Author: saimat team

वॉशिग्टंन : वृत्तसंस्था I न्यूयॉर्कमध्ये एका बहुमजली रहिवाशी इमारतीला भीषण आग लागून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नऊ लहान मुलांचा समावेस असून डझनहून अधिक जखमी झाले आहेत. रविवारी लागलेली ही आग अमेरिकेत रहिवाशी इमारतीत लागलेली आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एका हिटरमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. “19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आली असून अनेकजण गंभीर जखमी आहेत,” अशी माहिती मेयर एरिट ॲडम्स यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी 63 लोक जखमी झाल्याचे सांगितले. न्यूयॉर्क शहराचे अग्निशमन दल प्रमुख डॅनियल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “मार्शल्सनी गोळा केलेले पुरावे आणि रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार एका बेडरुममध्ये…

Read More

यावल, तालुका प्रतिनिधी I येथील पोलिस स्थानकातील कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल पोलिस स्थानकातील एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता. आणखी दोन कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून या तिघ कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील इतरांची ही तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असून वैद्यकिय यंत्रणा कामाला लागली आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी I महानगरपालिकेची विशेष महासभा सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेत 42 कोटींच्या रस्त्यांसह 85 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली जाणार आहे. याशिवाय महापौरांना महापालिकेच्या माध्यमातून निवासस्थान देण्यावर प्रथमच सभागृहात चर्चा होईल. या अगोदर झालेल्या ऑफलाईन सभेत काही मुद्यांवरून गुद्यापर्यंत विषय आला होता. मात्र आजच्या ऑनलाईन सभेत सर्व कामकाज शांततेत पार पडले. महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पहिलीच ऑफलाईन महासभा झाली व ती काही प्रश्‍नांवर वादग्रस्तही ठरली होती. आज दुसरी महासभा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली व त्यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी मंजूर 42 कोटींच्या निधीतील कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर…

Read More

चोपडा, प्रतिनिधी । येथील नुकताच जाहीर झालेल्या पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर झाली त्यात विद्यालयाचे दहा विद्यार्थी चमकले त्यांची नावे पुढील प्रमाणे प्रज्ञेश ज्ञानेश्वर निकम,स्वरा विनीत हरताळकर,पियुष सुरेश चौधरी,श्रीकांत प्रशांत चौधरी,ऋतुजा किशोर पाटील,मानस विनीत हरताळकर,निखिल ज्ञानेश्वर पाटील,लीना नितीन सोनवणे,सुमित शशिकांत सोनवणे,मनस्वी किरण चौधरी या सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेच संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,सचिव अॅड.रविंद्र जैन,डॉ. विनित हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद,पालकवृंद यांनी केले.

Read More

मुंबई, प्रतिनिधी । उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत यंदा थंडीच्या हंगामातील सर्वात कमी तापमानची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत १३.२ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत. स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ परिसरात १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात मुंबईतील पारा हा ५ अंशांनी घसरला आहे,…

Read More

जळगाव । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी झालेली आहे. लसीकरण व कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे महत्वाचे आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. केंद्र शासनातर्फे ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले आहेत व त्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत अशांना बूस्टर डोस देण्याच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा सोमवार दि. १० जानेवारी रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी तथा मोहाडी स्त्री रुग्णालयाचे इंचार्ज डॉ.सुशांत सुपे यांना पहिला डोस देऊन उपक्रमाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात येणार…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस चव्हाण यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही डॉ. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. तिसऱ्या लाटेतही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कार्यालयातील संपर्कातील २० अधिकारी, कर्मचाऱ्याची नावे त्यांनी सुचवली आहे. या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. एन.एस चव्हाण यांनी दोन्ही लस घेतल्या

Read More

यावल, प्रतिनिधी । अवैध वृक्षतोड करून शिवसेना जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांस आणि सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर वाहतूक करून टाकल्याने त्या शिवसेना जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊन लाकूडतोड्याने असे का केले याचा जाब विचारण्यासाठी जिल्हास्तरीय शिवसेना पदाधिकारी आपल्या सदस्यांसह वनक्षेत्रपाल पदमोर यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले असता वनक्षेत्रपाल यांनी त्यांना महत्व न देता तुम्ही मला निलंबित करा,किव्वा बदली करा असे म्हणत चांगलाच पाणउतारा केला असल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर यावल चोपडा तालुक्याचा उत्तर भाग म्हणजे पूर्व-पश्चिम रेषेतील मोठे कार्यक्षेत्र हे सातपुडा पर्वतात येते या सातपुड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव येथे यावल वन विभाग मुख्य कार्यालय कार्यरत…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,६१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,६१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More