मुंबई: मुंबईत करोनाच्या (Mumbai Corona) तिसऱ्या लाटेत (Mumbai corona third wave) मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, गंभीर करोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही कमी आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या २२ दिवसांत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीवरून असे दिसते की, दररोज सरासरी दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी करोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील दोन रुग्णांचा समावेश आहे. अधिकृत सूत्रांनुसार, मुंबईत साधारण २१ डिसेंबरपासून करोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली होती. त्यानंतर ११ जानेवारीपर्यंत म्हणजेच गेल्या २२ दिवसांत ९३, ३९६ करोना रुग्ण आढळून आले आहेत. इतक्या मोठ्या…
Author: saimat team
मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ईडी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा समोर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड ठाकरे सरकार माफ करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाऊ शकतो. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास आमदारासाठी असा विशेष निर्णय घेण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असेल. याशिवाय ठाकरे सरकार सरनाईक यांच्या छाबय्या विहंग इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही महामंडळाला देऊ शकते. त्यामुळे ठाकरे सरकार अचानक प्रताप सरनाईक यांच्यावर इतके मेहेरबान का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीमार्फत झालेल्या कारवाईने मोठे वादळ उठले होते. ईडीने सरनाईक यांच्या मालमत्ता व कार्यालयांवर…
मलकापूर प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या धरणगाव जवळ महामार्ग क्रमांक 6 वर लाकडाने भरलेल्या वाहनाचे समोरचे चा क निखळून पडल्याने ते चाक दुसऱ्या बाजूने येणारे वाहनावर जाऊन आदळले त्यामुळे वाहनाचे दर्शनी भागाचे नुकसान झाले व कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर लाकडाने भरलेल्या वाहन वनविभागाच्या कोणत्याच प्रकारची परवानगी नसताना अवैद्य लाकडे भरून मलकापूर कडून दसरखेड कडे जाण्यासाठी जात असता सदर अपघात झाला अपघातात कोणीही जखमी झाला नाही परंतु अपघात होण्याच्या काही मिनिटाच्या अवधी मध्ये प्रादेशिक वाहन निरीक्षक हे महामार्ग क्रमांक सहावर तपासणीसाठी आलेले होते त्या उपरही अशी अवैध लाकडी भरणारी वाहने व ज्यांची स्क्राप म्हणून गणना होते असे वाहन भरधाव निष्काळजीपणाने…
फैजपूर:प्रतिनिधी फैजपुरची भूमी ऐतिहासिक असून युवा पिढीला उच्च शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासोबतच करियर कट्टाच्या माध्यमातून तरुणांना करियरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालय सर्व सोयीं सुविधानी सुसज्ज व तत्पर आहे. यासोबतच व्यवस्थापन, प्रशासन व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून येणारा काळ येथील तरुणांसाठी सुवर्ण काळ असेल असे मत यशवंत शितोळे, अध्यक्ष एमकेसीएल यांनी व्यक्त केले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात करियर कट्टाच्या माध्यमातून आढावा भेटीदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय समन्वयक प्रा. डॉ. सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. ए. आय. भंगाळे, करियर कट्टा महाविद्यालय समन्वयक प्रा.…
जळगांव- जम्मू काश्मीर, गुलमर्ग येथे १५ ते १७ जानेवारी २०२२ होत असलेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी जळगांव सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले चाळीसगांवचे रहिवासी डॉ.अभिषेक पाटील व आकाश धनगर यांची आठव्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आईस स्टॉक विंटर खेळाला इंटरनॅशनल ऑलिम्पिकची मान्यताप्राप्त आहे. युवा व खेल मंत्रालयच्या ‘खेलो इंडिया’ साठीही आईस स्टॉक खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जळगांव जिल्हा आईस स्टॉक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.राहूल वाकलकर, प्रतीक शुक्ला, अनिल बाविस्कर, स्वप्निल जाधव, राहुल पाटील,उमेश हंडे, दीपक निकम यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रात आईस स्टॉक विंटर खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अविरतपणे कार्यरत असणारे महाराष्ट्र…
