अमरावती, वृत्तसंस्था । अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक पुतळा हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. दर्यापूर येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने हटवत कारवाई केली आहे. शिवसेनेकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. याआधी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये परवानगी नसतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात विनापरवाना शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं पुतळा हटवण्याची कारवाई केली. आमदार रवी…
Author: saimat team
भारतीय बाजारात जगभरातील टेक कंपन्या आपल्या स्मार्टफोन्स सादर करत आहेत. नवनवीन फोन्सला भारतीय ग्राहकांची प्रचंड मागणी पाहायला मिळत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या दरआठवड्याला एंट्री लेव्हल स्मार्टफोनपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करत आहेत. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले फोन्स उपलब्ध आहेत. तुमचे बजेट थोडे अधिक असल्यास फ्लॅगशिप स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. जवळपास ५० हजारांच्या बजेटमध्ये OnePlus 9RT, OnePlus 10 Pro 5G, Realme GT 2, Samsung Galaxy S21 5G आणि Vivo X70 Pro या फोन्सला खरेदी करू शकता. यातील काही फोन्स भारतात काही दिवसांपूर्वीच लाँच झाले आहेत. या फोनमध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफुल…
आज आम्ही त्या १० कार संबंधी माहिती देत आहोत. ज्याला देशात सर्वात जास्त खरेदी केले जात आहे. डिसेंबर महिन्यात टॉप १० बेस्ट सेलिंग कारची (best selling cars in india) यादी समोर आली आहे. गेल्या महिन्यात Maruti Suzuki WagonR (मारुती सुझुकी वेगनआर) देशातील सर्वात जास्त विकणारी कार राहिली आहे. गेल्या महिन्यात वेगनआरने Maruti Suzuki Baleno (मारुती सुझुकी बलेनो), Tata Nexon (टाटा नेक्सॉन), Maruti Suzuki Ertiga (मारुती सुझुकी अर्टिगा) पासून Maruti Suzuki Alto (मारुती सुझुकी ऑल्टो) आणि Hyundai Venue सारख्या कारला मागे टाकून देशातील सर्वात जास्त विकणाऱ्या कारचा किताब आपल्या नावावर केला आहे. जाणून घ्या डिटेल्स. १. Maruti Suzuki WagonR (मारुती सुझुकी…
उनपदेव हे सातपुडा पर्वत माथाच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि जिल्ह्यात भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. सातपुडा पर्वत रांगेतले इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनपदेव आणि निझारदेव. तीनही ठिकाणे रामायण महाकाव्यात आढळली आहेत आणि अयोध्येतील चौदा वर्षांच्या बहिष्कारानंतर प्रभू राम यांचा स्पर्श आहे. गोड पाणी वर्षभर संपूर्णपणे वाहणारे गाईच्या तोंडून वाहते असे दिसत आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाला आणखी एक परिमाण जोडते. असे म्हटले जाते की गरम पाण्यात त्वचेची कमतरता बरा करण्याची क्षमता आहे. हे पवित्र स्थान रस्तेंद्वारे उत्तम प्रकारे जोडलेले आहे. पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक जळगाव रेल्वे स्थानक आहे
बोदवड, प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या दुसर्या टप्प्यातील निर्णायक क्षणांमध्ये आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची बोदवड येथे झालेली भेट चर्चेचा विषय बनली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या दरम्यान माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुध्द चांगलेच रंगले होते. यात नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांची शहरात एकमेकांच्या समोर झालेली सभा प्रचंड गाजली होती. यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. यात आ. गिरीश महाजन यांनी बोलण्याच्या ओघात खडसे यांनी खूप प्रयत्न करून देखील आमचे चंद्रकांत पाटील हे जिंकल्याचे नमूद केले होते. यातील आमचे या शब्दावरून निवडणुकीच्या रणांगणात बर्याच काथ्याकुट करण्यात आला.…
मुंबई, वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या ८ जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. करोनासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली आहे. काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याची अफवा पसरली होती. मात्र लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने केली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवदेनानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. लतादीदींबाबत खोट्या बातम्या पसरवताना पाहून त्रास होतो. त्यामुळे कृपया लक्षात घ्या की लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. कृपया त्या घरी लवकर परतण्यासाठी प्रार्थना करा, असे ते म्हणाले. लता…
जळगाव- श्री राजपूत करणी सेनेने फक्त राजपूत समाजासाठीच मर्यादित न राहता इतर समाजबांधवांना सुध्दा सोबत घेऊन विविध क्षेत्रात सर्वांसाठी विकासाचे कार्य करावे. सर्व समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन श्री राजपूत करणी सेनेचे राज्याध्यक्ष श्यामसिंग ठाकूर यांनी केले. श्री राजपूत करणी सेनेच्या नूतन पदाधिकऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या सत्कार समारंभ कुसुंबा येथे झाला. याप्रसंगी श्यामसिंग ठाकूर बोलत होते. या संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांची आता राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उज्ज्वला पवार, महिला विभागाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी मनीषा पाटील, युवती प्रदेश अध्यक्षपदी वैशाली साळुंके, महिला प्रदेश संघटकपदी आशा…
चाळीसगाव, प्रतिनिधी । “मुस्लीम समाजाच्या हक्काची कब्रस्थान ची जागा मिळविण्यासाठी आमच्या अनेक पिढ्या थकल्या, सरकार दरबारी फेऱ्या मारल्या, १० वर्ष कोर्ट कचेऱ्या केल्या ज्या अजून सुरूच आहेत, या काळात अनेक लोकप्रतिनिधी, आमदार आले आणि गेले, अनेकांनी एक शब्द टाकला असता तरी काम झाले असते मात्र त्यांनी ते जाणूनबुजून केले नाही, मात्र आमदार मंगेशदादा तुम्ही आमच्यासाठी फरीस्ता बनून आलात, ६५ वर्षापासून साधी मोजणी देखील न झालेल्या जागेची मोजणी करून त्याची हद्द कायम करून दिली, एव्हडेच नव्हे तर या जागेला शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने तार कंपाऊंड करून देत आहात, मुस्लीम समाज आपले हे काम कधीच विसरणार नाही” अश्या शब्दात भावना…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ३५० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कोरोेना रूग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच असून आज रूग्णसंख्येने साडेतीनशेचा आकडा पार केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यातच आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३५४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या अहवालानुसार जळगाव शहर-१०८; जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ १३२; अमळनेर-१९; चोपडा-१९;…
पहूर , ता .जामनेर, प्रतिनिधी । गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी असलेली पाचोरा जामनेर रेल्वे बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करत पीजे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे आज शनिवारी पहूर येथे कॅप्टन दादासाहेब डॉ . एम . आर .लेले बस स्थानकासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले . या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . १०२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली पाचोरा जामनेर रेल्वे सेवा गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी आहे .पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांची गरज भागविली आहे . परंतू शासन आणि प्रशासन स्तरावर सदर रेल्वे सेवा बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने या निर्णयाविरोधात पाचोरा…