जळगाव (प्रतिनिधी) : काळ आला होता पण वेळ आली नव्हती…शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला कळा सुरु…ग्रामीण भाग असल्याने कुटुंबीयांची धावपळ…मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती सुरु…महिलेच्या वेदनांनी आसमंत हादरले…रात्रीची बिकट वेळ…महिलेने चक्क जुळ्या बाळांना दिला जन्म… त्याचवेळी बाळांचेही शिशुरूदन सुरू…पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगातून अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे. केवलबाई साहिदास भिल (वय २६, रा.उखडवाडी ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची हि चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी २ मुली व २ मुले तिला आहेत. पाचव्या प्रसूतीमध्ये तिला दोन्ही मुली झाल्या आहेत.…
Author: saimat team
जळगाव- मराठा विद्या प्रसारकचे संचालक अॅड. विजय भास्कर पाटील यांना धमकावून खंडणी वसुल केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह 29 संशयीतांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलिसांकडून जळगावात रविवारी पहाटे पाच ठिकाणी छापे मारण्यात आले. याच प्रकरणातील नऊ जणांवर मोक्काची कारवाई करण्याच्या हालचालीना गतिमान आली आहे. या पार्श्वभूमीवरमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काही आरोप केले आहेत. मोक्कांतर्गत कारवाई सुरू झाली असतानाच गिरीश महाजनांना कोरोना तर झाला नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती. या वक्तव्यानंतर रविवार पहाटेच नीलेश रणजीत भोईटे, तानाजी भोईटे, महेंद्र भोईटे, प्राचार्य एल.पी. देशमुख व प्रमोद काळे यांच्या जळगावातील…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,५१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,६०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नवी नियमावली जाहीर केली आहे. यात स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत ही अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील. 10 जानेवारी मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली लागू होईल. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसते. नव्या नियमांचे…
भुसावळ, प्रतिनिधी । आधार कार्ड आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक शैक्षणिक, आर्थिक ,विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक असतं. ही विद्यार्थ्यांची गरज ओळखून भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ नाहाटा महाविद्यालयात आधार अपडेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आधार अपडेट करून याचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरल मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करताना आधार कार्ड अपडेट नसेल तर विद्यार्थी संख्या गणली जात विद्यार्थी संख्या अभावी शिक्षक सरप्लस होण्याची शक्यता असते. शिक्षक सरप्लस होऊ नये. आणि महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या हेतूने महाविद्यालयातच या विविध सेवा एकाच ठिकाणी या सुविधा केंद्रामार्फत…
जळगाव, प्रतिनिधी । ‘आपला भाऊ रुग्णालयात दाखल आहे. येऊन भेटा’ असे निरोप देऊनही सख्या भावाने पाठ फिरवली. तरीही महिनाभर रुग्णाला उपचार सुरु ठेवत त्याला वैद्यकीय पथकाने पूर्ण बरे केले. अखेर, कोणीच नातेवाईक न आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने महानगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्राशी संपर्क साधला. शनिवारी दि. ८ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत या ‘बेवारस’ रुग्णास रुग्णालयातून निरोप देण्यात आला. प्रमोद जोशी (वय ५५, रा. खोटे नगर, जळगाव) असे या रुग्णाचे नाव आहे. त्यांना ४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. कक्ष क्र. ७ येथे महिनाभर उपचार झाल्यावर…
जळगाव, प्रतिनिधी । आमच्या जळगावच्या या ‘सिव्हिल हॉस्पिटल’ ला कधी नव्हे इतके सुवर्ण दिवस आपल्या काळात आलेत. तासनतास रांगेत उभे राहणे, गर्दीचा प्रचंड त्रास, लक्ष देणारे कोणी नाही असे दिव्यांग बांधवांचे होणारे विविध हाल थांबल्याने आम्ही आपला गौरव करीत आहोत, अशा भावनिक शब्दात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन त्यांच्या कार्याचा विविध संस्थांच्या उपस्थितीत शनिवारी दि. ८ जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला. येथील दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जळगावकरांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा गौरवशाली कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, शाल…
जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक ८ रोजी शनिवार रोजी पी.ई. तात्या पाटील एज्युकेशन फाउंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मालय येथील गरजू असलेल्या वस्ती तांड्यावर ब्लँकेट्स वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी पी ई तात्या मेडिकल कॉलेजचे संचालक पी ई तात्या पाटील, निर्मला पाटील पद्मालय ट्रस्ट संस्थानचे आनंदा पाटील व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी अध्यक्षा मनिषा पाटील व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते हिवाळा ऋतूतील गरज पाहता ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी जायंटस् ग्रूप जळगावच्या नूतन तासखेडकर, ॲड सीमा जाधव, भारती कापडणे, विभावरी पाटील, किमया पाटील,, भावना चौहान मनीषा एस पाटील उपस्थित राहून ब्लँकेट वाटप केले. यावेळी सुत्रसंचालन…
जळगाव, प्रतिनिधी । मोदी सरकारने देशातील सहकारी साखर कारखान्यांना आयकरातून दिलासा देत ३५-३६ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे .जळगाव जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. साखर कारखान्यांकडून उसाला वाजवी व किफायतशीर दर (एफआरपी) किंवा किमान हमी भावापेक्षा (एसएमपी) जास्त दिलेला दर हा ऊस खरेदीचा खर्च समजावा व त्यावर प्राप्तिकर आकारू नये, असा कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारने केला. या निर्णयामुळे साखर कारखान्यांची प्राप्तिकरात सुटका झाली आहे. शेतकऱ्यांचे जाणते राजे म्हणविणारे केंद्र सरकारमध्ये सलग १० वर्षे असतानाही ज्यांना सहकारी साखर कारखान्यांचा ३५- ३६ वर्षे प्रलंबित असलेला आयकराचा मुद्दा सोडविता आला नव्हता ,…
जळगाव । शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाजवळील एका आईस्क्रीम पार्लर दुकानात कामगार व सेल्समन यांच्यात शाब्दिक वाद होऊन एकमेकांना मारहाण झाली. यात दुकानदाराचे नुकसान झाले. याबाबत शहर पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रायसोनीनगरातील उमेश शांतीलाल कुमावत (वय-३७) हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या असे म्हणत वाद घातला. दोघांनी एकमेकांला मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमकी दिली. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दोघांनी परस्पर विरुद्ध तक्रार दिल्यावरुन शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर…