Author: saimat team

अलिबाग, वृत्तसंस्था । रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. बदनामी करण्याच्या हेतूने बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेला अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदार महिलाही उमेश ठाकूर यांच्या कटात सहभागी असल्याचे उघड झाले आहे. आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणाऱ्याचा काटा काढण्यासाठी त्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. या फेक सोशल अकाऊंटवरुन महिलेला अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठविण्यात येत होते. याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर सह शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही अटक…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान चार ते पाच प्रवासी का बसवले या कारणावरून दोन गटात बाचाबाची होऊन तूबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव हुन संभाजीनगर कडे जाणारी लक्झरी क्रमांक ‌ mh 12 FZ 8007 पहूर बस स्टँड वर आले असता पहूर बस स्टँड वर उभी असलेली ओमनी क्रमांकmh 06 ab 1127 या अवैध प्रवासी वाहतूक होत बसलेले चार ते पाच प्रवासी खाली उतरून लक्झरी बस कडे बसले असता या कारणावरून दोन गटात गैर कायदा मंडळी जमुन कोरांना कायद्याचा भंग करून वाहतुकीचा…

Read More

वर्धा, वृत्तसंस्था । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता नव्याने राज्यात दौरा करत आहेत. त्याचवेळी त्यांना एक एक धक्का बसत आहे. पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. आता विदर्भातही मनसेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्षच आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विदर्भात मनसेला मोठा झटका मानला जात आहे. विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आहे.ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विश्‍वसनीय गोटातील वृत्त आहे. या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राजमाता जिजाऊंचा ४२४ वा जयंती सोहळा आज जळगाव शहरात मराठा सेवा संघातर्फे उत्साहात पार पडला. यावेळी मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व शाखा अभियंता श्री. हिरामणराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना चव्हाण म्हणाले की, जिजाऊंनी आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रमासह सत्त्वगुणांचे बाळकडू दिले माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य…

Read More

मुंबई : प्रतिनिधी I पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक बोलवली असली तरी या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिलीय मात्र या निर्णयामधील कारणाबद्दल कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही. आरोग्यमंत्री राहणार उपस्थित पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल…

Read More

जळगाव, प्रतिनिधी I मकर संक्रांत या सणानिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. शिवाय पतंगशौकीन देखील पतंग उडवित असतात. जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी केली असून या संदर्भात मनपाने नायलॉन मांजाची विक्री होऊ नये म्हणून पथक निर्माण केले आहे. या पथकाने दोन तीन दिवसापासून शहरात फिरून नायलॉन मांजाची विक्री तर होत नाही ना? याबाबतची तपासणीही केली. मात्र या पथकाला हुलकावणी देऊन शहरातील काही भागात नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने सर्रास विक्री केली जात असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. विशेषत: जोशीपेठेतील पतंग गल्लीत पतंगांबरोबरच नायलॉन मांजाची विक्री छुप्या पध्दतीने केली जात असल्याचे विश्‍वसनीय गोटातील वृत्त आहे.

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना, याच दरम्यान संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे.त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू शकते. तिसऱ्या लाटेत गेल्या एका महिन्यात संसद भवनातील 718 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी बहुतेकांना गेल्या दोन आठवड्यांत संसर्ग झाला आहे. 9 जानेवारीपर्यंत सुमारे 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती, मात्र कालपर्यंत हा आकडा 700 च्या पुढे गेला आहे.गेल्या तीन दिवसांत या आकडेवारीत तब्बल 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वृतसंस्थेच्या वृत्तानुसार, बाधितांंपैकी सुमारे 200 कर्मचारी राज्यसभेतील आहेत.उर्वरित लोकसभेसह अन्य विभागांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरवासियांची खऱ्या अर्थाने नवीन नांदी सुरु झाली आहे. शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्या काळात रस्त्यावर डांबर ओतला गेला आहे. आजवर रस्त्यांची केवळ मलमपट्टी केली जात होती. अनेकवेळा डागडुजी केलेल्या रस्त्यांची नागरिकांना देखील चीड यायला लागली होती अखेर गेल्या महासभेत विकासकामांचे प्रस्ताव मंजूर झाले आणि आज नवीन रस्ते तयार करण्यास सुरुवात झाली. गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी देखील केली. जळगाव शहरातील रस्ते अटलांटा कंपनीने केलेल्या कामानंतर तयारच झालेले नव्हते. ठराविक प्रभागातील रस्ते सोडले तर मुख्य मार्ग आणि इतर रस्त्यांची आजवर केवळ डागडुजीच झाली आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अगोदरच दुर्दशा होती आणि त्यातच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यात कोरोना रूग्ण अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. तर १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- ६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार १६२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी तब्बल ४९५ कोटी १ लक्ष रूपयांची तरतूद असणार्‍या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तर उपमुख्यमंत्र्यांसोबत १८ जानेवारी रोजीच्या बैठकीत आपण जिल्हा विकासासाठी अजून ७५ ते १०० कोटी रूपयांची अतिरिक्त तरतुदीची मागणी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. या बैठकीत चालू वर्षातील ३५६ कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला. तर, सध्या कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन याच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या तब्बल १७ हजार ४६१ बेड उपलब्ध असून…

Read More