नवीदिल्ली : वृत्तसंस्था इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचे फोन केंद्र सरकार हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे इशारेवजा संदेश ॲपल कंपनीकडून या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. “कदाचित राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे”, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश आहे.या नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. नेमकं काय घडतंय? तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सध्या ‘कॅश फॉर ोश्चन’ प्रकरणात आरोप…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शिंदे-फडणवीस-पवार हे ट्रिपल इंजिन सरकार कोंंडीत सापडले असताना उद्धव ठाकरे यांनी आता या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेचण्याच्यादृष्टीने डाव टाकला आहे. महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात निर्माण झालेली अस्वस्थता पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यानंतरही पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढायला तयार नसतील तर महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्री आणि ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपवर हल्ला चढवला. मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीच्या काल झालेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित…
जळगाव : प्रतिनिधी तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. यासंदर्भात नोटीसा डकविण्यात आलेल्या असून संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली आहे. जिल्हा बँकेने सन २००२ मध्ये महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.लि. जळगांव यांना ८ कोटीचे कर्जवाटप केलेले होते. कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने वारंवार तगादा लावला. त्याशिवाय संचालक मंडळाने दीड वर्षाची एक कमी परतफेड योजना (ओटीएस) सुविधा देवून सुध्दा संस्थेने कर्जाची परतफेड केलेली नाही. २०१९ मध्ये सहकार न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये प्रमाणपत्र मिळवून वसुलीसाठी बँकेने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेचा फैसलाही ३१ जानेवारीपर्यंत द्यावा, असेही सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने वारंवार सूचना दिल्या होत्या. सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसारही आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा अवधी लागणार आहे.…
मुंबई : प्रतिनिधी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने दाखले दिले जातील. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून टिकणारे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. या समितीने आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील तपशील मांडत घोषणा केली. दरम्यान, पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचं सांगत सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत, असा पुनरुच्चार करत अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? मराठा समाजाला…
तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था मनोरंजन विश्व हादरवणारी घटना सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी घडली.मल्याळम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रेंजूषा मेनन तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.३५ वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या श्रीकार्यम, तिरुअनंतपुरम याठिकाणी असलेल्या फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यामागचे कारण काय, अभिनेत्रीने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेंजूषा मल्याळण मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखीचा चेहरा आहे.तिने अनेकदा चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. रेंजूषा शेवटचे ‘आनंदरागम’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘वरण डॉक्टरनू’ या मालिकेतही ती विनोदी भूमिका साकारत होती. तिने ‘एंटे माथावू’, ‘मिसेस…
बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी(अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जमावाने सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढला. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्नही केला पण संतप्त झालेल्या जमावाने सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. नंतर पार्किंगमधील गाड्या फोडल्या आणि पेटवून देण्यात आल्या.यावेळी प्रकाश सोळंके घरातच असल्याचे सांगण्यात येत आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त…
जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी गावागावात साखळी उपोषणाचे रुपांतर आज आमरण उपोषणात झाले आहे. मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून पोटात अन्नपाणी नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे बोलणे मंदावले आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार न घेण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान ‘जरांगे सरकार’ साठी मंत्रिमंडळाच्या आरक्षण समितीची आज (सोमवारी) मुंबईत बैठक होत आहे.त्यातून काही तोडगा निघतोय काय,याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तथापि आज दिवसभर राज्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक तितक्याच तीव्रतेने समोर आला. साखळी उपोषण आणि आमरण उपोषणासाठी मराठा बांधवांनी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला परवानगीचे अर्ज द्या म्हणजे सरकारला माहीत होईल की…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोढरे शिवारातील शेती खरेदीच्या व्यवहारातील रक्कम परस्पर काढून फसवणूक करून महिलेचा खून केल्याचा आरोपाखाली उच्च न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ९ जणांसह अन्य अनोळखी ४ जण असे १३ संशयितांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोढरे शिवारातील सोलर कंपनीला जमिनी विकल्या गेल्या त्यात बरेच गुन्हेदेखील दाखल झाले आहेत अशा गुन्ह्यांतील एक संशयित आरोपी गुलाब बाबू राठोड याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत तो सोलर कंपनीत ठेकेदार म्हणून काम बघत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मदन उत्तम राठोड (५४ रा. करगांव तांडा (इच्छापूर) नं. ३, ता. चाळीसगांव. ह.मु. ओम रेसिडेन्सी, नवीन पनवेल आकुली, जि. रायगड)…
नागपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत.अजित पवारांनी त्यांचे अनेक नियोजित कार्यक्रमही रद्द केले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.अशातच अजित पवारांचे सहकारी आणि माजी केंंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या सार्वजनिक कार्यक्रमांंमधील गैरहजेरीबद्दल मोठी माहिती दिली आहे.अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. अजित पावारांची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून अजित पवारांना डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. पुढील काही दिवस अजित पवारांवर वैद्यकीय उपचार केले जातील. तसेच त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला…