वरणगाव : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात दंत व नेत्ररोग अशा दोन डॉक्टरांची वर्षभरापासून रुग्णांना उणीव जाणवत आहे. त्यामुळे दंत व नेत्ररोग डॉक्टरांअभावी गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘झोपेचे सोंग’ घेणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील आरोग्य विभागाला जागृत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वरणगाव शहर व परिसरातील खेड्यांमधील गरजू रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी वरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. सुसज्ज इमारतीसह रुग्णालयात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये नेत्ररोग व दंतरोग विभागाचाही समावेश आहे. इमारतीत त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केले…
Author: Kishor Koli
मास्को : वृत्तसंस्था रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाचे कौतुक केले आहे तसेच रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, असेही नमूद केलं. ते ८ व्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते. दिल्लीत झालेल्या जी२० परिषदेला गैरहजर असलेल्या व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. व्लादिमीर पुतिन म्हणाले, “याबाबत रशियाच्या सहकारी देशांकडून शिकण्यासारखे आहे. यात भारताचे नाव घ्यावे लागेल. त्यांंनी भारतात उत्पादित केलेल्या कार आणि जहाजांच्या उत्पादनावर आणि वापरावर प्रामुख्याने लक्ष केंंद्रित केले आहे. “यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना भारतात तयार झालेल्या ब्रँडच्या वापराला प्रोत्साहन देऊन योग्य गोष्ट करत आहेत.रशियातही ती वाहनं उपलब्ध आहेत आणि आपण…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटू लागले असून ठाकेर गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तो ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. या व्हिडीओवर राजकीय प्रतिक्रया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्या व्हिडीओवरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. दरम्यान, या व्हिडीओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे त्यांची मराठा आरक्षण प्रश्नाबाबतची अनास्थाच दर्शवत असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे.…
कोलंबो ः वृत्तसंस्था आशिया कप २०२३ सुपर फोर सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळला गेला.या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला पण भारत आणि श्रीलंकेच्या या सामन्यानंतर स्टेडियममध्ये जोरदार मारामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. भारत आणि श्रीलंकाचे चाहते एकमेकांना भिडले आहेत.श्रीलंकेच्या पराभवानंतर लंकेचे चाहते संतापले होते.सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेचे चाहते भांडत आहेत. भारतीय संघाने सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला असून, त्यानंतर संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे पण श्रीलंकेच्या या पराभवामुळे लंकेचे चाहते चांगलेच संतापले. त्यानंतर भारत…
सोयगाव : प्रतिनिधी बदलत्या काळात तरुण ऑनलाईन गेमिंगच्या पाठीमागे असल्यामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु आपल्याकडे आजही मैदानी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी खेळात प्राविण्य मिळवितात, हे पाहून आनंद झाला असल्याचे प्रतिपादन अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप, डॉ. महेश राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.…
फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी येथील ‘राजमुद्रा’ सेवाभावी ग्रुपतर्फे मधुकर सहकारी साखर कारखाना ते न्हावी मार्ग रस्त्याने वृक्षारोपण करण्यात आले. त्यात वड, पिंपळ, कडुनिंब, बहावा, जांभुळ, रामफळ अशा उपयुक्त झाडांच्या २५ कलमा लावण्यात आल्या. कार्यक्रमाला ‘राजमुद्रा’ ग्रुपमधील किरण मोरे, प्रवीणदास महाराज, वीरेंद्र जैन, सुजित गलवाडे, मयूर जैन, मेहुल जैन, प्रशांत भावसार, करण सितापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘राजमुद्रा’ ग्रुपचे कार्यकर्ते दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन यशस्वी करतात. ‘राजमुद्रा’ ग्रुपच्या स्तुत्य कार्याचे सर्वांनी कौतुक केले.
फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांनी फैजपूर येथे लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी पशु चिकित्सक डॉ. प्रमोद सुरवाडे (पशुैद्यकीय दवाखाना, फैजपूर) यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी या भागातील अनेक जनावरांची तपासणी कृषी कन्यांनी केली. लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग किटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो. या आजाराची लक्षणे लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून…
बोदवड : प्रतिनिधी येथील जागृत मरीमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक संस्था आर.एस.आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई यांच्या सहकार्याने देविदास राखुंडे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या नारीशक्ती सन्मान पुरस्कार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरणाचा सोहळा बोदवड येथील सावरिया लोन खंडेलवाल पेट्रोल पंपाजवळ नुकताच झाला. यावेळी आ.चंद्रकांत पाटील, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके उपस्थित होते. सोहळ्यात बोदवड येथील २० आशा वर्कर, १२ अंगणवाडी सेविका, ७ नगरसेविका यांचा तर मुंबई येथील २८ महिलांचा सन्मान तर ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, उपनगराध्यक्षा रेखा गायकवाड, न.ह.राका हायस्कूलचे…
सोयगाव : प्रतिनिधी सोयगाव तहसील धान्य पुरवठा विभागाकडून जरंडी रेशन दुकानाला धान्य पुरवठा करण्यात येतो. मात्र, तहसील धान्य पुरवठा सोयगाव येथून गहू व तांदूळच्या गोण्यामधील धान्य कमी करून रेशन दुकानाला पुरवठा करण्याचा प्रकार जरंडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या नजरेस आणून दिला आहे. सोयगाव धान्य गोडावूनवरून सर्व तालुक्यातील रेशन दुकानावर गहू आणि तांदुळ पाठविला जातो. गहू आणि तांदुळाची गोणी पन्नास किलोची भरती असतांना ती चक्क 42 किंवा 46 किलोची रेशन दुकानदाराला मिळत आहे. त्यामुळे गावातील रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित राहतात. असाच प्रकार जरंडी येथे घडला आहे. सोयगाव धान्य पुरवठा विभागाकडून धान्य गोणींच्या वजनातील कपातीमुळे जरंडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे जरंडीचे ग्रामस्थ…
मुंबई ः प्रतिनिधी मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स करून तीन कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्चदाब वीज ग्राहकावर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली असून हा वीज चोरीचा प्रकार पनवेल शहरात उघडकीस आला आहे. पनवेल शहरातील भरारी पथकाच्या वतीने वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु असतांना बीएचरोड वरील दत्ता भोईर या उच्चदाब ग्राहकाच्या चिली हॉटेलची तपासणी केली असता भरारी पथकाला अनियमितता आढळून आली. या ग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटरची रिडींग रिव्हर्स करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्युत कायदा 2003 मधील कलम 135 मधील तरतुदीनुसार ग्राहकाने वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत ही वीज चोरी सुमारे तीन कोटी रुपयांची असल्याचे…