जामनेर (प्रतिनिधी):- आज दी.१२ जानेवारी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व परिवर्तन वादी संघटनेच्या माध्यमातून जिजाऊ पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवप्रेमींची कोरोनाचे नियम पाळून मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मराठा सेवा संघाच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. यावेळी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, जामनेर तालुका एजु.चे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,नगर सेवक महेंद्र बावीस्कर, सुहास पाटील, सुधाकर माळी, उल्हास पाटील, दत्तात्रय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पप्पू पाटील, प्रल्हाद बोरसे, अमोल पाटील…
(अडथडा न ठरणारे दुकानांचे ओटे तोडता) (बेसमेंट प्रश्नी जाणीवपूर्वक दुर्लक्ष का ?) जळगाव, विशेष प्रतिनिधी शहरात सध्या महापालिका प्रशासनाच्या आदेशावरून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.त्यात प्रामुख्याने महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित सहा रस्त्यावरील कच्ची व पक्की अतिक्रमणे हटविले जात आहेत. या कारवाईचे नागरिक स्वागत करीत आहेत.मात्र या कारवाई अंतर्गत कोणत्याच प्रकारचा अडथडा न ठरणारे गांधी रोडवरील दुकानांचे ओटे तोडले जात आहेत.वास्तविक ते अतिक्रमण किंवा अवैध बांधकाम ठरत नसतांना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर निर्दयीपणे हातोडा चालवीत आहेत आणि दुसरीकडे बेसमेंट च्या दुरुपयोग करणारांना पाठीशी घातले जाते आहे.त्याबद्दल महा- -पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जातो आहे. महापालिका प्रशासन व…
जामनेर (पंढरीनाथ पाटील):- जिजाऊ ,शब्द किंवा नावाचा ध्वनी नसून उतुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर वाहणारा निर्झर आहे.या गौरवशाली मातृत्वाच्या अत्युच्च शिखराला जगात तोड नाही. आदर्श ममतेचा,संस्काराचा,शौर्याचा,धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे माॕ.जिजाऊ… १२ जानेवारी १५९८ हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला,वैभवशाली यादव कुळातील लखुजी जाधवांच्या घरी म्हाळसाराणीच्या पोटी एका दैदिप्यमान कन्येने सिंधखेडराजा येथे जन्म घेतला. कन्याप्राप्तीचे स्वप्न साकार होण्याच्या या घटनेने आनंदित होवून राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली.राजघराण्यातील या कन्येला राजकारण,घोडस्वारी,तलवारबाजी,मुसद्देगीरी,युद्धकलेचे धडे घरातुनच गिरवता आले.इ.स.१६१० शहाजी राजेंसोबत जिजाऊंचा विवाह झाला ही स्वराज्य स्थापनेतील महत्वाची घटना. या वीर मातेच्या जीवनात आलेला एक एक प्रसंग व त्या…
मुंबई : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल (UP assembly-election-2022)वाजल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच उत्तरप्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (swami-prasad-morya) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप (BJP)अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मौर्य यांच्या पाठोपाठ भाजपचे तिंदवारी येथील आमदार बृजेश प्रजापती, बिल्होर येथील आमदार भगवती सागर आणि तिलहर येथील आमदार रोशन लाल वर्मा यांनी सुद्धा भाजपला सोडचिट्ठी दिली. यापार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मोठा झटका देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा लक्ष घालून आहे.…
* चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा फुटली पाईपलाईन * सरपंचांनी राजीनामा द्या तर नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा पहुर – जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा पाईपलाईन फुटल्याने सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात असून सरपंचांनी राजीनामा द्या तर पहूर कसबे ग्रामपंचायतला नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा अशी जोरदार मागणी केली जात आहे. पहूर कसबे गावातील लेले नगर भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने गेल्या नऊ दिवसांपासून या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना पाणी आले नाही त्यामुळे धरणात पाणी साठा असूनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली विशेष…