साईमत, मुंबई ः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. शर्लिन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, सध्या शर्लिन आपल्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शर्लिनने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र, यासाठी तिने एक अटही ठेवली आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शर्लिनला पैपराजींनी राहुल गांधींबरोबर लग्न करशील का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देत शर्लिन म्हणाली, हो मी राहुल गांधींशी लग्न करु शकते पण लग्नानंतर मी माझे अडनाव बदलणार नाही.शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार…
Author: Saimat
साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्याकरता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणातून अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना संजय राऊतांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आज ते दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, चर्चा करू शकतात. यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. मी दोघांनाही ओळखतो, दोघांशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव…
साईमत यावल प्रतिनिधी गोंडगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ यावल शहरातील सर्वधर्मीय व सर्वपक्षिय मुक मोर्चा काढण्यात आला. अटकेतील संशयित आरोपीला न्यायालयाने कठोरात कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसर ते यावल तहसील कार्यालयापर्यंत मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मुकमोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्याहस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले. तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीक मोर्चात सहभागी लहान…
साईमत, जळगाव ः प्रतिनिधी एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची मंगळवारी सांत्वनपर भेट घेतली. त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासन…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी गेली काही दिवस कोरोनाचे नाव ऐकू येत नसताना राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे 109 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या70 इतकी होती. पण 6 ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 115 इतकी होती. तर आज नोंदवण्यात आलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 इतकी आहे.
साईमत, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. दरम्यान,खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचाच निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदोरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काय आहे प्रकरण? इंदोरीकर महाराज यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शिर्डीतील ओझर येथे कीर्तनादरम्यान केलेल्या निरुपणात ‘सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा…
साईमत, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपसोबत जाणार नाही. आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे. ते दिल्लीत बोलत होते. शरद पवारांच्या राजकीय भूमिकांबाबत नेहमीच संभ्रमाचे वातावरण असते. आताही राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. फुटीनंतर पहिलीच सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात घेत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली व शरद पवारही मवाळ झालेले दिसले. अशातच कालच राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर मतदान झाले. मात्र, त्यासाठी कोणताही व्हीप राष्ट्रवादी पक्षाकडून बजावण्यात…
साईमत सोयगाव प्रतिनिधी येथील विश्वेश चौधरी यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जेजुरी पुणे येथे शासन आपल्या दारी कर्यांकर्मात नुकतेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. जेजुरी पुणे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये कामाची संधी मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते सोयगाव येथील विश्वेश राजेंद्र चौधरी यांस प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. ही संधी प्राप्त करुन देण्यासाठी रवींद्र घाटे, प्रमोद पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
साईमत साकेगाव ता.भुसावळ वार्ताहर साकेगाव जोगलखेडा रस्त्याने पोलीस व महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी डंपर क्रमांक एम एच 19 झेड 1644 या वाहनातून वाघूर नदी पत्रातून अवैधरित्यावाळू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आल्याने सदर वाहन ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे. साकेगाव जोगलखेडा रस्त्याने पोलीस व महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी संदीप बेनीलाल परदेशी यांच्या मालकीचे वाहन क्रमांक एम एच 19 झेड 1644 या वाहनातून वाघूर नदी पत्रातून अवैधरित्या गौण खनिज भरून साकेगाव गावाच्या दिशेने वाहतूक करीत असताना साकेगाव शिवार गट नंबर १०/२ शेत जमिनी जवळ वाहन पकडण्यात आले. वाहनात अंदाजे दोन ब्रास वाळू होती, पोलीस पथकातील कर्मचारी जोगलखेडा गावाच्या दिशेने येत असताना वाहन मालक…
साईमत यावल प्रतिनिधी नगरपरिषद हद्दीत हडकाई नदीपात्रात प्लास्टिक विलगीकरण न केलेला घनकचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत दि.२५ फेब्रुवारी ,दि.७ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय जळगाव यांच्याकडे यावल नगरपरिषदेने तसेच संबंधित ठेकेदाराने घाण – केर कचरा नदीपात्रात टाकून नदी,नाले स्वच्छता अभियान खड्ड्यात घातले, त्यामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करणे बाबतचे विषयांने तसेच यावल नगरपरिषद हद्दीत हडकाई नदी पात्रात प्लास्टिक मिश्रित विलगीकरण न केलेला घनकचरा टाकून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत तक्रार केली आहे. परंतु संबंधितांनी या प्रकरणात कागदोपत्री मोठा घोटाळा केल्याने कोणतीही कारवाई केली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव…