विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महापौर दिपमाला काळे यांचे कडक आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या बोर्ड परीक्षांचा कालावधी सुरू असताना शहरातील क्रिकेट प्रीमियर लीगमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम टाळण्यासाठी महापौर दिपमाला काळे यांनी ध्वनीक्षेपकांच्या (लाऊड स्पीकर) आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. सध्या संपूर्ण राज्यात उच्च माध्यमिक बारावीची परीक्षा सुरू असून, येत्या २० फेब्रुवारीपासून माध्यमिक दहावीच्या परीक्षांनाही प्रारंभ होत आहे. शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीत शांततेचे वातावरण राखणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, याच काळात शहरातील जी.एस. ग्राऊंड…
Author: saimat
जळगावमध्ये बर्निंग कारचा थरार दोन्ही गाड्या जळून खाक साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पाचोरा रोडवरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय समोर गुरुवारी रात्री भीषण अपघात घडून दोन कार जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, कारमधील तरुणांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. ही घटना रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास घडली. समोरासमोर धडकेत भीषण अपघात मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा रोडवरून दोन कार एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत होत्या. रायसोनी महाविद्यालयासमोर दोन्ही चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. धडक झाल्यानंतर…
रॉंग साईडचा जीवघेणा खेळ एक ठार – दोन गंभीर जखमी साईमत/मुक्ताईनगर /प्रतिनिधी: मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील हॉटेल महिंद्रा फाट्याजवळील हनुमान मंदिरासमोर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा कारने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एमपी ६३ झेडए ६७२५ क्रमांकाची दुचाकी चुकीच्या बाजूने (रॉंग साईडने) येत होती. या दुचाकीवर तिघेजण स्वार होते. त्याच वेळी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे येणारी एमएच ४१ सी ५२९० क्रमांकाची इनोवा कार…
सांडपाणी निचऱ्यासाठी मोरीचे काम हाती, वाहतुकीत बदल साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील नेरी नाका परिसरात आजपासून तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आले असून महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम स्मशानभूमी जवळील एसटी वर्कशॉप ते काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी, दिनांक ६ फेब्रुवारीपासून हा मार्ग बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसटी वर्कशॉप परिसरात पावसाळ्यात तसेच दैनंदिन सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रस्तावित रस्ता बांधकामापूर्वी सांडपाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी मोरी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या प्रक्रियेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खोदकाम होणार आहे. त्यामुळे…
शासनाच्या दुर्लक्षाविरोधात धरणे आंदोलन साईमत/जळगाव/प्रतिनिधी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, या आंदोलनात शंभर टक्के सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत या संहिता कामगारविरोधी असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामगार व कर्मचारी हिताचे विद्यमान कायदे रद्द करून लागू करण्यात आलेल्या या श्रम संहिता तात्काळ रद्द कराव्यात, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतन, सेवा-सुरक्षा व…
कारच्या भीषण अपघातात जळगावचे दोन तरुण जागीच ठार, पाच जखमी साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : पाचोरा ते जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मंगळवार दि. ५ रोजी मध्यरात्री सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात जळगाव शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तात्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पाचोरा–जळगाव…
चौथ्या मजल्यावरून पडताना पहिल्या मजल्यावर अडकल्याने १८ जणांचे प्राण वाचले साईमत/मालेगाव/प्रतिनिधी : मालेगाव महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया संपताच महापालिका इमारतीत घडलेल्या गंभीर घटनेने एकच खळबळ उडाली. इमारतीतील प्रवासी लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक कोसळली. मात्र सुदैवाने लिफ्ट थेट तळमजल्यावर आदळण्याआधीच पहिल्या मजल्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी लिफ्टमध्ये एकूण १८ जण प्रवास करत होते. चौथ्या मजल्यावरून खाली येताना लिफ्ट वेगाने कोसळू लागली, मात्र पहिल्या मजल्यावर तिचा दरवाजा अडकल्याने ती तिथेच थांबली. काही क्षण सर्वांसाठी भीतीचे होते, मात्र याच घटनेमुळे…
मक्याच्या आड गांजाची शेती! गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांची पहाटे धडक; एक बिघा क्षेत्र उध्वस्त साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील गडखांब शिवारात अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त करण्यात आली असून ओला व सुका गांजा जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी गडखांब येथील शेतकरी सुरेश लोटन पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गडखांब शिवारातील गट क्रमांक २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केली आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांची परवानगी घेतली. कारवाईसाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना…
उपचारासाठी निघालेल्या दुचाकीवर मृत्यूची धडक साईमत/चोपडा /प्रतिनिधी : “वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी निघालो आणि स्वतःच काळाच्या तावडीत सापडलो…” अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली. घार्डी फाटा परिसरात शुक्रवारी भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आजारी वडिलांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान वडिलांनीही अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी अपघातामुळे लासुर गावावर शोककळा पसरली आहे. चोपडा तालुक्यातील लासुर येथील रहिवासी मोहम्मद लुकमान ठोके (वय ४२) हे आपले वृद्ध वडील लुकमान मुसेखा ठोके (वय ७४) यांना उपचारासाठी दुचाकीने जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन जात होते. घार्डी फाटा परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने…
महाबळ कॉलनी पोलीस चौकीजवळील रोडवर उभी केली होती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चोरट्यांनी पोलीस चौकीजवळील परिसरालाच लक्ष्य केले आहे. महाबळ कॉलनी पोलीस चौकीच्या अगदी जवळील रोडवरून चोरट्यांनी २ लाख ७० हजार रुपये किमतीची पांढरी ‘महिंद्रा मॅक्सिमो’ मिनी व्हॅन लंपास केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी तुषार उदय वाणी (वय २८, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपली मॅक्सिमो मिनी व्हॅन (क्र. MH 04 GE 5669) नेहमीप्रमाणे महाबळ कॉलनी पोलीस चौकीजवळील रोडवर उभी केली होती. ३ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे ६ वाजेच्या…