीटीव्हीचा रिमोट कंट्रोल नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस फोर्स कार्यालयात असणार असल्यामुळे नाशिक रोड येथील कर्मचारी थेट देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाचे २४ तास निरीक्षण करणार आहेत. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प हे दोन महत्त्वाचे स्टेशन मानले जातात. विशेष करून देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकामध्ये सैन्य दलातील जवान प्रवास…
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणाऱ्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश साहेबराव सूर्यवंशी लिखित व ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिकद्वारा प्रकाशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणाऱ्या आगळ्या वेगळ्या माझी शाळा… माझा उपक्रमाद्वारे ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकाचे प्रकाशन शेठ नारायण बंकट वाचनालयात नुकतेच करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशन न्या.संगीतराव पाटील, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मछिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक एम.डी. बागुल, प्राचार्य बी.पी. पाटील, प्राचार्य एस.एस. राठोड, मुख्याध्यापिका मीना बागुल, पर्यवेक्षक सी.डी. पाटील व लेखक सतीश…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे विद्यार्थी पुस्तके विसरले आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची आवड निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने हिंदी मराठी विभागातर्फे मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मेहरूण येथे पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शालेय ग्रंथालयातील सर्व हिंदी व मराठी विषयांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी करून या शैक्षणिक वर्षात वाचण्याची शपथ घेतली. पुस्तक मैत्री आणि हिंदी-मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हिंदी मराठी विभागाने या प्रदर्शनाची जबाबदारी घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शेख हफीज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सदर नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते करण्यात आल्या आहे. जळगाव तालुका अध्यक्षपदी प्रदीप पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्षपदी देवेंद्र माळी, जळगाव तालुका सचिवपदी मनोज लोहार, जळगाव तालुका संघटकपदी विलास सोनार, जळगाव शहर सचिवपदी हर्षल वाणी, एरंडोल तालुका संघटकपदी शुभम महाजन, एरंडोल तालुका सचिवपदी देवानंद घुले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा,केळीला फळाचा दर्जा मिळावा, हमीभाव योग्य प्रमाणात मिळावा,शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी आमचा पक्ष काम करणार असल्याचे अमोल भिसे यांनी या…