जामनेरच्या चव्हाण दाम्पत्याने रामदेव बाबा समाधीस्थळी राबविला उपक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील आनंद नगर येथील रहिवासी देविदास चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती गिरीजा चव्हाण या दाम्पत्यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच स्व.त्र्यंबक झामसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ राजस्थानातील रामपूर ते रामदेवरा जैसलमेर देवदर्शन यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना ट्रकभर पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे निःशुल्क वाटप करून भाविकांची तहान भागवली. जामनेर तालुक्यातून व महाराष्ट्रातून दरवर्षी हजारोच्या संख्येने रामदेव बाबांचे भक्त राजस्थान येथील रामदेवरा जैसलमेर येथे बाबांच्या समाधीस्थळी जात असतात. तेथे उपलब्ध असलेले पिण्याचे पाणी चवीने खारट लागत असल्याने जामनेरच्या उभयतांनी भाविकांची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्रातूनच ट्रकभर पिण्याचे पाणी बॉटल आपल्या सोबत घेऊन त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना आपल्या परिवारासह निःशुल्क वाटप…
Author: Saimat
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक कुटुंबे, लहान मुले व महिला रात्रीच्या वेळेस गणपती बघण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, अशा वेळी गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचे टोळके आढळून येत आहेत. काही वेळा या कुत्र्यांनी नागरिकांना चावा देखील घेतला असून अनेक लहान मुले जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. मुख्य परिवर्तन चौकासारख्या गजबजलेल्या भागातही या…
कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शौचालयात दारूच्या बाटल्यांचे तुकडे पडलेले आहे. तसेच यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात रोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कार्यालयातील शौचालयात घाणीचे साम्राज्यासह दारुच्या बाटल्यांचे तुकडे याठिकाणी पाहावयास मिळत आहे. याठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था नाही. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा या शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील शौचालयात कोणाचे लक्ष नसते का? असा प्रश्न…
वॉरंट रद्द करण्यासाठी मागितली लाच साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई भुसावळ परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती हाती आली त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले होते. हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.…
मोरीजवळील दुकानांचा रस्ता मोकळा करावा साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथील बेलव्हाळ चौफुलीवर असलेल्या मोरीच्या ठिकाणी खोदून ठेवलेले मातीचे ढिगारे रस्त्याच्या ठेकेदाराने दुकानासमोर लावल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून रस्त्यावरील मातीचा ढिगारा फेकण्यात यावा, अशी मागणी होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून सुनसगाव-गोजोरा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण होत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवतांना कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावर सुनसगाव नजीक बेलव्हाळ चौफुलीवर काही व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरु केली आहेत. याच ठिकाणी मोरीचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या मोरीच्या कामातून निघालेली माती याठिकाणी असलेल्या दुकानांसमोर टाकण्यात आली असून दुकानांकडे येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने दुकानदारांनी संबंधीत ठेकेदाराला याबाबत सांगूनही माती फेकली…
