Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर तर्फे आजपासुन दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे . सदर जनता दरबारात नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडाव्यात असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आलेले होते . त्याअनुषंगाने आज रोजी सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 पासुन नागरिकांनि राष्ट्रवादी कार्यालयात येऊन आपल्या समस्या तोंडी व लेखी स्वरूपात मांडल्यात यात प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांना सुविधा मिळत नसलेबाबत व इतरही विषयी समस्या मांडण्यात आल्यात त्यानुसार तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देण्यात आले…

Read More

कोल्हापूर, प्रतिनिधी । शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे आज वयाच्या ९३ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ व्यक्तीमत्त्व हरपले आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एन. डी पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । भिवंडी; एका बंद कपड्याच्या कंपनीत आग लागल्याने धक्कादायक प्रकार . या आगीत कंपनीतील करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला. भिवंडीत अग्नी तांडव सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास भिवंडी शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागुन कारखान्यातील कपड्यांचा मोठा साठा जळून खाक झाला आहे.या कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत. मात्र दुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही भिवंडी परिसरात वेळोवील आगी या लागतंच असतात, प्रामुख्याने या आगी जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान जास्त लागत असल्याच्या आतापर्यंतच्या पाहणीवरू दिसून आले आहे. त्या मुळे या आगी लागतात का लावल्या जातात हाच प्रश्न सद्या उपस्थित…

Read More

चाळीसगाव(प्रतिनिधी)-येथील नानासाहेब य. ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव तसेच चाळीसगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वनविभाग यांच्या आदेशानुसार ” माझी वसुंधरा” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाने दिनांक ८/१/२०२२ रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन झूम मीटिंगचे आयोजन केले होते. या मीटिंगमधे एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी योगेश मंडोळे यांनी विद्यार्थ्यांना ” हरित वासुंधरेची शपथ दिली” दिनांक ०९/०१/२०२२ रोजी दुपारी दोन वाजता ऑनाइन झूम मीटिंगचे मा. प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या व चित्रकला यांचे निरीक्षण निवड माननिय प्राचार्य…

Read More

रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडे विविध किमतींवर अधिक लाभांसह अनेक धमाकेदार प्लॅन्स आहेत. किंमती वाढल्यानंतरही एक योजना खूप लोकप्रिय आहे आणि सर्वांना ती आवडते. कारण ते कमी किमतीत OTT फायदे देते. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Disney Plus Hotstar आणि Amazon Prime मोफत मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर… जिओचा ५९९ रूपयांचा पोस्टपेड प्लॅन जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला १०० जिबी डेटा दिला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर १० रुपये प्रति जीबी शुल्क आकारले जाते. प्लॅनची ​​सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यूजर्सना २०० जिबी पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते. अमर्यादित कॉलिंग या प्लॅनमध्ये डेटासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग…

Read More

नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेश बांदेकर, नगरविकास विभागाचे प्रधान…

Read More

इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी इग्निट्रॉन मोटोकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली दुसरी बाईक लॉन्च केली आहे. भारतीय स्टार्टअप कंपनीने इलेक्ट्रिक डर्ट बाइक सायबॉर्ग Bob-e सादर केली. ही एक स्टायलिश बाइक असून तरुणांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन तयार करण्यात आलं आहे. ही गाडी एका चार्जवर ११० किमी धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सायबोर्ग बॉब-ई इलेक्ट्रिक मोटरसायकल आर्टिफिशियल इंटेलिजेंस-सक्षम तंत्रज्ञान आणि सुधारित सुरक्षा फिचर्ससह तयार केली आहे. स्टार्टअपचा असा दावा आहे की ही इलेक्ट्रिक डर्टबाईक तरुण पिढीच्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही गाडी दोन रंगाच्या पर्यायमध्ये उपलब्ध असून काळा आणि लाल रंगात येते. ही गाडी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून सुरक्षिततेच्या…

Read More

न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकणार ऑस्ट्रेलियातील केंद्रीय न्यायालयाने परत पाठवणीविरोधातील अर्ज फेटाळल्याने प्रचंड निराशा झाल्याची कबुली विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी दिली. जोकोव्हिच अखेर माघारी; व्हिसा रद्द न करण्याची विनंती ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने फेटाळली करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेताच ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाचे परकी नागरिकविषयक खात्याचे मंत्री (इमिग्रेशन मिनिस्टर) अ‍ॅलेक्स हॉक यांनी शुक्रवारी रद्द केला होता. त्याने या निर्णयाविरोधात दाद मागितली. मात्र, रविवारी केंद्रीय न्यायालयाच्या तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने जोकोव्हिचच्या विरोधात निकाल दिला. हॉक यांनी उचलेले पाऊल हे ‘तर्कहीन किंवा कायदेशीरदृष्ट्या अवास्तव’ होते का, याबाबत विचार केल्यानंतर आम्ही जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय…

Read More

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. कर्णधारपदावरून हटल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार नसल्याने विराटने वेगळे काही करण्याची गरज नाही, असे मत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने व्यक्त केले. विराट कोहलीने टी-२० प्रकाराचे कर्णधारपद सोडल्यानंतर संघ निवडकर्त्यांनी त्याची एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आणि रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले. स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनवर चर्चेवेळी गौतम गंभीरला एक प्रश्न विचारण्यात आला. ‘आपण नवीन कोहलीला पाहणार आहोत का?’ या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला की, ‘तुम्हाला नवीन काय पाहायचे आहे? कर्णधारपद हा कुणाचा जन्मसिद्ध हक्क…

Read More

मुंबई : मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या किरण मानेला (Kiran Mane) प्रोडक्शन हाउसने हाकलून दिले आहे. मग मानेने नवे नाट्य उभे केले. महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत! असा आरोप भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला व कोण आहेत मानेचे बोलवते धनी ? असा प्रश्न विचारून या सोंगाड्यावर कारवाई करा. शिक्षा झालीच पाहीजे, अशी अंगणी केली. प्रकरण प्रकरण असे की, स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील किरण माने या अभिनेत्याला संबंधित वाहिनीने तडकाफडकी मालिकेतून डच्चू दिला. यानंतर किरणने ‘मी सत्तारूढ (भाजपा) पक्षाच्या नेत्यांवर टीका करणारी पोस्ट टाकल्याने मला राजकीय दबावामुळे मालिकेतून…

Read More