जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश लिलाधर झोपे (वय ६३, रा. नशिराबाद) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते सेवानिवृत्त असून गुरांसह शेतीचा व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या दोन म्हशी गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात बांधलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हशी चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आला. याबाबत सुरेश झोपे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात…
Author: saimat team
नवी दिल्ली, । कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) देशभरातून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10 वी आणि 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. ESIC ने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), स्टेनोग्राफर (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यासह एकूण 3847 रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. तुम्ही केवळ ESIC वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2022 पासून सुरू होईल आणि ESIC ऑनलाइन नोंदणी सबमिट करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, ESIC भरती 2022 साठी एकूण 3847 रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीच्या आधारे केली जाईल आणि…
जळगाव प्रतिनिधी । गुरे चारण्याच्या कारणावरून एकाला दोन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंडारी येथील रहिवाशी राजू शेख बाबु (वय-५४) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार १३ जानेवारी रोजी राजू शेख बाबु यांच्या शेताच्या बांधावर भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे याने गुरे चारण्यासाठी सोडले होते. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राजू शेख बाबु हे घरी गेले असता याचा राग असल्याने भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे आणि मयुर विश्वासराव सुर्वे रा. कंडारी ता.जि.जळगाव यांनी चापटाबुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली.…
चोपडा, प्रतिनिधी । येथील युवा नेतृत्व प्रा.दिव्यांक सावंत यांची अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या “युवक प्रदेश उपाध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्ती पत्र त्यांना पुणे येथील मराठा महासंघाच्या केंद्रीय कार्यालयाकडून प्राप्त झाले.नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली.या आधी प्रा.दिव्यांक सावंत यांनी यापूर्वी चोपडा शहराध्यक्ष पदापासून ते जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख पदी कार्य केले आहे.त्यानंतर त्यांच्या कार्याच्या जोरावर व कामाशी असलेल्या एकनिष्ठते मुळे त्यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले.संटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम व तसेच संघटना वाढीस सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे दिव्यांक सावंत यांनी कळविले.या नियुक्ती मुळे प्रा.दिव्यांक सावंत यांच्यावर समाजातील सर्व…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रामदास पार्कवरील प्रशस्त उद्यानाच्या साकारण्यास आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. स्थानिक नगरसेवक अनंत जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर काम सुरु झाले असून मकरसंक्रांतीच्या मंगल पर्वावर महापौर व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी पाहणी केली आली. या कामामुळे शहरातील नागरिकांना दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. शहराच्या मुख्य परिसरात असलेल्या रामदास कॉलनीतील रामदास पार्क मैदानावर उद्यान विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी ठराविक नागरिकांच्या विरोधामुळे तो प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी…
चोपडा, प्रतिनिधी । शहरात मकर संक्रांति सणाच्या दिवशी दुपारच्या सुमारास अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करत असतांना आढळून आल्याची घटना घडली, प्रकरणी त्या व्यक्तिविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १४ जानेवारी मकर संक्रांती सणाच्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील मेन रोड वरील अरिहंत जनरल स्टोअर्स मध्ये दुकान मालक राहुल सुभाष जैन (वय – ४६) धंदा व्यापार , रा.राणी लक्ष्मीबाई चौक चोपडा हा स्वतःचे फायद्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी विक्रीकरिता बंदी घातलेला तसेच इतरांचे जीवितास व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारा २८२० रुपये किमतीचे ४८ नायलॉन मांजा दोरा त्यात १७०० रुपये किमतीचा प्रति ५० रुपये दराचा एकूण…
नाशिक, वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील जवानांसह दोन जण नेपाळ येथील विरपुर सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्याच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील मुळ रहिवासी असलेल्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. अमोल हिम्मतराव पाटील (वय – ३०) असे जवानाचे नाव आहे. विजेच्या तारांचा धक्का लागल्याने अमोल याचा मृत्यू झाला आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर अमोल कर्तव्यावर असतांना हा प्रकार घडला. मकर संक्रांतीच्या दिवशी अमोलसह अन्य दोघांना देखील वीरमरण आले आहे.
यावल, प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अवैध सावकारी करणाऱ्या एका तरुणावर मकरसंक्रांतीच्या दोन दिवस आधी कायद्याची संक्रांत कोसळल्याने,अवैध सावकारीचा भांडाफोड झाल्याने पर्यायी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आश्रय घेणाऱ्या,माहितीचा अधिकाराचा,आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून वैयक्तिक हेतू साध्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांस व त्याच्या नेतेमंडळीस मोठी कायदेशीर चपराक बसल्याचे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह नागरिकांमध्ये बोलले जात आहे. अनधिकृत सावकारीच्या माध्यमातून यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात ज्या नागरिकांची, महिलांची,सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांची आर्थिक पिळवणूक झालेली आहे किंवा अनाधिकृत सावकारांनी दादागिरी करून मारझोड करून ज्यांच्या शेतजमिनीवर,घरावर,प्लॉटवर बेकायदा कब्जा करून ठेवलेला आहे तसेच दुचाकी चारचाकी वाहने ताब्यात घेतलेली आहे त्यांनी तसेच माहिती अधिकाराचा(शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अर्ज…
यावल, प्रतिनिधी । कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे अशी मागणी यावल तालुका भीम आर्मी अध्यक्ष प्रवीण डांबरे व पदाधिकाऱ्यांनी यावल नगर परिषद येथे मागील काही वर्षा पासून कंत्राटी सफाई कामगार रोजाने काम करीत आहेत. तरी त्या मजुरांना जे वेतन दिले गेले पाहिजे ते दिले जात नाही. किमान वेतना पासून त्याना वंचित ठेवण्यात येत आहे असे आमच्या निर्दशनास आले आहे. ज्या कामगारानी स्वच्छ भारत अभियान २०२१ अंतर्गत कचरा मुक्त शहर या केंद्र शासनाचा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवर आपल्या यावल नगरपालिकेला ४ था गुणक्रमांक प्राप्त करुन दिला त्याच कामागरांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. कमी वेतन मिळत नसल्यामुळे…