ग्रामपंचायतीला सफाई कामगार नसल्याने ग्रामस्थांचे हाल साईमत/भुसावळ /प्रतिनिधी : येथे बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालयात सांगूनही राहत्या घराजवळील गटारीचे काम होत नसल्याने तसेच गेल्या दोन वर्षापासून एकही सफाई कामगार गटारीची साफसफाई करण्यासाठी आलेला नसल्यामुळे, माझे कुटुंबातील सदस्य आजारी पडण्याची शक्यता असल्याचे कारण देत सुनसगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सतिश सुरेश पाटील यांनी आठ दिवसाच्या आत गटारीचे काम सुरु न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. माजी सरपंच सतिश पाटील यांच्या राहत्या घरापासून सतिश सिताराम पाटील यांच्या गोठ्याला लागून विकासोच्या मागील बाजूस ही गटार आहे. याबाबत सरपंचांना विचारले असता लवकरात लवकर गटार साफसफाई व बांधकाम करण्यात येईल,…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरात ऑटो रिक्षा चालकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याच्या माध्यमातून त्यांच्या रोजगाराच्या समस्यांवर लक्ष वेधले आहे. जळगाव शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवेच्या सुरुवातीमुळे ऑटो रिक्षा चालकांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी ई-बाईक टॅक्सीच्या खुल्या परवान्यांचे बंद करणे आणि ई-रिक्षांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. आंदोलकांनी पीएम ई-बस सेवासुरू करण्याचा निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी केली आहे. कारण, त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या ऑटो रिक्षा चालकांचे जीवनमान अधिक कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यात ऑटो रिक्षांचे खुले परवाने तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांनी ई-रिक्षा वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबतही मागणी केली आहे.…
साईमत मुंबई प्रतिनिधी केंद्रीय खेल राज्यमंत्री व भाजप नेत्री रक्षा खडसे यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडत असलेल्या वेव्स २०२५ (पहिला विश्व ऑडियो-विजुअल एंटरटेनमेंट शिखर सम्मेलन) मधील स्वदेशी खेलांच्या चर्चासत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमात तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि जागतिक मनोरंजन दृष्टीच्या एकत्रीकरणाद्वारे मीडिया क्षेत्राच्या भविष्यकाळाच्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांचे दर्शन घडले, असे त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. वेव्स २०२५चे स्वरूप: ४ दिवसीय या कार्यक्रमात वैश्विक मीडिया संवाद, क्रेता-विक्रेता बैठकी, उदयोन्मुख सर्जनशीलांसाठी मार्गदर्शन सत्रे आणि कथाकथनाचे नवे प्रारूप यावर भर देण्यात आला. रक्षा खडसे यांचा सहभाग: स्वदेशी खेलांच्या संवर्धनासंदर्भातील चर्चेत त्यांनी “युवा पिढीला परंपरागत क्रीडा प्रकारांशी जोडण्याच्या सरकारी योजना” यावर प्रकाश टाकला. तांत्रिक आणि सांस्कृतिक संमिश्र:…
अजित पवार गटात शरद पवारांच्या दिग्गज नेत्यांचा प्रवेश : राजकीय धक्का साईमत मुंबई प्रतिनिधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील दिग्गज नेते आणि समर्थकांनी समर्थकांसह अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने शरद पवार यांना धक्का बसला आहे. ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात नवीन वळण घडवून आणणार असून, तिच्या परिणामांची चर्चा सुरू झाली आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, कैलास पाटील, तिलोत्तमा पाटील, दिलीप सोनवणे आणि दिलीप वाघ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे. शरद पवार यांनी या घटनेबद्दल अद्याप स्पष्ट भूमिका मांडली नसली…
साईमत वृत्तसेवा मंत्री रक्षा खडसे यांनी हालच राजस्थानच्या कोटा येथे आयोजित जूनियर (U-20) राष्ट्रीय कुश्ती प्रतियोगितेच्या समापन समारोहात भाग घेतला, त्यामुळे त्यांना गर्वाने भरले आहे. या प्रतियोगितेत भाग घेणाऱ्या युवा खिलाडूंचे उत्साहवर्धन आणि खेल संस्कृतीचा विस्तार हीच त्यांची प्रेरणा आहे. कुश्ती हा एक अशा खेळ आहे जो सर्वसामान्य लोकांच्या मनात खास जागा असलेला आणि राजस्थान सरकरताच्या पातळीवर याचे आयोजन होत असल्याने ही बाब अनेकांना समाधानकारक वाटते. कोटा येथे होणारी कुश्ती स्पर्धा ही भारतभरातील विविध राज्यांमधील मुले आणि मुलींच्या सहभागाने अधिक चैतन्यपूर्ण बनते. राजस्थान राज्य कुश्ती संघाचे अध्यक्ष श्री राजीव दत्ता यांच्या नेतृत्वाखाली ही प्रतियोगिता आयोजित केली जात आहे. वर्ष 2025…