Author: saimat team

जळगाव ः विशेष प्रतिनिधी सध्या जळगाव शहरात महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या सर्कलचे नामांतर करण्याची चढाओढ चालली आहे. राजकीय पदाधिकारी,नेते मंडळी ,स्थानिक नगरसेवक त्यासाठी चक्क रस्त्यावर उतरले आहेत आणि दुसरीकडे महापालिकेने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून मालमत्ताधारकांना कित्येक पटींनी घरपट्टी वाढीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.त्यास सर्वच मालमत्ताधारकांचा प्रचंड विरोध आहे मात्र याप्रश्नी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आवाज उठविलेला नाही.एकटे ललित कोल्हे सोडले तर नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कोणत्याच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकाने तोंड उघडलेले नाही त्यामुळे स्थनिक लोकप्रतिनिधी बद्दल जळगावकर नागरिक तीव्र संताप व्यक्त करू लागले आहेत. सध्या जळगाव शहरातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या चौपदरी महामार्गावरील चौकातील सर्कलचे नामकरण करण्याची…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । पुण्यात मावळमध्ये वीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन चंद्रकांत येवले (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून अविनाश शिवाजी भोईर (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. दोघे ही नातेवाईक असून आढले खुर्द या गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच रोहनचा खून केल्याचा संशय पिंपरी-चिंचवड पोलिसांना व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस वर्षीय रोहन आणि अविनाश हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद होऊन प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं होतं. याच रागातून आरोपी अविनाशने रोहनला घराबाहेर बोलावले. त्यांच्यात शुक्रवारी पुन्हा झटापट…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सिव्हिल सर्जन डॉ. एन एस चव्हाण यांची बदली तर धरणगावचे ग्रामीणचे डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या बदली नाशिक येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज प्राप्त झाले आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांची नाशिक येथील रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने आज काढले आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी एक नव्याने ब्राऊझर मशिनरूपी वाहन दाखल झाले आहे. या ब्राऊझर मशिनचे आज शुक्रवार, दि.21 जानेवारी 2021 रोजी सकाळी गोदावरी पीठगिरणी भागात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीतच महानगरपालिकेतर्फे गोदावरी पीठगिरणी भागातील कॉलनींतर्गत रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना सुरूवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणासह आता कॉलनी, उपनगरांतर्गत असलेले छोटे-छोटे रस्ते की ज्यांच्यावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे तेथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह त्यावर डांबरीकरण करण्याच्या कामांनाही सुरूवात झाली आहे.…

Read More

गडचिरोली : गडचिरोली नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले . या निवडणुकीत शिवसेनेलामोठा फटका बसला आहे. तर काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे  हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagar Panchayat elections) शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण जिल्ह्यात पदांची खिरापत वाटल्यामुळे शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. मागली वेळेच्या तुलनेत यावेळी शिवसेनेला फक्त २ जागा अधिक मिळाल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी गडचिरोलिचे नियमित दौरेही केले होते. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी आवाहन केले होते. पण एकाच जिल्ह्यासाठी ३ जिल्हाप्रमुख, एक संपर्कप्रमुख आणि एक जिल्हा समन्वयक, अशा पाच…

Read More

दिल्ली येथील इंडिया गेटवर (INDIA GATE) नेताजी सुभाषचंद्र बोस (SUBHASHCHNDRA BOSE) यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी केली. नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून मोदींनी ही माहिती दिली. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्यांचा ‘होलोग्राम’ पुतळा तिथे उभारणार अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली. नेताजींच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार आहे, “देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे, त्यावेळी मला कळवायला आनंद होतो आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा उभारू.” https://twitter.com/narendramodi/status/1484421974629978113?s=20 https://twitter.com/narendramodi/status/1484422112714854405?s=20

Read More

काश्मीर विलो बॅटने (Kashmir willow bat)अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात प्रवेश केला आहे. दुबईत झालेल्या शेवटच्या T20 विश्वचषकात 75 वर्षात प्रथमच दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी काश्मीरची विलो बॅट वापरली. या विकासामुळे काश्मीर विलो बॅट उद्योगाचे नशीब बदलले आहे. 100 कोटींची वार्षिक उलाढाल दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. काश्मीर विलो बॅटची मागणी प्रचंड वाढली असून जगभरातून ऑर्डर्स येत आहेत. सुमारे 12 क्रिकेट खेळणार्‍या देशांतील बॅट आयातदारांनी काश्मीर बॅट कारखान्यांसाठी ऑर्डर दिली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये काश्मीर बॅट उद्योगाची स्थापना झाली. तेव्हापासून खोऱ्यात लाखो बॅट बनवण्यात आल्या आहेत, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांचा वापर केलेला नाही. विलो बॅट कारखान्याचे मालक फज्जल कबीर म्हणाले, “गेल्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांवर हद्दपारीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेले रिपाइं ( आठवले) गटाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांंचा ताफा अडवून प्रशासनाचा निषेध केला. यावर ना. अब्दुल सत्तार यांनी या प्रश्‍नी चौकशी करून योग्य न्याय मिळवून देऊ असे आश्‍वासन दिले. जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतांना जिल्हा पोलिस यंत्रणेने त्यांना संरक्षण दिले आहे. हे संरक्षण त्वरित काढून घेण्यात यावे व त्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे या मागणीसाठी रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष…

Read More

जळगाव,  :  ज्या वेळी देशात 50 टक्के महिला उद्योजक होतील तेव्हा भारत हा जगात क्रमांक एकचा देश बनेल. आजच्या महिला या स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळेच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याची गरज असून यासाठी घरातल्या प्रत्येक पुरुषाने पुढाकार घेण्याची गरज आहे. महिलांना उद्योग क्षेत्रांत ताकदीची नव्हे, तर फक्त इतरांच्या विश्वासाची गरज आहे असा सूर रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय व एशियन इस्टीट्यूट ऑफ फॅमिली मॅनेज बिजनेस मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या “द गेम चेंजर-वूमन” या वेबिनारमधील मार्गदर्शकामधून निघाला. या ऑनलाईन वेबिनार मार्गदर्शनात रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, “न्यूसम” मुंबई च्या संचालिका फोरम शहा, हिल…

Read More