कोलंबो ः वृत्तसंस्था
आशिया कप २०२३ सुपर फोर सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळला गेला.या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला पण भारत आणि श्रीलंकेच्या या सामन्यानंतर स्टेडियममध्ये जोरदार मारामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. भारत आणि श्रीलंकाचे चाहते एकमेकांना भिडले आहेत.श्रीलंकेच्या पराभवानंतर लंकेचे चाहते संतापले होते.सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेचे चाहते भांडत आहेत.
भारतीय संघाने सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला असून, त्यानंतर संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे पण श्रीलंकेच्या या पराभवामुळे लंकेचे चाहते चांगलेच संतापले. त्यानंतर भारत आणि लंकेच्या चाहत्यांमध्ये मारामारी झाली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की, एक लंकन फॅन कसा भारतीय फॅनच्या जवळ जातो आणि भांडायला लागतो, त्यानंतर दोघेही एकमेकांना धक्काबुक्की करू लागतात.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये श्रीलंकन चाहत्याने प्रथम भारतीय चाहत्याला शिवीगाळ केली आणि नंतर त्याला धक्काबुक्की केली. कोलंबोच्या स्टेडियममध्ये बसलेल्या इतर चाहत्यांनी आरोपी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो मारामारी करतच राहिला.