नवीदिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फूटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा सांगण्यात आला होता. आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात राष्ट्रवादी वरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी सुरू झाली आहे. आजची सुनावणी सुमारे पाऊन तास झाली तर पुढील सुनावणी शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अजित गटाने चुकीची शपथपत्रे दाखल केले आहेत.सुनावणी झाल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी माध्यमांशी संवाद साधला.ते…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलने करीत आहेत. याचीच दखल घेऊन राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करत असलेल्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्द ऐरणीवर असताना आपल्याही आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी इच्छा धनगर समाज बांधवांची आहे. त्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात सुरुवातीला शिक्षकांची पन्नास टक्के रिक्त पदे भरले जातील. आधार व्हेरिफिकेशन संदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर 80 टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल. अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज फैजपूर येथे दिली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या 62 व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा फैजपूर येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील होते. आमदार शिरीष चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील,मागील अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष माने, उपाध्यक्ष महेंद्र गणपुले, विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक…
अहमदाबाद : वृत्तसंस्था विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 6 गडी राखून पराभव झाला . रविवारी ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या पराभवाने भारतीय चाहत्यांना 2003 च्या विश्वचषक फायनलची आठवण करून दिली. 20 वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये कांगारूंनी भारताचा 125 धावांनी पराभव केला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 240 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 43 षटकांत 4 गडी गमावून 241 धावांचे लक्ष्य गाठले. ट्रॅव्हिस हेडने 137 धावांचे शतक झळकावले, तर मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. त्याआधी मिचेल स्टार्कने 3 तर कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 241 धावांच्या लक्ष्याचा…
पुणे : प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथील गोविंदबागेमध्ये भेट घेतली. ‘आमच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली. पण, ती इथे सांगणे योग्य नाही. राजकारणात काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागतात. सर्व नियोजन उघडे केले तर समोरच्याला माहिती पडेल’, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. बारामती येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी वडेट्टीवार शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी होते. सकाळी वडेट्टीवार यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मात्र, चर्चेचा तपशील समजू शकला नाही. त्यानंतर पवार यांच्यासमवेत वडेट्टीवार यांनी कृषी विकास केंद्राच्या इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली. वडेट्टीवार म्हणाले,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विद्यमान सामाजिक पद्धतींबरोबर तणाव निर्माण होतो, या कारणासाठी आपण संवैधानिक नैतिकता नाकारू शकत नाही, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीश म्हणून ९ नोव्हेंबररोजी न्या. चंद्रचूड यांना एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आपली मते मांडली. संविधानाच्या नजरेतून विद्यमान भारतीय संस्कृतीकडे पाहिल्यास विरोधाभास निर्माण होऊ शकतो. आपली राज्यघटना दुसऱ्याचे अनुकरण असल्याचेही बोलले जाते. याबाबत न्या. चंद्रचूड यांना विचारले असता ते म्हणाले, की काही संवैधानिक मूल्ये ही वैश्विक असतात. अन्य काही देशांनी अंगीकारलेली अशी काही मूल्ये घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली व भारतीय जीवनाशी समरस होण्याकरिता त्यांच्यात बदल…
सावदा : प्रतिनिधी रावेर येथून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स बस वडगाव वाघोदा दरम्यान अचानक पेटली. या भयानक घटनेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली लागलीच प्रवाशी खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच रावेर व सावदा नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने अग्निशमन दलाची गाडी घेऊन घटनास्थळी पोहचत आग विझवण्यात यशस्वी ठरले आहे. या आगीत ही खाजगी ट्रॅव्हल्स बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नातेवाईकांनी भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती.
मुंबई : प्रतिनिधी राज्य मागासवर्गीय आयोग आता भोसले समितीचा अभ्यास करणार असून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण तपासणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत नेमण्यात आलेल्या सर्व समित्यांचा अभ्यास करून त्यातल्या त्रुटींचाही अभ्यास केला जाणार आहे. वस्तुस्थिती आणि निरीक्षणं नोंदवून राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल, अशी राज्य मागासवर्ग आयोगाची कार्यपद्धती ठरली आहे.मराठा समाजाच्या शैक्षणिक मागासलेपणाची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. त्याचसोबत शैक्षणिक मागासलेपणांची वास्तविक टक्केवारी तपासण्यात येणार आहे. काल राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षांसहित १० सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाज मागास आहे का? विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास वाढीव आरक्षण देणे, या संदर्भात चर्चा करण्यात आली. मराठा समाजाच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार आणि शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत राहणाऱ्या तेजस रवींद्र मोरे (३४) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पूत्र व अन्य तीन अशा पाच जणांविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेले ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात या पूर्वीच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तेजस मोरे हे साक्षीदार असून त्यात त्यांचा जबाबदेखील झाला आहे. ही बाब…
अहमदाबाद : वृत्तसंस्था भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक संघाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. फलंदाजांची दमदार कामगिरी, वेगवान गोलंदाजांचा भेदक मारा, त्यांना फिरकीपटूंची साथ यांच्या जोरावर भारताने सलग १० सामने जिंकले आहेत. यंदाच्या स्पर्धेत टीम इंडिया अजिंक्य आहे. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावलेल्या कांगारुंनी सलग ८ सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंग्स यांनी आज विश्वचषकाच्या करंडकासोबत फोटो सेशन केले. गांधीनगरच्या जवळ असलेल्या अदालज विहीर परिसरात फोटो सेशन झाले. २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधीही फोटोशूट झालं होतं. विशेष म्हणजे या तिन्हीवेळा करंडकाच्या उजव्या बाजूस…