जळगाव : प्रतिनिधी I मुंबईच्या स्निती मिश्रा यांनी शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीतासह भारतीय अभिजात संगीत सादर केले. कोकण कन्या ब्रँडने सुफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. निमित्त होते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित केलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे. प्रथम सत्रात रविवारी स्निती मिश्रा यांनी ‘हर हर हर महादेव महेश्वरा..` मालकंस रागातील या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छोटा ख्याल ‘कोयलिया बोले..` ही रचना सादर केली. गायिका स्वर्गीय किशोरी अमोणकर यांचा मराठी अभंग ‘हे श्याम सुंदर राज असा मनमोहना..` हे रूपक तालात सादर केले. त्रितालमध्ये पं. वसंतराव देशपांडे यांनी गाऊन अजरामर केलेले ‘घेई छंद मकरंद..` हे नाट्यगीत सादर केले.…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी I येथील जेसीआय जळगाव डायमंड सिटीतर्फे त्र्यंबकनगर प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर घेण्यात आले. लहान मुलांची तपासणी करण्यात आली. प्रकल्पप्रमुख डॉ. गोविंद तापाडिया, सहप्रकल्प प्रमुख चंदन पाटील, उपाध्यक्ष मनोज भालेराव यांच्या संकल्पनेतून शिबिर घेण्यात आले. समन्वयक जिनल जैन, आयपीपी सुशील अग्रवाल, अध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष गोविंद पाटील, किशोर पाटील आदिंनी उपक्रमास सहकार्य केले.
जळगाव, प्रतिनिधी I येथील जैन महिला मंडळाच्या सदस्यांनी बॉलिवूडच्या कलावंतांची वेशभूषा परिधान करत 2022 या नववर्षाचे स्वागत केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी ज्या प्रमाणे कलाकारांचा वेशभूषा परिधान केला होता, त्या थीम प्रमाणे फिल्मी गाण्यावर डान्स करत नववर्षाचे स्वागत केले. यात जैन महिला मंडळाच्या 21 महिला सहभागी झाल्या होत्या. नववर्ष स्वागताचा कार्यक्रम सल्लागार कमला अग्रवाल, रत्नाभाभी जैन, शैला मयूर यांच्या मार्गदर्शनात झाला. कार्यक्रमासाठी अध्यक्षा कंचन भंसाली, मनीषा डाकलिया, सेक्रेटरी हेमा गांधी, उज्ज्वला मुथा यांनी सहकार्य केल्याचे प्रेमलता डाकलिया यांनी सांगितले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमातून चैतन्य संचारले असे स्पर्धकांनी नमूद केले.
जळगाव, प्रतिनिधी I येथील बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापिका सुधाताई काबरा यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार दि 11 जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . सदर आरोग्य तपासणी शिबीर शहरातील खंडेराव नगर, पिंप्राळा परिसरात होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. शिबीरात नागरिकांची, महिलांची आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, रक्त- लघवी तपासणी, फिजोथेरेपी, बालरेाग तपासणी, दात तपासणी, ॲक्यूप्रेशन तपासणी आदी तपासण्या सकाळ नऊ ते बारा दरम्यान होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सौ.काबरा यांनी केले आहे. शिबीरात स्त्रीरोग तज्ञ डॉ.माधूरी कासट, डॉ. हेमांगी कोल्हे, बालरोग तज्ञ डॉ.मनिषा कोल्हे, डॉ.प्रितम पवार, नेत्ररोग तज्ञ डॉ. रशमी पाटील, दंत रोग तज्ञ डॉ.सुयोग…
जळगाव, प्रतिनिधी I कृषीमित्र माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा 16 जून हा स्मृतीदिन जिल्ह्यात ‘केळी उत्पादक शेतकरी दिवस` म्हणून साजरा करण्याचा विचार व्हावा, अशा मागणीचे पत्र जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, मागण्या वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याचे काम शेतकरी नेते व माजी खासदार कृषीमित्र हरिभाऊ जावळे यांनी केले आहे. लोकसभा, विधानसभेत त्यांनी केळीशी निगडीत असलेले अनेक विषय अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून लावून धरले होते. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न कशाप्रकारे मिळेल याबाबत ते नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यांचा स्मृतीदिन 16 जून रोजी आहे. या दिवशी त्यांचे…
चाळीसगाव, प्रतिनिधी I तालुक्याला उंचीवर नेऊन ठेवणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावाचा अजूनही गावागावात उल्लेख केला जातो, असे दिवंगत लोकनेते स्व.अनिल दादा देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त चाळीसगाव येथे सुमेध भोसले व मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा आहे. थॅलेसेमिया सारख्या आजारात नियमित नव्या रक्ताची गरज भासत असते. तसेच शासनाच्या वतीने नियमित रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. याचीच जाण ठेवत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. चाळीसगाव तालुक्यातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून दिवंगत अनिलदादा देशामुख यांची ओळख आहे. त्यांच्या घराबद्दल प्रचंड आदर आहे. दिवंगत अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती समाजोपयोगी काम करून जागृत कराव्या, अशी भावना रक्तदान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून…
जळगाव ः प्रतिनिधी I येथील रामेश्वर कॉलनीतील हरेश्वरनगर भागात हनुमान मंदिराच्या परिसरात गांधी रिसर्च फाउंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे देशी जातीच्या 250 वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपक्रमाची सुरुवात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते झाली. हरेश्वरनगरात रेमंड कॉलनी जलकुंभच्या खुल्या भूखंडावर हे वृक्षारोपण करण्यात आले. उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगितले. जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील अतीन त्यागी यांनीही विचार मांडले. मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. हा उपक्रम जैन इरिगेशनच्या सहकार्याने गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला. प्रतिष्ठानचे सचिव विजय वाणी, सदस्य सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वक उदय…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या भारतातील सर्वात प्रथम 12 वर्षा आतिल लहान मुलांच्या ग्रासरूट हॉकी स्पर्धेत जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डंका वाजविला. यात शाळेतील कार्तिक विनोद विसपुते, जयेश रवि संगेले यांची महाराष्ट्र संघात निवड झाली असून संघाचे प्रतिनिधित्व करत उपविजेतेपदक प्राप्त करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भीलवाडा येथे आयोजीत स्पर्धेप्रसंगी भारतातून पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कश्मीर तेलंगाना कोलकाता राजस्थान महाराष्ट्र हैदराबाद बिहार या 16 राज्यातुन संघ आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले. सहारनपुर उत्तर प्रदेश विजय झाले तर महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद संपादन केले.केले.हॉकी खेळाडूंना प्रा.आसिफ खान व सत्यनारायण पवार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था I देशात कोरोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाटी तिसरी लाट पीकवर असेल. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल म्हणाले की, या काळात देशात दररोज 4 ते 8 लाख रुग्ण संख्या आढळू शकते. इतकेच नाही तर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील,असा अंदाज तज्ज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनसारख्या निर्बंधांशिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही, हे या अंदाजावरून स्पष्ट होते. याशिवाय गतवर्षीप्रमाणे या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही. तिसरी लाट किती उंच जाऊ शकते आणि ही लाट किती काळ चालू राहील याबाबतही महेंद्र अग्रवाल यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था I राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक निर्बंध लागू झाले आहेत. 10 वी आणि 12 वी वगळता सर्व वर्ग 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा केला आहे. राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसमोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान 10 वी आणि 12 वी वगळता इतर सर्व वर्गांना 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षीदेखील…