पाचोरा(वार्ताहर) पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार ,ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती.यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला. शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक…
Author: saimat team
जामनेर(प्रतिनीधी):- येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती काल दि.१२ रोजी साजरी करण्यात आली.यावेळी ऑनलाईन झूम मिटिंग द्वारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेेचे पूजन प्राचार्य राजेंद्र सोनवणे व उपशिक्षक विजय कोळी यांनी केले. त्यानंतर सर्वांनी प्रतिमेस अभिवादन केले.सदर प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने इ.९वी ची विद्यार्थ्यांनी कु .वैष्णवी बेलदार हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून जिजाऊ वंदना गायली. प्रास्तविक शाळेचे उपशिक्षक विनय खोंडे सर यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चाळीसगाव–(वार्ताहर) येथील रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा विविध अध्यात्मिक उपक्रमांनी संपन्न झाला. स्वामी विवेकानंद यांची जयंती सर्वत्र युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्याच अनुषंगाने 12 जानेवारी बुधवारी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था घाट रोड येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल. डी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी सेवा संस्थेच्या ध्यान मंदिरा मध्ये अध्यात्मिक पूजापाठ करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग प्रशांत साळी यांनी उपस्थितांना कथन केले. त्याचबरोबर सेवा संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, युवक – युवती व इतर नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळांना निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करोनामुळे उच्च न्यायालयात तातडीच्या याचिकेंवरच सुनावणी होत असल्याने या याचिकेवर सुनावणीसाठी महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ने न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही अर्ज दाखल केला होता. माझ्यावर करण्यात आलले आरोप निराधार…
भारताच्या बॅडमिंटन (Indian Badminton) क्षेत्राला कोरोनाने जबरदस्त हादरा दिला आहे आणि इंडियन ओपन स्पर्धेत खेळणारे तब्बल सात भारतीय बॅडमिंटनपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यात किदांबी श्रीकांत व अश्विनी पोनप्पा सारख्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी मंगळवारी RT-PCR चाचणी केली होती आणि तिचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला आहे अशी माहिती भारतीय बॅडमिंटन महासंघाने दिली आहे. बाधा झालेली आढळून आलेल्या खेळाडूंमध्ये अश्विनी पोनप्पा, रितिका ठाकरे, त्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंघीआणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी आता इंडिया ओपन स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. या खेळाडूंचे दुहेरीतील साथीदार असलेल्या खेळाडूंनीही इंडिया ओपन मधून माघार घेतलेली आहे.…
नमस्कार मंडळी ???????? ????आज आपण मकर संक्रांतीचे महत्व जाणून घेऊ या ????या वर्षी 14 जानेवारी ला दुपारी 2 वाजुन 28 मिनिटांनी सूर्य नारायण मकर राशीत प्रवेश करीत आहे ????सूर्य त्याचा पुत्र शनी ???????? च्या घरी म्हणजे मकर राशीत प्रवेश करीत आहे… या ठिकाणी सूर्याचा मुक्काम 1 महिना असतो त्यामुळे शनीला फार आनंद होतो ????काही ज्योतिषांचे असे म्हणणे आहे की शनी आणि सूर्य हे शत्रू आहे पण हे सपशेल खोटे आहे, कारण पिता पुत्रा मध्ये मतभेद असू शकतात पण शत्रुत्व नसते ????शनी विषयी पुढच्या लेखात आपण सविस्तर पणे चर्चा करू.. आता फक्त मकर संक्रांती चे महत्व काय त्या विषयी चर्चा…
मुंबई: करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिल्यास फेब्रुवारी महिन्यात राज्यातील करोना निर्बंध शिथील केले जातील, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यात करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. परंतु, गेल्या-दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत फारशी वाढ झालेली नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील निर्बंध पुन्हा शिथील होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सध्या महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची…
चोपडा प्रतिनिधी :- येथील पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक सीआर चौधरी हे होते. सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान त्यांच्या कार्यावर प्रमुख वक्ते सी आर चौधरी यांनी प्रकाश टाकला. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. जीवनाची दिशा व गती बदलण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या ,भोसले यांची सून, राजमाता जिजाऊ…
एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुतीसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यभरात दौरे करत आहेत. मात्र दुसरीकडे पक्षाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. आता विदर्भातही मनसेला मोठा धक्का बसणार आहे . मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले (Atul Wandile) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा म्हणून अतुल वांदिले ओळखले जातात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात 40 पदाधिकाऱ्यासोबत वांदिले राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. वांदिले यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । घरामध्ये बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कुर्हा येथील एक त्याच्या घराच्या गच्चीवर विनापरवाना बनावट विदेशी दारू तयार करत असून शासनाचा कर बुडवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता यावर कारवाई करत कुऱ्हा येथील तरूणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील एक तरूण विनापरवाना बनावट विदेशी दारू त्याच्या राहत्या घरावरील गच्चीवर तयार करून विक्री करून शासनाचा मोठ्या प्रमाणावर कर बुडवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या…