जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ३५० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कोरोेना रूग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच असून आज रूग्णसंख्येने साडेतीनशेचा आकडा पार केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यातच आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३५४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या अहवालानुसार जळगाव शहर-१०८; जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ १३२; अमळनेर-१९; चोपडा-१९;…
Author: saimat team
पहूर , ता .जामनेर, प्रतिनिधी । गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी असलेली पाचोरा जामनेर रेल्वे बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करत पीजे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे आज शनिवारी पहूर येथे कॅप्टन दादासाहेब डॉ . एम . आर .लेले बस स्थानकासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले . या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . १०२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली पाचोरा जामनेर रेल्वे सेवा गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी आहे .पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांची गरज भागविली आहे . परंतू शासन आणि प्रशासन स्तरावर सदर रेल्वे सेवा बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने या निर्णयाविरोधात पाचोरा…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विविध परिसरात हेल्पिंग हँड्स ग्रुपच्यावतीने गोर गरिबांना फूड पाकीट वाटप करण्यात आले. हेल्पिंग हँड्स ग्रुप हा गेले कित्येक महिन्यांपासून गरजु व्यक्तींना दर महिन्याला अन्नदान करण्यात आले. या ग्रुपमधील सर्व सदस्य हे स्वखर्चाने व डोनेशन करून हा ग्रुप चालवतात. गरजू नागरिकांसाठी जीवनाश्यक वस्तू देखील या विद्यार्थ्यांनी वाटप करण्यात आले आहे. हा उपक्रम दर महिन्यातून केला जातो. यावेळी नेहा छाडीकर, मेहुल बैसाणे , तुषार छाडीकर, मोहित इंगळे, अंजली इंगळे, तेजस छाडीकर, मयुरेश, अभिषेक चांगरे, देवांग आदी उपस्थित होते.कोणाला काही मदती चा हात लावण्या ची इच्छा असेल तर या नंबर वर ९०२१७०७७४९ संपर्क साधा.
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,९८० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,०८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आंडगाव फाटा आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटर वर आहे. या आंडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्राकडे जातांना 6 किलोमीटर वर श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमान मंदिरापर्यंतची सडक हि पक्की डांबराची आहे. श्री हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे. श्री हनुमान मंदिरापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर वर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा…
जिल्हा बँकेचे चेअरमन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा ही कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव आला असून लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृहविलगीकरण ठेवण्यात आले आहे. देवकर यांना शुक्रवारी अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यांचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून देवकर हे कोरणा बाधित असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन दिवसात आपल्या संपर्कात असलेले कार्यकर्त्यांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन देवकर यांनी केले आहे
जळगाव प्रतिनिधी । बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याचा प्रकार शनिवार १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी कॉलनी येथील कंवर नगरात राहणारे हरीश खियलदास रावलानी (वय-५५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीरामपेठ येथे कपड्याचे दुकान आहे. नुकतेच रावलानी यांनी गणपती नगरातील साकार अपार्टमेंट येथे नवीन फ्लॅट घेतला असल्याने जुन्या घरातून नवीन घरात सामान टाकण्याचे काम सुरू होते. १० जानेवारी रोजी त्यांनी काही सामान शिफ्ट केले होते. त्यानंतर ११ वाजता कंवर नगरातील घराला कुलूप लावून ते गणपती नगरातील घरी गेले. त्यानंतर शनिवारी १५…
जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रकक्षाच्या मागील बाजूस असलेल्या सी- २ कक्षात कोरोना रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे. शनिवारी दि. १५ जानेवारी २ रुग्ण दाखल झाले आहे. जिल्हयात दररोज कोरोना महामारीची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करणे सोयीचे व्हावे याकरिता सी-२ कक्षाची पाहणी करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आणि कमर्चाऱ्यांना विविध सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीनवेळा सी- २ कक्ष धुवून, खाटांवर नवीन चादरी टाकून सी २ कक्ष सज्ज करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आला आहे. दुपारी महाविद्यालय व रुग्णालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आल्यानंतर…
जळगाव, प्रतिनिधी । कुणा मान्यवराचा सत्कार हा एखादा कार्यक्रम, लहान-मोठे फंक्शन; निवास, ऑफीस, विश्रामगृह आदी ठिकाणी होत असल्याचे आपल्याला माहित आहे….मात्र भर रस्त्यात आणि तो देखील मंत्र्यांचा सत्कार झाल्यावर आपला विश्वास बसणार नाही. तथापि, ही बाब प्रत्यक्षात खेडी ते आव्हाणे या मार्गावर घडली. ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेती रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिल्यामुळे शेतकर्यांना आपल्या शेत-शिवारात जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचा थेट त्यांच्यामुळे तयार झालेल्या रस्त्यावरच सत्कार केला. शेतकर्यांचे प्रेम पाहून पालकमंत्री भारावले. तर परिसरात हा एकच चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय…