Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन बालगंधर्व खुले नाट्य गृहात करण्यात आलं होतं. सदर स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन प्रतिष्ठानाने केले होते. सुमारे ४५ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे प्रोग्रॅम एक्झिक्युटिव्ह शशांक दंडे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पेंटिंग ची आवड लावून शिकवणारे श्री. तरुण भाटे, भारत विकास परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या क्षेत्रीय सचिव…

Read More

अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ,समस्या सोडवून दुःखी पिडा दूर करून मानवी कल्याण साधण्याचे अवाहन दिंडोरी येथील कृषीरत्न आबासाहेब मोरे यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र कृष्णाजी नगर अडावद येथे ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण आणि जागतिक कृषी महोत्सव आढावा प्रसंगी ते बोलत होते. अडावद येथील कृष्णाजी नगरातील श्री स्वामी सेवाकेंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कृषीरत्न आबासाहेब मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.गोपुजन करून आढावा बैठकीस प्रारंभ झाला.यावेळी मार्गदर्शन करतांना आबासाहेब मोरे म्हणाले की,सर्वानी शेती समजून घ्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विषमुक्त अन्न कसे तयार करता येईल यासाठी अन्नावर संस्कार असने…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ऑगस्टमध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण बघायला मिळाली आहे. सोने चांदी खरेदीसाठी ही उत्तम वेळ असू शकते. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किंमती गुरुवारी ७० रुपयांनी वाढून ४६,५०० रुपयांवर पोहोचल्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमत सुधारली गेली आहे अशी प्रतिक्रिया आहे. यापूर्वीच्या ट्रेडमध्ये सोने प्रति १० ग्रॅम ४६,१६० रुपये किंमतीवर बंद झाले होते.गुड रिटर्न्स या संकेतस्थळाच्या मते, चांदी ९०० रुपयांनी वाढून ६३,६०० रुपये प्रति किलोवर विकली जात होती.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि शुल्क आकारणीमुळे संपूर्ण भारतामध्ये सोन्याचे दागिने, धातूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक यामुळे किंमतीमध्ये बदल दिसून येतो. काय आहे आजचा सोन्याचा भाव? गुड रिटर्नस या वेबसाईट…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथे अजिंठा विश्रामगृहात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली . या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या महानगर अध्यक्षपदी सर्वानुमते युवराज सुरवाडे यांची निवड करण्यात आली . महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी त्यांचे स्वागत केले . या निवडिबद्दल दिलीप सपकाळे , हरिश्चंद्र सोनवणे , रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , भारत सोनवणे आदिंनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे .

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एमआयडीसी परीसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याने आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही. कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागलाच नागरीकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली. रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । तापी नदीतुन बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांची कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीतून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व ट्राली जप्त करत आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथे असलेल्या तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शेतमालाला लाभकारी मुल्य मिळावे म्हणून कायदा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी देशभरातून महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान व कृषी मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून साकडे घालण्यात आले.कोविडच्या नियमांचे पालन करतांना धरणे आंदोलन रद्द करीत निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शेती परवडत नसून तोट्याचा व्यवहार ठरत आहे.केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेतल्यामुळे शेतमालाला भाव मिळतांना शेतकरी नाडला जात आहे.एम.एस.पी.प्रमाणे शेतमालाला भाव मिळतच नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला आहे.परिणामी प्रसंगी शेतकरी आत्महत्त्येसारख्या टोकाच्या भुमिका घेण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र सरकारला बदलावयाचे असल्यास परिश्रमाने उत्पादीत मालाला योग्य भाव तसेच नफा मिळणे गरजेचे आहे.त्याकरिता शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव,त्याचा व्यवस्थापन मुल्य मिळावे.त्यामुळे लाभकारी मुल्य…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,६१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,६१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय संगीताच्या अभिजात अंगापैकी महत्त्वाचे असलेले धृपद अंतर नादाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. देव देवतांची अनुभूती विनोदकुमार व्दिवेदी, आयुष व्दिवेदी यांचे धृपद गायन उध्दवराव आपेगावकर यांची पखावजावर उपज अंगाने साथ दिली हे आजच्या प्रथम सत्राचे आकर्षण होते. आजच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला राग केदार मधील आलाप जोड आणि झाला सादर केला. बोल होते ‘चंद्र बदन मृग नयनी ही’ त्यानंतर चौतालातील बंदिश सादर केली. कार्यक्रमात पुढे सुल तालात निबध्द पंडित विनोदकुमार व्दिवेदी यांची स्वरचित बंदिश ‘जय जय हनुमान महाबली महान’ हि रचना सादर केली. त्यानंतर पं.विनोदजी व त्यांचे चिरंजीव आयुष यांनी राग देस मधील मत्त तालातील निबध्द अशा अनवट रचना…

Read More