Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आज जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. दि. १२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शालिनी सोनवणे यांनी जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेऊन व स्वामी विवेकानंदासारखे शांत संयमी आणि तेजस्वी राहता आले पाहिजे, तसेच महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी महिलांना सभासद नोंदणी कशी करावी. संघटन जास्तीत जास्त वाढवले पाहिजे. विकास मराठे यांनी सभासद नोंदणी फॉर्म कसा भरावा याची माहिती दिली. सर्व कार्यकारणीतील महिलांची सभासद नोंदणी करुन घेण्यात आली व काही महिलांना पदे वाटप करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. शालिनी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शिरसोली येथील हेमंतकुमार (राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु. किरण हेमंतकुमार चौधरी हिने बीई मॅकेनिकल इंजिनीयरिंग जीआरई परीक्षेत ३५० गुण मिळवून तिची एम. एस (मास्टर ऑफ सायन्स) साठी इटली येथील जगप्रसिद्ध विद्यापीठ “जेनोवा” येथे निवड झाली. यानिमित्त तिचा सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम शिरसोली येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आप्तेष्ठ, नातेवाईक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी कु. किरण चा सत्कार केला व तिला भावी उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कु. किरण ची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत सत्कार करतेवेळी मराठा – कुणबी समाजभूषण पुरस्कार प्राप्त ,गौरी उद्योग समूह, वावडदाचे चेअरमन तथा…

Read More

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक सीआर चौधरी हे होते. सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान त्यांच्या कार्यावर प्रमुख वक्ते सी आर चौधरी यांनी प्रकाश टाकला. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. जीवनाची दिशा व गती बदलण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या ,भोसले यांची सून, राजमाता जिजाऊ…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील शेंगोळा येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच मिनाबाई रताळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच संदीप सावळे, ग्रामपंचायत सदस्य सरला बेलेकर, हसीना तडवी, प्रतिभा गावंडे, माजी सरपंच दिलीप रताळ, समाधान गावंडे, वजीर तडवी संजय दाभाडे, समाधान मोकासरे, मोहन बेलेकर, देवगिर गोसावी ग्रामपंचायत कर्मचारी अमोल जोशी, नितीन बुदे, प्रमोद दौंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी I येथील विश्व मानव रुहाणी केंद्र येथे 4 महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रातील भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने विश्व मानव रुहाणी केंद्र येथील आवारात पेंव्हर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन केले होते, आमदार स्थानिक विकास निधीतून चारच महिन्यात सदर काम पूर्ण झाले व 9 जानेवारी रोजी विश्व मानव रुहाणी केंद्र चाळीसगावच्या 18 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदर लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून सदर पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपस्थित राज्य निगारण कमिटी अध्यक्ष गणेश धनगर सर यांनी मनोगतातुन आमदारांचे आभार मानले, खरच आपण फक्त आमदार नसून समाजाचे सेवक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी I येथील ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने लसीकरण शिबिर आयोजित केले होते. लसीकरण शिबिराचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी शहराचे 100 टक्के लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्या दृष्टीने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केले जाईल असेही त्यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोरोनाला न घाबरता त्याचा प्रसार होणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी महाविद्यालयाने दुस-यांदा लसीकरणाचा उपक्रम राबविल्याचे सांगीतले.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी I शहरातील दाणा बाजार येथील दत्त मंदिराजवळ स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे महापौर जयश्रीताई महाजन यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी रिध्दी जान्हवी फाऊंडेशन जळगाव यांच्या संस्थापक अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी यांनी दाणा बाजार येथे पेढे वाटून जयंती साजरी करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून गरीब मुलांना कपडे वाटप केले.तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोना आपत्तीच्या उपाययोजनेची दक्षता घेऊन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांना जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पद्मावती राणा, सविता दायमा, संगीता समदानी, सपना समदानी, नितेश पानसर, शेखर पाटील, विनोद चौधरी, भावेश सोनार,…

Read More

जामनेर ः प्रतिनिधी I राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व परिवर्तन वादी संघटनेच्या माध्यमातून जिजाऊ पूजन करून अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघाच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींची कोरोनाचे नियम पाळून मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, जामनेर तालुका एज्युकेशनचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, सुहास पाटील, सुधाकर माळी, उल्हास पाटील, दत्तात्रय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पप्पू पाटील, प्रल्हाद बोरसे, अमोल पाटील यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी I गिरणा नदीच्या प्रश्‍नांसह नदीवर तयार होणारा प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेष पाटील यांनी सुरू केलेल्या गिरणा नदी परिक्रमेचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू झाला. सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्राजवळ असलेल्या जलारामबाबा मंदिरापासून परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. परिक्रमेतून बलून बंधाऱ्याची लोकजागृती होत असून, 380 किलोमीटर गिरणा परिक्रमेचा दुसऱ्या टप्प्यात खासदार पाटील यांनी 32 किलोमीटर पायी चालत केला. अभियानाचा दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभप्रसंगी खासदार पाटील यांच्यासह भाजपचे उपजिल्हाप्रमुख पी.सी. पाटील, महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, तालुकाप्रमुख गोपाळ भंगाळे, पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, मनोज काळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, विवेक ठाकरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व पर्यावरणावर काम…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी I फळपीक विमा योजनेंंतर्गत हवामानाच्या निकषानुसार यावल तालुक्यातील एकाही महसूल मंडळाचा समावेश झालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल यासंदर्भात आयोजित बैठकीत खासदार रक्षाताई खडसे व आमदार शिरीषदादा चौधरी यांनी संताप व्यक्त केला. स्कायमेट कंपनीने अचूक नोंदी घेण्यासाठी हवामान केंद्र गावांत नव्हे तर थेट शेतात स्थलांतरित करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. हवामान केंद्र गावांत बसवल्याने हवामानात तफावत दिसते. परिणामी शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘स्कायमेट`च्या अधिकाऱ्यांनी यावल व चोपडा तालुक्यात पाहणी करून गावांत बसवलेले हवामान केंद्र शेतात बसवावे. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी कृषी अधिकारी कार्यालयात बसून, शेतकऱ्यांच्या तक्रारी, विम्याच्या दाव्यांचा निपटारा करावा, अशा सूचना खासदार, आमदारांनी…

Read More