जळगाव । नेरी नाका परिसरातील एका जणाची 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगुराम प्रभूदयाल कुमावत (वय 58, रा. वर्षा कॉलनी, मोहाडीरोड) यांच्याकडे मोटारसायकल (क्र.एमएच 19 बीवाय 4299) आहे. ते सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीजवळ काही कामानिमित्त गेले होते. ते सायंकाळी 5 वाजता काम आटपून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची पार्किंगला लावलेली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहेत.
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षावरील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासो एल.एच.पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी,ए.सी.पाटील, श्रीमती सुनिता सपकाळे व आशा वर्कर्स सरीता पाटील व जयश्री पाटील ही जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक सौ.जयश्री पाटील यांच्या सोबत शाळेतील शिक्षक दिपक सराफ,स्वाती, योगेश चव्हाण व शाळेचे लिपिक महेंद्र पाटील,भरत पाटील तसेच संदिप पाटील हि सर्व शाळेतील कर्मचारी लसीकरण केंद्रावर उपस्थित होते लसीकरण…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव येथील रहीवाशी तथा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय साहित्यकार डॉक्टर प्रियंका सोनी “प्रीत”दिनांक 6/7/8 2022 रोजी पवित्र तीर्थ क्षेत्र मेवाड राजस्थान येथे आयोजित साहित्य संमेलनात “राष्ट्रीय साहित्य सौरभ”या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम तीन दिवसीय ह्या संमेलनाचे आयोजन नाथद्वारा येथील “साहित्य मंडळ संस्था नाथद्वारा” संस्थेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले या संस्थेची स्थापना भारताच्या स्वतंत्रता पूर्वी म्हणजे ८५वर्षापूर्वी या संस्थेचे संस्थापक माननीय स्वर्गीय भागवती प्रसाद देवपुरा यांच्याद्वारे स्थापित करण्यात आली होती, स्वर्गीय भगवती प्रसाद देवपुरा जी देश आणि विदेशात प्रसिद्ध हिंदी साहित्यकार होते यांच्या स्मरणार्थ या साहित्य संमेलनाचा च्या आयोजन दर वर्षी साजरा केला जातो या संमेलनात देशाच्या किमान…
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईतून एका ४ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिला विकल्याच्या आरोपाखाली ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या मुलीला ४ लाख ८० हजार रुपयांत तामिळनाडूस्थित एका सिव्हिल इंजिनियरला विकल्याचा आरोप आहे. तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथून मुंबई पोलिसांच्या दोन पथकांनी या बाळाची सुटका केली, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. “आम्ही तपास करत सर्वप्रथम इब्राहिम अल्ताफ शेख (३२) नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि नंतर त्याच्या चौकशीच्या आधारे सायन, धारावी, मालाड जोगेश्वरी, मुंबईतील नागपाडा आणि कल्याण आणि ठाणे येथे छापे टाकले. तिथून आणखी दोन महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात आली. त्यांनी आम्हाला सांगितले की ते बाळ ४.८ लाख रुपयांना तामिळनाडूतील एका…
जळगाव, (प्रतिनिधी)- श्री. राजपुत करणी सेनेचे राज्यउपाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांच्या ४३ व्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यांनी आज दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट आली असून राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री राजपूत करनी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, खान्देश कार्यध्यक्ष विलाससिंग पाटील,शिवसेनेचे भरत देशमुख,सत्यमेव जयतेचे संपादक दीपक सपकाळे, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, दिलीप पाटील, बापुसिंग राणा, बी. एच.…
बीड, वृत्तसंस्था । बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविलाय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आहेत प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धजिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविलाय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आहेत प्रतिभा सांगळे या…
नाशिक : नाशिकमध्ये राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त (Rajmata Jijau Jayanti)राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ मोहीम सुरू केले आहे. राजमाता जिजाऊंना अभिवादन करून या मोहिमेचा नारळ फोडण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जातील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कर्डक यांनी केले. या मोहिमेचा नारळ पंचवटी येथील विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ (Shankar Mokad) यांच्या संपर्क कार्यालयात फुटला. बाळासाहेब कर्डक म्हणाले की, नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. त्यावेळी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणूक छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढवली…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील निमखेडी परिसरातील मयूर सोसायटी येथे ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमखेडी शिवारातील मयूर सोसायटीत ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल आप्पा पाटील (वय-५५) रा. निमखेडी शिवार, मयूर हौसिंग सोसायटी जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, विठ्ठल पाटील हे पत्नीसह वास्तव्याला आहे. सोमवारी १० जानेवारी त्यांची पत्नी तालुक्यातील कानळदा येथील भावाकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या होत्या. मंगळवार ११…
मुंबई: मुंबईत करोनाच्या (Mumbai Corona) तिसऱ्या लाटेत (Mumbai corona third wave) मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, गंभीर करोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही कमी आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या २२ दिवसांत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीवरून असे दिसते की, दररोज सरासरी दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी करोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील दोन रुग्णांचा समावेश आहे. अधिकृत सूत्रांनुसार, मुंबईत साधारण २१ डिसेंबरपासून करोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली होती. त्यानंतर ११ जानेवारीपर्यंत म्हणजेच गेल्या २२ दिवसांत ९३, ३९६ करोना रुग्ण आढळून आले आहेत. इतक्या मोठ्या…