Author: Saimat

साईमत, जळगाव, प्रतिनिधी पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीला अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडी जवळ अपघात झाला. आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा रक्षकांच्या पोलीस व्हॅननेच त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने चिमणराव पाटलांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटलांच्या कारचे मात्र नुकसान झाले आहे.

Read More

साईमत, पाचोरा, प्रतिनिधी  शहरातील मानसिंगका कॉलनी येथील २१ वर्षीय तरुण व पुरुषोत्तम नगर येथील २१ वर्षीय तरुणी यांनी आज दुपारी वेगवेगळ्या भागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटना ह्या परस्पर वेगळ्या असुन आत्महत्यांचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. शहरातील मानसिंगका कॉलनी येथील रहिवाशी ललित राजाराम पाटील (वय २१) या तरुणाचा रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंचायत समितीच्या पडक्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संतोष राजपुत, गुणवंत पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करुन ललित यास तातडीने ग्रामीण…

Read More

साईमत, पुणे ः प्रतिनिधी येथील ५७ व्या वरिष्ठ राज्य कॅरम स्पर्धेत महिला गटात पुणे तर पुरुष गटात मुंबई संघास विजेतेपद मिळाले.इतिहासात पुणे येथे प्रथमच स्पर्धा झाल्या व पुणे महिला संघाने विजेतेपद पटकाल्याने पुणेकरांच्यादृष्टीने ही अनोखी भेट ठरली.सांघिक गटात साखळी सामन्यांमध्ये पुणे व मुंबईचे प्रत्येकी ८ सामने झाले होते त्यामुळे कोण बाजी मारणार,याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती.अंतिम सामन्यात पुणे संघाने बाजी मारली.पुणे संघाने मुंबईला २-१ असे नमवून पहिल्यांदाच विजेतेपदाचा बहुमान मिळवला. मुंबईच्या काजल कुमारीने पहिल्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या तुलिका चौरसियाला २०-०,१९-१६ असे हरवून आपल्याला संघाला आघाडी मिळवून दिली होती परंतु दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या मेधा मठकरीने मुंबईच्या अंबिका हरियवर १४-१३, २५-१३…

Read More

साईमत मुंबईः प्रतिनिधी  मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. याविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावली झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती दिली आहे. यापेक्षा कमी शिक्षा सुनावता आली असती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभेत दिसतील असे बोलले जात होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 72 तास होत आले तरी अद्याप लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना त्यांचं संसद सदस्यत्व दिलेले नाही. यावरून आता टीका-टिप्पणी सुरू झाली…

Read More

साईमत, पाळधी, प्रतिनिधी येथील कासट ग्रुपच्या कार्यालयाची ग्रील तोडून कॅबिनमधून 2 लाख 60 हजारांची रक्कम रात्री चोरट्यांनी लांबवल्याची घटना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुपचे संचालक अशोक व शरद कासट यांचे महामार्गावर घर असून घराच्या आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. तेथूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात. ते वीटभट्टीच्या व्यवसायाबरोबरच ते सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांच्या कार्यालयात जवळपास सहा कॅबिन आहेत. रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व त्यांनी प्रत्येक कॅबेिनमध्ये जावून ड्रॉवरमधून पैसे काढले. यात शरद कासट यांचे 40 हजार, शैलेश कासट…

Read More

साईमत, जळगाव, प्रतिनिधी आजच्या काळात टेक्नॉलॉजी आत्मसात करणे अत्यावश्यक बाब बनली असून टेक्नोसेव्ही आणि टेक्नोस्नेही बनल्यास प्रशासकीय कामकाजात गती आणि सर्वांगीण प्रगती येते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. विद्यापीठात कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध टेक्नोसेव्ही सुविधांचे उद्घाटन कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात कुलगुरू माहेश्वरी पुढे म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात वाढत आहे. प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानापासून दूर न जाता तंत्रस्नेही बनल्यास आपण अधिक गती आणि प्रगती…

Read More

साईमत,  जळगाव, प्रतिनिधी शहरातील गणपती नगरात शहरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बाप-लेकाने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम पसार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा बाप- लेकांवर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणपती नगरातील संत सतरामदास मंदिरात शहरातील सिंधी कॉलनीतील श्याम वासुदेव करमचंदाणी हे सेवा करतात. त्यांचासोबत रात्रीच्या वेळ काही सहकारी सेवा करण्यासाठी येत असतात. मंदिराच्या परिसरात राकेश गोकुळ राठोड व त्याचे वडील गोकुळ हंसराज राठोड हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास मंदिरात मोठा आवाज झाला. त्यामुळे मंदिरात झोपलेले श्याम करमचंदाणी, अविनाश कापडी, प्रकाश पासवाणी, जवाहर तलरेजा…

Read More

साईमत, जळगाव,  प्रतिनिधी शहरातील जोशी कॉलनीत रिक्षाचालकाला लुटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी चौघांपैकी एका फरार आरोपीला अटक केली आहे. त्यास तपासकामी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जोशी कॉलनीत राहणारे रिक्षा चालक निलेश उर्फ रायबा शांताराम जोशी यांना दि.15 जुलै रोजी रात्री 9.45 च्या सुमारास चौघांनी बेंडाळे चौकाजवळ गल्लीत लुटले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्या पथकाने गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती. तर एक संशयित अद्याप फरार होता. शहर पोलिसांना एक संशयित आरोपी रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये दारू पित असल्याची माहिती शनिवारी दुपारी मिळाली. शहर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी    शहरातील रामानंद नगर परिसरात एका ५५ वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी ८५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगर परिसरात असणाऱ्या जीवन नगरमध्ये राहणाऱ्या आशा ज्ञानेश्वर महाले ( वय  ५५ ) ह्या  शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ८५ हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. आशा महाले यांनी आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. याबाबत आशा महाले यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशन…

Read More

साईमत चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रांजणगाव येथे शेळ्यांच्या शेडच्या जाळ्या तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन बकऱ्या आणि एक बोकड (पशुधन) अशा २५ हजारांच्या बकऱ्या चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील रांजणगाव येथे बकऱ्यांसाठी असणाऱ्या शेडमधून अज्ञात चोरट्याने लोखंडी जाळी तोडून दोन बकऱ्या आणि एक बोकड असे २५ हजार रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर जंजाळे करीत आहे.

Read More