जळगाव, प्रतिनिधी । भारतीय संगीताच्या अभिजात अंगापैकी महत्त्वाचे असलेले धृपद अंतर नादाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. देव देवतांची अनुभूती विनोदकुमार व्दिवेदी, आयुष व्दिवेदी यांचे धृपद गायन उध्दवराव आपेगावकर यांची पखावजावर उपज अंगाने साथ दिली हे आजच्या प्रथम सत्राचे आकर्षण होते. आजच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला राग केदार मधील आलाप जोड आणि झाला सादर केला. बोल होते ‘चंद्र बदन मृग नयनी ही’ त्यानंतर चौतालातील बंदिश सादर केली. कार्यक्रमात पुढे सुल तालात निबध्द पंडित विनोदकुमार व्दिवेदी यांची स्वरचित बंदिश ‘जय जय हनुमान महाबली महान’ हि रचना सादर केली. त्यानंतर पं.विनोदजी व त्यांचे चिरंजीव आयुष यांनी राग देस मधील मत्त तालातील निबध्द अशा अनवट रचना…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी: कोरोनावरून माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यात सुरू झालेले शाब्दिक युद्ध चांगलेच रंगात आले आहे. ‘गिरीशभाऊंना बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे वक्तव्य एकनाथराव खडसेंनी केले होते त्यावर गुगली टाकत खडसेंनी नवीनच वक्तव्य केले आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. त्या ठिकाणी महाजन यांनी दर्शन घ्यावे, असे मी सुचवले होते. परंतु, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ याप्रमाणे त्यांच्या मनात होते तेच त्यांना दिसले”, माझा दृष्टिकोन चांगला आहे. गिरीश महाजन यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घावे त्यांना त्याचा लाभ होईल. असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. खडसे आणि महाजन यांच्यातील शाब्दिक युद्धाची…
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठ्या ‘मावळा’ या टिबीएम संयंत्राच्या सहाय्याने आज हे काम पूर्ण झाले. या यंत्राने २.०७० किलोमीटर लांबीच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्णत्वाला नेले. या बोगदा खणन कामाचा ‘ब्रेक थ्रू’ सोमवारी (१० जानेवारी) गिरगाव चौपाटी येथे पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या कामाबाबत शाबासकी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “शाब्बास, उत्तम काम करत आहात. “मावळा” या शब्दाला साजेसे काम हे यंत्र आणि यंत्र हाताळणारे माझे सहकारी करत आहेत. स्वप्नं प्रत्यक्षात आणणं कठीण असतं, पण…
जळगाव, प्रतिनिधी । सिंधी कॉलनीमधील लक्ष्मीनगर परिसरातील हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. समतानगर भागातील आकाश भोला राठोड (वय 20) हा काही कामानिमित्त लक्ष्मीनगरात गेला होता. या वेळी संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. यात संदीप कोळी याने आकाशला दगड मारला. तर संदीपच्या भावाने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली. इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. यात आकाश जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून संदीप कोळी यांच्यासह इतर तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सॉफ्ट टेनिस या राज्यस्तरीय स्पर्धेचे रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर समारोप झाले या समारोपीय समारंभात महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन जळगाव तर्फे शहरातील सामाजिक, राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील ७ व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला क्रीडा संघटक फारूक शेख कोरोना योध्धा जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा कोविड सेंटरचे समन्वयक व जळगांव जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना चे पदाधिकारी स्वराज्य क्रीडा संघटक मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त फारुख शेख यांनी मागील दोन वर्षात सुमारे १२०० कुटुंबियांना रेशन किटचे वाटप, ५७३९० लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार,…
चोपडा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवत दहा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार पालकांसमवेत विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आला. कोविड १९ च्या भयावह परिस्थितीवर मात करत ,ऑनलाइन माध्यमातून अभ्यास करत जिल्ह्यातील २५५ विद्यार्थ्यात चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. मयूर कैलास चौधरी ,आयुष किरण पाटील, सोहम प्रवीण पाटील, युतिका संजय महाजन, एकदा नंदलाल मराठे ,अनुष्का सुनील कन्हैये…
जळगाव, प्रतिनिधी । प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आँटिस्ट जावेद हबीब (हकीम) वर कडक कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन हिंदू राष्ट्रसेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. सविस्तर असे आहे की, प्रसिध्द केशरचनाकार मेकअप आँटिस्ट जावेद हबीब (हकीम) यांनी नुकतेच ऐका कार्यक्रमामध्ये केशरचनेचे प्रात्यक्षिक दाखविताना पाणी संपले म्हणुन अनेक महिलांसमोर ऐका महिलेच्या डोक्यावर थुकुंन तिचा अवमान करत उर्वरित केशरचना पुर्ण केली. सदर महिलेने त्याच रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुर्णतः घडलेला हा प्रकार हा अतिशय निदंनय असून एका सुप्रसिध्द व्यक्तीने असे कृत्य करणे हे निदनीय आणि निश्चितच निषेधार्थ आहे, हा प्रकार सदर महिलेचाच नाही तर संपुर्ण स्त्रिवर्गाचा मोठा अपमान…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात करोना महामारीची तिसरी लाट आली असून, सर्वसामान्यांपासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. माझी आज सौम्य लक्षणांसह करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:चे विलगीकरण करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी. असं राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. देशात करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाटी तिसरी लाट पीकवर असेल. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक…
जळगाव : प्रतिनिधी I मुंबईच्या स्निती मिश्रा यांनी शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीतासह भारतीय अभिजात संगीत सादर केले. कोकण कन्या ब्रँडने सुफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. निमित्त होते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित केलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे. प्रथम सत्रात रविवारी स्निती मिश्रा यांनी ‘हर हर हर महादेव महेश्वरा..` मालकंस रागातील या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छोटा ख्याल ‘कोयलिया बोले..` ही रचना सादर केली. गायिका स्वर्गीय किशोरी अमोणकर यांचा मराठी अभंग ‘हे श्याम सुंदर राज असा मनमोहना..` हे रूपक तालात सादर केले. त्रितालमध्ये पं. वसंतराव देशपांडे यांनी गाऊन अजरामर केलेले ‘घेई छंद मकरंद..` हे नाट्यगीत सादर केले.…
जळगाव : प्रतिनिधी I येथील जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे त्र्यंबकनगर प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर घेण्यात आले. लहान मुलांची तपासणी करण्यात आली. प्रकल्पप्रमुख डॉ. गोविंद तापाडिया, सहप्रकल्प प्रमुख चंदन पाटील, उपाध्यक्ष मनोज भालेराव यांच्या संकल्पनेतून शिबिर घेण्यात आले. समन्वयक जिनल जैन, आयपीपी सुशील अग्रवाल, अध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष गोविंद पाटील, किशोर पाटील आदिंनी उपक्रमास सहकार्य केले.