रावेर – पुणे खाजगी बस वाघोद्याजवळ पेटली; प्रवासी सुरक्षित

0
1

सावदा : प्रतिनिधी

रावेर येथून पुण्याकडे प्रवाशांना घेऊन निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स बस वडगाव वाघोदा दरम्यान अचानक पेटली. या भयानक घटनेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली लागलीच प्रवाशी खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, आगीचे वृत्त कळताच रावेर व सावदा नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने अग्निशमन दलाची गाडी घेऊन घटनास्थळी पोहचत आग विझवण्यात यशस्वी ठरले आहे. या आगीत ही खाजगी ट्रॅव्हल्स बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नातेवाईकांनी भेटण्यासाठी एकच गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here