Author: saimat

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा घेतला लाभ, जिल्ह्यातून ८०० यात्रेकरूंचा सहभाग साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८०० यात्रेकरूंची लाॕटरी पध्दतीने निवड झाली होती. योजनेसाठी जिल्ह्यातून एक हजार १७७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात पहूर येथील ५४ भाविकांची निवड झाली. जामनेर तालुक्यातील १०५ भाविक अयोध्या दर्शन यात्रेत सहभागी झाले होते. विशेष वातानुकुलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे ८०० भाविकांना घेऊन ३० सप्टेंबर रोजी अयोध्येकडे रवाना झाली होती. भाविकांनी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदीरात रामलल्लाच्या मुर्तीचे दर्शन घेतले. यासह हनुमान गढी, दशरथ महल, कनक महल, लता मंगेशकर चौक अशा स्थळांना भेटी देऊन सायंकाळी शरयू नदीत स्नान करून शरयू मातेच्या महाआरतीत…

Read More

राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री अनिल पाटील साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. संत सखाराम महाराज हे अमळनेर प्रती पंढरपूर विठ्ठल रुखमाई वाडी संस्थानचे आद्यपुरुष असून संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा झेंडा हातात घेऊन फिरणारे ते एकमेव संत आहेत. महाराजांचे अमळनेर हे मुख्य स्थान असले तरी पंढरपूर पासून महाराष्ट्रभर महाराजांचे प्रस्थ असल्याने सर्वत्र त्यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत प.पू.संत श्री प्रसाद महाराज हे सखाराम…

Read More

आर्थिक विवंचनेतून संपविले जीवन, पहुर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : कर्जाचा वाढत जाणारा डोंगर आणि पशुपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना जामनेर तालुक्यातील लोंढरी बुद्रूक येथे घडली. जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८)असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. आर्थिक संकटावर मात व्हावी, यासाठी त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही त्यांना यश न आल्याने त्यांनी अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी…

Read More

बालकांच्या आहाराविषयी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी एकात्मिक बालविकास प्रकल्प दक्षिण जळगाव चाळीसगाव पाचोरा बीट क्रमांक १ अंतर्गत चाळीसगाव येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान हा कार्यक्रम अंगणवाडी प्रभागात नुकताच राबविण्यात आला. त्याची सांगता चौधरी वाडा येथे करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नगरपालिका दवाखान्यातील डॉ.अनुराधा खैरनार, माजी नगरसेविका विमलबाई चौधरी उपस्थित होते. तसेच बीटमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिसरातील इतर सदस्य उपस्थित होते यावेळी डॉ. अनुराधा खैरनार यांनी आहाराचे महत्व सांगितले. तसेच काळाबरोबर आहारातील कसा बदल करावा, बालकांना आहार त्याच्या आवडीनुसार कसा करून घ्यावा, तशी आहाराची पद्धत कशी बदल करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विमलबाई चौधरी यांनी आहार व बाळाचे एक हजार दिवस…

Read More

गुड शेपर्ड अकॅडमीच्या प्रसाद पाटीलची राज्यस्तरीय कला स्पर्धेसाठी निवड साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयात कला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत समूहगीत गायन, पारंपरिक कथा वाचन,शास्त्रीय सुरवाद्य वादन अशा कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरवाद्य वादन कला प्रकारात गुड शेफर्ड शाळेतील दहावीचा विद्यार्थी प्रसाद केशव पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी जळगाव जिल्ह्यातून निवड झाली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे संगीत शिक्षक तुषार मुजुमदार तसेच गौरव काळंगे, अजिंक्य त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक…

Read More

पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ मिळाल्याने लागली वर्णी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चाळीसगाव शहर प्रमुखपदी सागर रावण चौधरी यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. सागर चौधरी हे शिवसेना पक्षाचे २०१४ पासून ते आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच स्व.पप्पूदादा गुंजाळ यांचे खंदे समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून तालुक्यात शिवसेना पक्ष बांधणीसाठी मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ शिवसेना शिंदे गट जळगाव जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी सागर चौधरी यांची शहरप्रमुख पदावर वर्णी लागली आहे. जळगाव जिल्हाप्रमुख…

Read More

एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बकाऱ्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावर बबन आव्हाड यांनी पीएसआय गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पो.ह. संदीप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी अश्यांचे पथक तयार केले होते. नमुद पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. दाखल गु.र.क्र. २८१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा भवाळी, ता. चाळीसगाव येथील…

Read More

११ लाख ८२ हजार रुपयांचा घातला गंडा, सायबर पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या वाढल्या आहेत.ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा चुना लावला जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. आता असाच एक प्रकार जळगावमधून समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना ११ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी वसतकार यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एसएमआयटी कॉलेज परिसरातील संजय वसतकार हे ऑनलाइन ट्रेडिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जुलैत त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले होते. त्या ग्रुपमध्येअ‍ॅडमिन नारायण जिंदाल व चिन्मयी रेड्डी नामक…

Read More

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने समोर येत आहे. अशातच कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे ही घटना घडली आहे. सुरेश ओंकार विटे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मुक्ताईनगरातील रिगाव येथील सुरेश ओंकार विटे यांची शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे दोन ऑक्टोबरला…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात ७ ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 7 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Read More