Author: saimat team

जळगाव, विशेष प्रतिनिधी | शहरात सध्या महापालिका प्रशासनाच्या आदेशावरून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.त्यात प्रामुख्याने महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित सहा रस्त्यावरील कच्ची व पक्की अतिक्रमणे हटविले जात आहेत.या कारवाईचे नागरिक स्वागत करीत आहेत मात्र या कारवाई अंतर्गत कोणत्याच प्रकारचा अडथळा न ठरणारे गांधी रोडवरील दुकानांचे ओटे तोडले जात आहेत.वास्तविक ते अतिक्रमण किंवा अवैध बांधकाम ठरत नसतांना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर निर्दयीपणे हातोडा चालवीत आहेत आणि दुसरीकडे बेसमेंटचा दुरुपयोग करणाऱ्यांंना पाठीशी घातले जाते आहे.त्याबद्दल महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.महापालिका प्रशासन व पदाधिकारी याची दखल घेतील काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जळगाव शहरातील धुळयुक्त आणि…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था I केंद्र सरकारच्या सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालायाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. या ट्विटर अकाऊंटचे नाव आणि प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर बुधवारी सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली मात्र, आता खाते पूर्ववत करण्यात आले आहे. दरम्यान, हॅकर्सने नाव आणि फोटो बदलला आहे. हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटचा फोटो आणि नाव बदलले होते. हॅकर्सनी प्रोफाईलवर एलोन मस्कच्या नावासह माशाचा प्रोफाईल फोटो अपलोट केला होता. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, आज (12 जानेवारी) सकाळी मंत्रालयाच्या खात्यात छेडछाड झाली…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोना अहवालात दिवसभरात २८५ रूग्ण आढळून आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती वसंतस्मृती भाजपा कार्यालय जळगाव येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी,प्रमुक वक्ते सुरेश कुलकर्णी,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक साखरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते सुरेश कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेले स्वराज्य निर्मितीचे ध्येर्य आणि पाश्चात्य देशात भारतीय संस्कृतीची ओळख या विषयावर व्याख्यान केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात युवकांना महापुरुषांनी दिलेली प्रेरणा आचरणात आणण्याची गरज आहे असे…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचं आज निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते व त्यांच्यावर पूना हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हळूहळू अवयव निकामी होत गेल्याने त्यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून मेहता हे पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनसाठी उपचार घेत होते. मात्र अवयव निकामी होत असल्याने त्यांना दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सीईओ आणि एमडी, सुनील अनिल मेहता यांनी १९८६ मध्ये त्यांचे वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होतो. त्यामुळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व…

Read More

जळगाव । नेरी नाका परिसरातील एका जणाची 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगुराम प्रभूदयाल कुमावत (वय 58, रा. वर्षा कॉलनी, मोहाडीरोड) यांच्याकडे मोटारसायकल (क्र.एमएच 19 बीवाय 4299) आहे. ते सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीजवळ काही कामानिमित्त गेले होते. ते सायंकाळी 5 वाजता काम आटपून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची पार्किंगला लावलेली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहेत.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षावरील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासो एल.एच.पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी,ए.सी.पाटील, श्रीमती सुनिता सपकाळे व आशा वर्कर्स सरीता पाटील व जयश्री पाटील ही जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक सौ.जयश्री पाटील यांच्या सोबत शाळेतील शिक्षक दिपक सराफ,स्वाती, योगेश चव्हाण व शाळेचे लिपिक महेंद्र पाटील,भरत पाटील तसेच संदिप पाटील हि सर्व शाळेतील कर्मचारी लसीकरण केंद्रावर उपस्थित होते लसीकरण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव येथील रहीवाशी तथा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय साहित्यकार डॉक्टर प्रियंका सोनी “प्रीत”दिनांक 6/7/8 2022 रोजी पवित्र तीर्थ क्षेत्र मेवाड राजस्थान येथे आयोजित साहित्य संमेलनात “राष्ट्रीय साहित्य सौरभ”या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम तीन दिवसीय ह्या संमेलनाचे आयोजन नाथद्वारा येथील “साहित्य मंडळ संस्था नाथद्वारा” संस्थेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले या संस्थेची स्थापना भारताच्या स्वतंत्रता पूर्वी म्हणजे ८५वर्षापूर्वी या संस्थेचे संस्थापक माननीय स्वर्गीय भागवती प्रसाद देवपुरा यांच्याद्वारे स्थापित करण्यात आली होती, स्वर्गीय भगवती प्रसाद देवपुरा जी देश आणि विदेशात प्रसिद्ध हिंदी साहित्यकार होते यांच्या स्मरणार्थ या साहित्य संमेलनाचा च्या आयोजन दर वर्षी साजरा केला जातो या संमेलनात देशाच्या किमान…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईतून एका ४ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिला विकल्याच्या आरोपाखाली ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या मुलीला ४ लाख ८० हजार रुपयांत तामिळनाडूस्थित एका सिव्हिल इंजिनियरला विकल्याचा आरोप आहे. तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथून मुंबई पोलिसांच्या दोन पथकांनी या बाळाची सुटका केली, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. “आम्ही तपास करत सर्वप्रथम इब्राहिम अल्ताफ शेख (३२) नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि नंतर त्याच्या चौकशीच्या आधारे सायन, धारावी, मालाड जोगेश्वरी, मुंबईतील नागपाडा आणि कल्याण आणि ठाणे येथे छापे टाकले. तिथून आणखी दोन महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात आली. त्यांनी आम्हाला सांगितले की ते बाळ ४.८ लाख रुपयांना तामिळनाडूतील एका…

Read More