फैजपूर ः प्रतिनिधी येथील मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यंदा बारा गाड्या पाहण्यासाठी आणि मरीमातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंपरागत पध्दतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी म्हणजे दुपारी शहरातील अंबिका देवी मंदिरात विधिवत पूजा अभिषेक होऊन न्हावी दरवाजापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जाऊन म्युनिसिपल हायस्कूलजवळील बारागाड्यांना भगत संजय कोल्हे यांनी प्रदक्षिणा घालत म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक दरम्यान बारागाड्या ओढल्या. यावेळी मरीमातेचा जल्लोष करण्यात आला. कुठलाही अनुचित व अप्रिय घटना न घडता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यशस्वी पार पडला. बारागाड्या ओढल्यानंतर भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण बाहेरपेठ मधील मरीमातेच्या…
Author: Kishor Koli
मलकापूर : प्रतिनिधी नांदुरा तालुक्यातील काही अंतरावरील दहिवडी ते केदार रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केदार येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. दहिवडी ते केदार या रस्त्यावर वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर दहिवडी, केदार, भिलवडी, बुर्ती, खुमगाव, धाडी, मामुलाडी, जिगाव नवे, जीगाव रस्त्याला लागणारी आदी गावे येतात. या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो नागरिक वाहनांची ये-जा होत आहे. लोडिंगचे ट्रक जिगाव प्रकल्पासाठी जात आहे. रेल्वेच्या कामासाठी जाणारे ट्रक पाणीपुरवठा विभागाअंतर्गत पाण्याची टाकीचे काम धाडी येथे जात असलेले लोडिंगचे ट्रक तसेच रेल्वेच्या पुलाच्या कामासाठी लोडिंगचे जाणारे…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी सराईत गुन्हेगार तपासणीसाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वेळोवेळी नाकाबंदी लावली होती. त्यामुळे येथील सुज्ञ नागरिकांनी गोपनीय माहितीवरून पोलीस कॉन्स्टेबल धर्मेंद्र ठाकूर आणि रवींद्र धनगर यांना सांगितले की, मुक्ताईनगर शहरात एक माया नावाचा व्यक्ती हा गावठी कट्टा आपल्याजवळ बाळगत आहे. त्यातून एखादा गंभीर गुन्हा होऊ नये म्हणून धर्मेंद्र ठाकूर, रवींद्र धनगर यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी पी.आय.नागेश मोहिते यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी लगेच आदेश देऊन पी.एस.आय. प्रदीप शेवाळे, मोतीलाल बोरसे, प्रशांत चौधरी, यांची टीम पाठवून शिताफीने रवींद्र उर्फ माया तायडे याला ताब्यात घेऊन ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा त्याच्याकडे आढळून आला. त्यासंदर्भात…
कोलकोता ः वृत्तसंस्था गेमिंग लॅपटॉप विकत घेण्यासाठी मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी या सगळ्यांनी आपल्या आठवीत शिकणाऱ्या मित्राचे अपहरण केले. या मित्राचे आई वडील खंडणीसाठी मागितलेले तीन लाख रुपये देऊ शकले नाहीत. त्यामुळे मित्रांनीच त्यांच्या मित्राला गळा आवळून ठार केले. त्याआधी त्याची रसगुल्ला खाण्याची शेवटची इच्छाही पूर्ण केली. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. मित्रांना भेटायला गेलेला मुलगा परतलाच नाही या घटनेत ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार,मित्रांना भेटायला जातो असे सांगून मुलगा घराबाहेर पडला होता मात्र तो घरी परतलाच नाही. पश्चिम बंगालच्या नादिया या जिल्ह्यात आठवीमध्ये शिकणारा हा मुलगा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी…
संभाजीनगर ः प्रतिनिधी विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया यांचा खामगाव येथे शिव -बाल- किशोर -युवा साहित्य संमेलनात तापी- पूर्णा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, शाल, गुच्छ व रोख रक्कम प्रदान करून संमेलनाध्यक्ष लता गुठे, पविणा शहा, डॉ.शिवचरण उज्जैनकर, डॉ. प्रवीण क्षीरसागर, इतिहासकार संशोधक किशोर वानखेडे, श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. उज्जैनकर फाउंडेशनचा हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डी .बीं. नी संयोजक व उपस्थितांचे कृतज्ञता पूर्ण आभार आपल्या मनोगतात मांडले .ते म्हणाले की, हा मानाचा पुरस्कार “ ही अक्षरेच आता सारे प्रमाण माझे’ या जिद्दीने लेखन करायची प्रेरणा देत राहील. श्री. जगतपुरिया…
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र बघायला मिळाले. दादा तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा, संघटना काय असते ते दाखवून देऊ, असे कार्यकर्त्यांनी त्यांना आवाहन केले. बारामतीमधील शारदा प्रांगण येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे बारामतीत स्वागत केले. बारामतीमध्ये अजित पवारांचा रोड शो देखील झाला होता. या रोड शोच देखील जय पवार यांनी तोंडभरून कौतुक केले. अवघ्या बारामतीकरांचे त्यांनी आभार मानले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार आणि जय पवार हे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभेवेळी मावळमधून पार्थ पवार यांना राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न अजित पवार…
जळगाव : प्रतिनिधी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती असलेल्या २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने या दिनाचे औचित्य साधून सोमवारी राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ८५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी खेळाडूंच्या सन्मानार्थ ‘बियाँड द बाउंड्रीज स्पोर्ट वारीयर्स ‘ या विषयावर आधारित एक म्युझिकल ंॅश मॉब सादर केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तब्बल १५ मिनिटे सादर केलेल्या या कार्यक्रमात विविध क्रीडा गीतांवर नृत्ये प्रस्तुत करण्यात आली. यावेळी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हा कार्यक्रम बघितला व टाळ्यांचा वर्षाव करत वातावरणातील उत्साह वाढवला. आपल्या देशाचे नाव उंचवनाऱ्या खेळाडूविषयीचे प्रेम…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक असलेले एकूण ७४ मुख्याध्यापकांचा सन्मान राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त शहरातील सद्गुरू शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके, माजी महापौर सीमाताई भोळे, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, महानगरपालिका क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, खो-खोचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, ग.स.सोसायटीचे संचालक अजय देशमुख, ग.स.सोसायटीच्या विद्या प्रबोधिनीचे चेअरमन मंगेश भोईटे,जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ विजय पाटील, महाराष्ट्र इंडीयाका स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.हाजी इकबाल मिर्झा, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांंत कोल्हे यांची…
ठाणे : वृत्तसंस्था बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उमटले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार असा उल्लेख करत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर…
कोल्हापूर ः वृत्तसंस्था साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईचे भक्तांसाठी कोरोना काळापासून पितळी उंबराच्या बाहेरून सुरू असलेले दर्शन हे आता उद्यापासून गाभाऱ्यातून सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली असून यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून लांबून आईचे सुरू असलेेलेे दर्शन हे आता भक्तांना गाभाऱ्यातून घेता येणार असल्याने भक्तांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भक्तांना आईचे दर्शन जवळून व्हावे यासाठी गाभाऱ्यातून दर्शन देण्याची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आली होती मात्र कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही रांग बाहेरून म्हणजे…