जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यात कोरोना रूग्ण अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. तर १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- ६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार १६२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी तब्बल ४९५ कोटी १ लक्ष रूपयांची तरतूद असणार्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तर उपमुख्यमंत्र्यांसोबत १८ जानेवारी रोजीच्या बैठकीत आपण जिल्हा विकासासाठी अजून ७५ ते १०० कोटी रूपयांची अतिरिक्त तरतुदीची मागणी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. या बैठकीत चालू वर्षातील ३५६ कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला. तर, सध्या कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन याच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या तब्बल १७ हजार ४६१ बेड उपलब्ध असून…
जामनेर, प्रतिनिधी । शेड बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर झालेले असून गोठ्याचे शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी (वय-५३) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने तीन हजार रूपयोची मागणी ११ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी सापळा रचुन लोकसेवक कनिष्ठ…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृहातील १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून सर्वांना उपचारासाठी जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात २८५ नवे रुग्ण आढळून आले. शासकीय कार्यालय, रुग्णालयानंतर आता जिल्हा कारागृहामध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केली. जिल्हा कारागृहामध्येदेखील काही कैद्यांना कोरोना आजाराची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनाने त्यांचे नमुने देऊन तपासणी करून घेतली होती. यात १३ कैदी…
मुंबई, वृत्तसंस्था । ‘या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलनं केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच’, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय…
जळगाव, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद जंयती व राजमाता जिजाऊच्या जन्मोत्सवानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात युवा संवाद अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ रंगकर्मी रमेश भोळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कोरोना काळातही संकटाचा सामना करीत सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य, नृत्य संगित क्षेत्रातील युवा कलावंत आपली कला जतन व संवर्धन करण्याच कार्य अविरतपणे करीत आहे. देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व जर टिकवायचे असेल तर आपली कला जिवंत ठेवणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक युवा कलावंताने करायला हवे, असे विचार रगंकर्मी रमेश भोळे यांनीव्यक्त केले. या वेळी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, राष्ट्रवादी…
चाळीसगाव(प्रतिनिधी)- कन्नड घाटात हैद्राबाद येथील स्टाईलस ने भरलेली आयसर गाडी पलटी झाली होती प्रचंड प्रमाणात गाडीचे नुकसान झाल्याने ट्रान्सपोर्टचे मालक शाहिद अली यांनी कन्नड घाटाजवळ असलेले राज ढाबाचे मालक बिस्मिल्ला शेख उर्फ छोटू पहेलवान यांच्याशी संपर्क साधला अपघात झालेला आयशर इन्शुरन्स क्लेम साठी गाडी धाब्यावर लावून घ्या छोटू पहेलवान व ट्रान्सपोर्ट मालक यांच्यात अपघात झालेल्या आयशरची खरेदी विक्री संमतीने करण्यात आली राज धाब्यावर इन्शुरन्स अधिकारी गेले असता त्यांना राज ढाबा येथे अपघात झालेली आयशर जागेवर न दिसल्याने त्यांनी गाडी मालक राजू भाई करंगीया रा.बडोदा गुजरात यांना इन्शुरन्स अधिकारी यांनी कळविले त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गाडी मालक यांनी गाडी चोरीस…
पाचोरा : जळगाव दिनांक 12 : सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येते. यावर्षी बँकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने सन २०२२ च्या दिनदर्शिकेत देशाच्या इतिहासातील विविध घटना दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सन २०२२ च्या या दिनदर्शिकेत सार्वभौम राष्ट्राची पायाभरणी, एकराष्ट्र-एकजन-संस्थांनांचे विलीनीकरण, जन आंदोलने, सहकार चळवळ आणि बँकांचा विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सर्वशिक्षा अभियान, आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय सुरक्षा, वैभव संपन्न सिनेसृष्टी, तंत्रज्ञ पानाने समृध्द संस्था, साहित्य कला आणि संस्कृती, भारताची क्रीडा शक्ती या आपल्या देशाच्या विविध क्षेत्रांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत करण्यात आला…
पाचोरा(वार्ताहर) पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार ,ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती.यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला. शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक…