Author: saimat team

फैजपूर:प्रतिनिधी फैजपुरची भूमी ऐतिहासिक असून युवा पिढीला उच्च शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासोबतच करियर कट्टाच्या माध्यमातून तरुणांना करियरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालय सर्व सोयीं सुविधानी सुसज्ज व तत्पर आहे. यासोबतच व्यवस्थापन, प्रशासन व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून येणारा काळ येथील तरुणांसाठी सुवर्ण काळ असेल असे मत  यशवंत शितोळे, अध्यक्ष एमकेसीएल यांनी व्यक्त केले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात करियर कट्टाच्या माध्यमातून आढावा भेटीदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय समन्वयक प्रा. डॉ. सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे,  करियर कट्टा महाविद्यालय समन्वयक प्रा.…

Read More

जळगांव- जम्मू काश्मीर, गुलमर्ग येथे १५ ते १७ जानेवारी २०२२ होत असलेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी जळगांव सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले चाळीसगांवचे रहिवासी डॉ.अभिषेक पाटील व आकाश धनगर यांची आठव्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आईस स्टॉक विंटर खेळाला इंटरनॅशनल ऑलिम्पिकची मान्यताप्राप्त आहे. युवा व खेल मंत्रालयच्या ‘खेलो इंडिया’ साठीही आईस स्टॉक खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जळगांव जिल्हा आईस स्टॉक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर, प्रतीक शुक्ला, अनिल बाविस्कर, स्वप्निल जाधव, राहुल पाटील,उमेश हंडे, दीपक निकम यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रात आईस स्टॉक विंटर खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अविरतपणे कार्यरत असणारे महाराष्ट्र…

Read More

जामनेर (प्रतिनिधी):-  आज दी.१२ जानेवारी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड  व परिवर्तन वादी संघटनेच्या माध्यमातून जिजाऊ पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवप्रेमींची कोरोनाचे नियम पाळून मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मराठा सेवा संघाच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. यावेळी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, जामनेर तालुका एजु.चे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,नगर सेवक महेंद्र बावीस्कर, सुहास पाटील, सुधाकर माळी, उल्हास पाटील, दत्तात्रय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पप्पू पाटील, प्रल्हाद बोरसे, अमोल पाटील…

Read More

(अडथडा न ठरणारे दुकानांचे ओटे तोडता) (बेसमेंट प्रश्नी जाणीवपूर्वक दुर्लक्ष का ?) जळगाव, विशेष प्रतिनिधी शहरात सध्या महापालिका प्रशासनाच्या आदेशावरून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.त्यात प्रामुख्याने महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित सहा रस्त्यावरील कच्ची व पक्की अतिक्रमणे हटविले जात आहेत. या कारवाईचे नागरिक स्वागत करीत आहेत.मात्र या कारवाई अंतर्गत कोणत्याच प्रकारचा अडथडा न ठरणारे गांधी रोडवरील दुकानांचे ओटे तोडले जात आहेत.वास्तविक ते अतिक्रमण किंवा अवैध बांधकाम ठरत नसतांना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर निर्दयीपणे हातोडा चालवीत आहेत आणि दुसरीकडे बेसमेंट च्या दुरुपयोग करणारांना पाठीशी घातले जाते आहे.त्याबद्दल महा- -पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जातो आहे. महापालिका प्रशासन व…

Read More

  जामनेर (पंढरीनाथ पाटील):-   जिजाऊ ,शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा निर्झर आहे.या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे माॕ.जिजाऊ…     १२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली.राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.इ.स.१६१०  शहाजी राजेंसोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना.     या वीर मातेच्या जीवनात आलेला एक एक प्रसंग व त्या…

Read More

मुंबई : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल (UP assembly-election-2022)वाजल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच उत्तरप्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (swami-prasad-morya) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप (BJP)अ‌ॅक्शन मोडमध्ये आला आहे. मौर्य यांच्या पाठोपाठ भाजपचे तिंदवारी येथील आमदार बृजेश प्रजापती, बिल्होर येथील आमदार भगवती सागर आणि तिलहर येथील आमदार रोशन लाल वर्मा यांनी सुद्धा भाजपला सोडचिट्ठी दिली. यापार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मोठा झटका देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा लक्ष घालून आहे.…

Read More

* चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा फुटली पाईपलाईन  * सरपंचांनी राजीनामा द्या तर नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा पहुर – जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा पाईपलाईन फुटल्याने सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात असून सरपंचांनी राजीनामा द्या तर पहूर कसबे ग्रामपंचायतला नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा अशी जोरदार मागणी केली जात आहे.     पहूर कसबे गावातील लेले नगर भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने गेल्या नऊ दिवसांपासून या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना पाणी आले नाही त्यामुळे धरणात पाणी साठा असूनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली विशेष…

Read More

चोपडा – मकर संक्रांति पर्वात सर्वत्र पतंगबाजीचे आकर्षण व पतंग उडविण्याचा मोह लहानथोर सर्वांनाच भुरळ घालतो. या कालावधीमध्ये आकाशात मनमोहक , रंगीत व आकर्षक पतंग उडविण्याची जणू स्पर्धाच अनेकात लागली असते. यासाठी पतंग प्रेमी मंडळी एकमेकांच्या पतंग काटण्यासाठी चीनी मांजा अथवा नायलॉन मांजाचा सर्रास वापर करताना दिसून येतात. या मांजाला काचेची भुकटी लावून धारदार बनवले असते. या मांजामुळे आकाशात उडणारे मुक्या पक्ष्यांचे पंख , पाय , मान कापली जाते. पक्षी मृत्युमुखी पडतात. बऱ्याचदा मांजा झाडांवर अडकून राहतो. तेथे येणारे पक्षी फासात अडकून लोंबकळतात. पतंग उडवल्यानंतर फेकून दिलेला मांजा भटके गुरढोर , कुत्रे यांच्या पोटात खाण्यातून जाऊन त्रास होतो. पतंग काटल्यानंतर…

Read More

जामनेर- प्रतिनिधी     तालुक्यातील नेरी बु!! येथील रहिवाशी आरोपी विजय अनिल रोकडे यास चाकू हल्ला प्रकरणी येथील न्यायाधीश डी. एन. चांभले यांनी एक वर्ष सक्त मजुरी व पांच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्हा बाबत सविस्तर वृत्त असे की, दी.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी नऊ वाजे च्या सुमारास आरोपी विजय अनिल रोकडे याने दारूच्या नसेत फिर्यादी प्रशांत राजू आपार यास नेरी येथील आठवडे बाजारात शिवीगाळ करून धारधार सुरीने त्याच्या पार्श्वभागावर मारून गंभीर दुखापत करून फिर्यादी व त्याचे आई वडीलांसह इतर साक्षीदारांना सुध्दा जीवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणून या बाबत आरोपी विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन मध्ये…

Read More

पुणे : राजकरणात एकमेकांचे विरोधक असलेले भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांचा घरोबा नुकताच पाहायला मिळाला. कितीही मतभेद असले तरी तेही राजकारणापुरतेच मर्यादित आहेत. याचीच प्रचिती भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यालयात उपस्थितीत लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नुकतीच याबाबत फेसबुकपेजच्या माध्यमातून माहिती दिली. जगताप पोस्टमध्ये म्हणाले की, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमचे स्वागत केले. दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी मनभेद मात्र नाही. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि शहर विकासासाठी सलोखा ही पुण्याची राजकीय संस्कृतीच आहे. आज या संस्कृतीचे पुन्हा एकद दर्शन झाले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना तिळगुळाचे…

Read More