Author: saimat team

मुंबई, प्रतिनिधी। सातवीनंतर शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अल्पसंख्याक समाजामध्ये विशेषत: मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत त्या संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहे, अशा शाळांमधील वर्गवाढीस मंजूरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्व संबंधितांची…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. देशमुखांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. डिफॉल्ट जामीनासाठी देशमुखांनी हा अर्ज दाखल केला होता. विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश आर.एन. रोडके यांच्यापुढे आजची सुनावणी पार पडली. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा नाकारण्यात आला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. तर राज्य सरकारने परमबीर यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील रहिवासी तरुण शेतमजुराने नैराश्यातून विषप्राशन करीत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला पाचोरा येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या जगण्याची शक्यता मावळली होतीच, मात्र वैद्यकीय पथकाने हार न मानता त्याला २० दिवस अतिदक्षता विभागात ठेऊन त्याचे प्राण वाचविले. मंगळवारी दि. १८ जानेवारी रोजी त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. मूळचा वठाण ता. सोयगाव येथील रहिवासी असलेला आणि पाचोरा तालुक्यातील रहिवासी चेतन (वय २३, नाव बदलले आहे) याने नैराश्यातून शेतात घातक विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्या कुटुंबियांना तो रेल्वेरुळाजवळ मिळून आला…

Read More

रावेर, प्रतिनिधी । बीले पास करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय-४५) रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली.…

Read More

वर्धा, वृत्तसंस्था । पीडितेच्या आईमुळेच झाला अवैध गर्भपाताचा पर्दाफाश आर्वी येथील गर्भपात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. या प्रकरणात धाडस करून तक्रार करणाऱ्या त्या मातेला सलाम करावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिने संपूर्ण प्रकरण उघडकीस आणून पोलिसांना साद दिल्याने जलदगतीने तपास होऊन अवैध गर्भपाताचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे; अन्यथा आणखी किती कोवळे जीव बळी पडले असते कोणास ठाऊक. आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळण्याची मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केलेली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अनेक घटना कधी उजेडातच येत नाहीत. मुलीचे कसे होणार, समाज काय म्हणेल, आपली बदनामी होईल, या भीतीने अनेक गुन्हे दडविले जातात आणि…

Read More

यावल, प्रतिनिधी । एक घटस्फोटित तरुण महिला हरवल्याची नोंद पोलीस स्टेशनला गेल्या चार महिन्यापूर्वी झालेली होती आणि आहे.या प्रकरणात खबर देणार तरुण महिलेच्या वडिलाना पोलिसांनी मदत न करता पळवून नेलेल्या मुलास मदत करून त्या मुलीस एका पोलिसाच्या घरी नेऊन मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याची लेखी तक्रार महिलेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे केल्याने यावल तालुक्यात लव जिहाद प्रकरणाकडे जिल्ह्यातील काही महिला संघटनांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल तालुक्यातून केला जात आहे. सोमवार दि.17 जानेवारी 2022 रोजी पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत यावल तालुक्यातील एका घटस्फोटीत तरुण मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, गावातील एका…

Read More

रावेर प्रतिनिधी । मस्कावद येथील तरूणाचा दुचाकीचा रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तालुक्यातील मस्कावद येथील तरूणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रात्री ११ वाजता घडली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तुषार पांडूरंग इंगळे रा. मस्कावद ता. रावेर हा तरूण आई, पत्नी आणि मुलगासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफीचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. तुषार इंगळे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी सावदा येथे मित्र विशाल वानखेडे यांच्यासोबत दुचाकीने आला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास तुषार हा मित्र विशाल यांच्यासोबत दुचाकीने सावदा येथून…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी मतदान होणार असून एक हजार ७०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे तहसीलदार रमेश जसवंत यांचे पथक मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत यासाठी २८ कर्मचारी मतदान प्रक्रिया साठी काम करतील नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मंगळवारी उर्वरित चार जागांसाठी मतदान करण्यात येत आहे यानंतर बुधवारी मतमोजणी करण्यात येणार आहे वर्षभरापासून तीन वेळा प्रशासकांच्या ताब्यात गेलेल्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांना संधी देण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे त्यामुळे मंगळवारी चार जागांसाठीच्या बारा उमेदवारांचे आणि पहिल्या टप्प्यातील १३ जागांसाठी च्या ४० अशा ५२ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे…

Read More

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलिस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनेही त्यांच्यावर टीकेची राळ उठवली. भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने १६ जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा या गावातील सभेत पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पटोले यांच्या या वक्तव्याच्या विरोधात…

Read More