फैजपूर: प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर महाविद्यालयीन भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ. सतिश चौधरी हे उपस्थित होते. उद्घाटन समारंभास प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा.…
Author: saimat team
पाचोरा(वार्ताहर) पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वाचन संस्कृती वाढीसाठी पुढे सरसावत तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मतदारसंघातील २९ सार्वजनिक वाचनालयांना संक्रांत भेट म्हणून १३ लाख रुपयांची पुस्तके आपल्या स्थानिक विकास निधीतून भेट देत त्यांची संक्रांत गोड केली आहे.पाचोरा भडगाव तालुक्यातील वाचनालयांना पुस्तके वितरणाचा कार्यक्रम ‘शिवालाय’ या संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी ११ वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे होते व प्रमुख पाहुणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व वाचनालयाच्या संचालकांना युवा वर्गाला अधिकाधिक वाचनालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे व…
मुक्ताईनगर — शहरातील जुन्या गावातील नथाबाई दौलत बोदडे (वय 85 वर्षे ) यांचे आज पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती संतोषदादा बोदडे तसेच कॉन्ट्रॅक्टर दिलीप बोदडे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात मुले , मुलगी , जावई , सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र अडचणीत असताना केंद्र सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. तेव्हा केंद्राने मदत केली असती तर महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले नसते, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केले आहे. त्याचबरोबर आज सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालय ओबीसी समाजाला दिलासा देणारा निर्णय घेईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यावर केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह देशातील ओबीसी समाज एकवटताना दिसत आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून इम्पेरिकल डेटा गोळा…
मुंबई : शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालायनेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावर निकालासाठी उच्च न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. मात्र…
वर्धा, वृत्तसंस्था । वर्धा (Wardha) शहरातील कदम रुग्णालयाच्या परीसरात मानवी कवट्या आणि काही अवशेष आढळल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. प्रकरणात आता वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये (Arvi) असलेल्या कदम रुग्णालयाच्या डॉ.नीरज कदमला (Dr.Niraj Kadam) अटक करण्यात आली. शनिवारी रात्री पोलिसांनी नीरजला (Dr.Niraj Kadam) अटक केली असून अटकेतील संशयीतांची संख्या आता सहा झाली आहे. दरम्यान, कायद्याला वेशीवर टांगून गर्भपात करणार्या आर्वीतील डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये (Warda Kadam Hospital) अवैध गर्भपाताची नोंदच टाळून सांकेतिक भाषेत गर्भपाताची चिठ्ठी तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. घरातून मिळाली काळविटाची कातडी डॉ.निरज कदमच्या (Dr.Niraj Kadam) घरामधून तपासणीदरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी…
सावदा-प्रतिनिधी “सदरील घन कचरा प्रकल्प व त्याच्याशी निगडित बाबींची वृत्तसंकलन साठी पालिकेत जाऊन दि.१० जानेवारी २०२२ रोजी पत्रकारांनी चौकशी केली असता मला याची काहीच माहिती नाही माझाकडे कोणत्याच प्रकारचे बिल वगैरेचा लेखाजोखा नसून अकाउंट विभागात तुम्ही जाऊन चौकशी करावी.किंवा अर्ज टाकून माहिती विचारावी असे बेजबाबदारीचे व उडवाउडवीचे उत्तर आरोग्य अधिकारी महेश चौधरी यांनी दिल्यामागील कारण काय?यात खरोखर काही गौडबंगाल तर नाही ना?किंवा त्यांचे सदरील ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध तर नाही ना? अशी शंका आरोग्य अधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थित होत असून याआधी देखील या आरोग्य अधिकारीच्या कार्यकाळातील भोंगळ कारभार बाबत एका विद्यमान नगरसेविकेने तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे.मात्र या दिशेने…
पहुर. ता.जामनेर-येथील जिजाई चँरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या गुणवंताचा गौरव करण्यात आला. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथील ईंग्रजी शिक्षक तसेच इंग्लिश टीचर असोसिएशन चे कार्यकारी संचालक शंकर रंगनाथ भामेरे यांनी असोसिएशन आँफ इंग्लिश टीचर(आईनेट)आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्या तर्फे आयोजित तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. तसेच पहुर पेठ येथील ऋषिकेश चंद्रकांत पांढरे याची जळगाव पोलिस दलात निवड झाल्याबद्दल आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका पल्लवी वानखेडे राऊत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा घेण्यात आलेल्या शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम पदवी(बीएड)या परिक्षेत प्रथम वर्षात९२.६१टक्के गुण मिळवून सुयश संपादित केले याबद्दल या तीनही गुणवंताचा शाल,पुष्पहार व श्री फळ…
मुंबई : प्रतिनिधी ठाण्यातील कळवा येथे खारेगाव उड्डाणपुल लोकार्पण सोहळ्यादरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद पेटला . दोन्ही नेत्यांमध्ये उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या. हा वाद चिघळतच चालला आहे. यावरून आता शिवनेतेचे नेते, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांना सुनावले. आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते, मात्र त्यांना ते जमले नाही,बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसे वागायला पाहिजे, असा शब्दात एकनाथ शिंदे यांनी परांजपे यांच्यावर…
पहूर , ता .जामनेर ( प्रतिनिधी ) : – गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी असलेली पाचोरा जामनेर रेल्वे बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करत पीजे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे आज शनिवारी पहूर येथे कॅप्टन दादासाहेब डॉ . एम . आर .लेले बस स्थानकासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले . या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . १०२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली पाचोरा जामनेर रेल्वे सेवा गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी आहे .पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांची गरज भागविली आहे . परंतू शासन आणि प्रशासन स्तरावर सदर रेल्वे सेवा बंद करण्याचा घाट…