सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वे–जिल्हा प्रशासनाने केली सविस्तर तयारी साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली. या बैठकीत आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी, प्रवासी सुविधा, वाहतूक नियोजन आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला. जिल्हाधिकारी घुगे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मेळ्याच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, सक्षम प्राधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण आणि भूसंपादनाची कार्यवाही अधिक गतीमान करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासन आणि…
Author: saimat
शैक्षणिक, निवासी व पायाभूत सुविधांचा सखोल आढावा घेतला. साईमत/भुसावळ/प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे कार्यरत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन विद्यालय परिसरातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, निवासी व पायाभूत सुविधांचा सखोल आढावा घेतला. भेटीदरम्यान विद्यालयातील अध्यापन व्यवस्था व शैक्षणिक सुविधा, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, क्रीडा साहित्य व क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा तसेच वाचनालयाची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, भोजन व दैनंदिन सोयीसुविधांची स्थितीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली. स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व…
नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. साईमत/शेंदुर्णी /प्रतिनिधी शेंदुर्णी शहरात नवीन बियरबार व वाइन शॉप सुरू करण्यास नगरपंचायतीकडून नाहरकत दाखले देण्यात आल्याच्या चर्चेमुळे उसळलेल्या तीव्र जनआक्रोशाला अखेर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत आणि भविष्यातही देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन नगरपंचायत प्रशासनाने दिल्यानंतर उद्या (दि. ६ फेब्रुवारी २०२६) होणारा नागरिकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नवीन वाइन शॉप व बियरबारसाठी नाहरकत दाखले देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली होती. या चर्चेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये, विशेषतः महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मद्यविक्रीमुळे शहरातील सामाजिक वातावरण…
अहुजा नगरात किरकोळ अपघात, साईमत/जळगाव /प्रतिनिधी जळगाव शहरातील अहुजा नगर परिसरात बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) दुपारी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने पुढील बसला जोरदार धडक दिल्याने किरकोळ अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल अभिमन सपकाळे (वय ३९, रा. बांभोरी, ता. धरणगाव) हे बुधवारी दुपारी १ वाजता बस क्रमांक एमएच १४ एमएन २९९० घेऊन जळगावहून धुळे रस्त्याने प्रवास करीत होते. जळगाव शहरातील अहुजा नगर येथील एकविरा हॉटेलजवळून बस जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्रमांक एमएच ४०…
आठ वर्षीय चिमुकलीच्या चेहऱ्यावर भीषण हल्ला साईमत/अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात बुधवारी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोन लहान मुलांवर केलेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत मृणाली दिनेश कोळी (वय ८) ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दोन हल्ल्यांमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृणाली ही सुट्ट्यांनिमित्त पिळोदे येथे आपल्या मामाच्या घरी आली होती. बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या गालावर व डोक्यावर अत्यंत क्रूरपणे चावा घेतल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे नागरिक…
सावदा शहरात आज पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान भीषण आगीची घटना घडून आली साईमत/सावदा/प्रतिनिधी सावदा शहरात आज पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान भीषण आगीची घटना घडून आली. विश्वसुद्धा हॉस्पिटलसमोरील परिसरातील पाच दुकाने काही तासांत जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत २५ ते ३० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच आग उग्र रूप धारण केली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, त्या अगोदरच दुकानदारांच्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर मालमत्ता पूर्णपणे जळून…
अर्धवट जळालेला मृतदेह पाहून परिसरात दहशत साईमत/एरंडोल/प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पद्मालय गणेश देवस्थानाजवळील जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात दिसून आले आहे की, या घटनेमागे नियोजनबद्ध खून असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकण्यात आला आहे. घटनास्थळी माहिती मिळाल्याप्रमाणे, पद्मालय ते नागदुली रस्त्यावर असलेल्या जंगलात काही गुराखी त्यांची गुरे चारवायला गेले होते. यावेळी त्यांनी जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या केवळ पायांचे अवशेष स्पष्टपणे दिसत होते, तर उरलेले अवयव अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. या घटनेची त्वरित माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आणि एरंडोल पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. घटनास्थळी त्वरित पोलीस पथक दाखल…
बिजासनी माता मंदिराजवळ मोटरसायकलींचा जोरदार धडक साईमत/ रावेर /प्रतिनिधी रावेर शहराजवळ आज दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुणांचा अकाल मृत्यू झाला. या घटनेमुळे रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून परिसर शोकाकुल वातावरणात बुडालेला आहे. माहितीप्रमाणे, रावेरजवळील बिजासनी माता मंदिराजवळ विनय भालेराव (वय २६) हा आपल्या मोटरसायकलवरून रावेरच्या दिशेने जात असताना, शुभम लोखंडे (वय २०) रावेरहून विवरकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलींचा समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेला विनय भालेराव तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात येत होता; मात्र रस्त्यातच त्याने देखील आपले प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा…
प्रवासी अडकले, गॅस टँकर अपघाताने उपद्रव साईमत/ पुणे /प्रतिनिधी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी घडलेल्या गॅस टँकर अपघातामुळे तब्बल २२ तास उलटून गेले तरीही वाहतूक सुरळीत झालेली नाही. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा अपघात केवळ एक्स्प्रेस वेपुरताच मर्यादित न राहता जुन्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गालाही फटका बसला आहे. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून हजारो प्रवासी रात्रीपासून रस्त्यावरच अडकले आहेत. २२ तासांहून अधिक काळ वाहतूक न हलल्याने प्रवाशांचे हाल झाले असून खाणे-पिणे, पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा तणाव निर्माण झाला आहे. या…
मुलीला धमकावून महिलेवर बलात्कार साईमत/पाचोरा /प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील एका गावात एका २३ वर्षीय विवाहितेवर मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. बाळू काळू राठोड या आरोपीवर मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन जात धमकी दिली, “मी तुझे बरेवाईट करेन.” या भीतीखाली त्याने महिलेला पाचोरा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. पण आरोपी थांबला नाही; पीडितेची बदनामी करण्याची धमकी देत तिला अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील दुसऱ्या हॉटेलवर नेऊन पुन्हा अत्याचार केला. ही घटना ऐकून परिसरात संतापाची लाट उठली असून, नागरिक…