कोल्हापूर : वृत्तसंस्था एचडी कुमारस्वामी यांनी एच.डी. देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे अमित शहा व जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे तथापि भाजपाशी युती ही भूमिका महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जनता दल सेक्युलर कार्यकर्त्यांना मान्य नाही,अशी भूमिका प्रदेश जनता दलाने घेतली आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील सर्व राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारीणी सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक पुणे येथे शनिवार 30 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील भूमिका, धोरण व निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती या बैठकीचे निमंत्रक प्रताप होगाडे, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. विलास सुरकर,श्रीमती साजिदा…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज ओबीसी समाजाबद्दल बोलतात. पण, ओबीसी समाजाबद्दल पंतप्रधान मोदींनी काय केलं? असा सवाल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. देशात पाच टक्के ओबीसी समाज आहे, हे मान्य करू. पण, पाच टक्कयांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, हे कळलं पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर केल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी भाजपाला दिला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी ओबीसी समाजासाठी खूप काही केल्याचं सांगतात. पंतप्रधान एवढे काम करतात, तर ९० मधील फक्त ३ सचिव ओबीसी समाजातून का आहेत? भारतातील…
अमरावती : वृत्तसंस्था दरवर्षी २३ सप्टेंबर आणि २१ मार्च हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. उद्या शनिवारी ही स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे. या दिवशी पृथ्वीचे दोन्ही गोलार्ध शनिवारी सूर्यापासून समान अंतरावर राहतात. या शिवाय अन्य दिवशी नेहमीपेक्षा लहान-मोठे राहत असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक प्रवीण गुल्हाने आणि विजय गिरूळकर यांनी दिली. दिवस व रात्रीची असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासांपेक्षा मोठा व रात्र १२ तासांपेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिला आरक्षणाचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडी काहीशा थंडावल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातले राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणीत चालढकल केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना परखड शब्दांत सुनावले आहे. यानंतर आता सुनावणी प्रक्रियेला वेग आला आहे. मात्र, त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. परिषदेतील आमदारही अपात्र होणार विधानसभेतील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल लागून ते अपात्र होतीलच. पण आमच्या म्हणण्याप्रमाणे वरच्या सभागृहातले तीन आमदारही अपात्र होणार आहेत, असे अनिल परब…
यावल : प्रतिनिधी यावल शहराच्या वाढीव हद्दीत विकसित कॉलन्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी यावल नगरपालिकेतर्फे २ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावाचे बांधकाम केले. आणि कॉलनी भागात २ कोटी २९ लाख रुपयाची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. या दोन्ही कामांमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान स्थापत्य अभियंता योगेश मदने आणि सोलापूर येथील अनिल शामराव पाटील, अमळनेर येथील एस.कुमार कन्स्ट्रक्शन यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची लेखी तक्रार माजी नगराध्यक्ष नौशाद तडवी तसेच माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे आणि पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तत्कालिन, जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१४ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्रीसदस्यीय समिती नियुक्त केली होती. तसेच या समितीने ३०…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव,सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आढळणारा, आणि कल्पवृक्ष म्हणुन सुपरिचित असलेल्या महु झाडाच्या फुलांपासून बनणारी दारू ही अवैध, गावठी प्रकारातील म्हणुन ओळखली जाते. ही दारू पाडणारे आदिवासी कुटुंब आणि पिणारे दोघांनाही लपुनछपून व्यवहार करावा लागतो. पण औषधी गुणधर्म असलेल्या महु फुलांपासून शास्रशुध्द पध्दतीने वाईन बनवली गेली तर नाशिकच्या द्राक्ष वाईनप्रमाणे महु फुलांच्या वाईनचा देखील एक मोठा ब्रँड तयार होईल. जर कुणी असा प्रकल्प करण्यास पुढे येत असेल तर फ्रुट वाईनच्या धतीॅवर जिल्हाधिकारी म्हणुन परवानगी देण्यास मी तयार आहे, अशी माहिती आयुष प्रसाद यांनी ‘साईमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ज्या गोष्टीला अधिकृत म्हणुन मान्यता…
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले.आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती. प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी आणि अभिनेत्री सुझान बर्नर्ट शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होते.ही बातमी ऐकून ती तातडीने परतली. रिपोर्टनुसार, ५८ वर्षीय अभिनेते स्वयंपाक घरात काम करत होते आणि त्याठिकाणी ते घसरले. अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुरुवातीला असे समोर आलेले की ते बाल्कनीजवळ काम करत होते आणि उंच इमारतीमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला मात्र आता समोर आले की, स्वयंंपाक घरात घसरुन पडले होते. या घटनेनंतर पार कोलमडून…
जळगाव : प्रतिनिधी सी. के. पी. सोशल क्लबच्या वतीने कै. कृष्णाकर टिपणीस यांच्या स्मरणार्थ ३ ऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन सी.के.पी. हॉल, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे करण्यात आले आहे.३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात येणारी ही स्पर्धा सी.के.पी.न्यातीगृह यांनी पुरस्कृत केली असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संंघटनेशी संपर्क साधावा,असे आवाहन मानद सचिव अरुण केदार यांच्यासह जळगाव कॅरम असो.चे श्याम कोगटा,नितीन बरडे व…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था कांँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान ते देशभरातल्या असंख्य लोकांना भेटले. अलिकडेच त्यांनी अवजड वाहनचालकांबरोबर, भाजी विक्रेत्यांबरोबर एक दिवस घालवला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी यांनी हमालांचा लाल रंगाचा शर्ट परिधान करून एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेतली. राहुल गांधी यांंनी हमालांचा लाल शर्ट परिधान केला, हमालांचा अधिकृत नंबर असलेला बिल्ला (बॅच) दंडावर बांधला. तसेच एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेऊन काही अंतर चालले तसेच…
जळगाव साईमत प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे लोकेशन हे विकासाच्या सर्वच दृष्टीने सकारात्मक आणि उपयुक्त आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने जर परिश्रम, संघर्ष केला तर विकासाच्या जागतिक नकाशावर जळगाव जिल्हा निश्चितच आघाडीवर राहील. या जिल्ह्यात आज रेल्वे, महामार्ग, वीज विमानसेवा, जागा सर्वच उपलब्ध आहे. जळगाव जिल्हा तसा विकसित आहे. स्थानिक जळगावकरांनी मनात आणले तर हा जिल्हा अतिविकसित व्हायला वेळ लागणार नाही, मी जिल्हाधिकारी म्हणुन तसा प्रयत्न करणार आहे, केवळ प्रत्येक जळगावकराने लहान विचार न करता, काही तरी वेगळे आणि मोठे करण्याचा विचार करावा. त्यानंतर बदल आपोआप दिसतील, असे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, साईमत ‘शी बोलताना व्यक्त केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते…