Author: saimat team

कोळगाव ता-भडगाव(वार्ताहर)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात कोरोना नियमांचे पालन करीत मान्यवर व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.   कार्यक्रमात ध्वजारोहण स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्रीयुत संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज पाटील,संजय पाटील,प्रवीण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.    आजच्या ह्या कार्यक्रमात   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.ए.वाघ व आबासाहेब कोळगावकरांनी केले.   कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश मेडियम स्कुल,माध्यमिक विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला व विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी   जी. एच. रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक महाविध्यालय व  रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ललित पाटील या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता, समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या…

Read More

मुंबई  :   महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी  यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून  महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे  महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी  प्राप्त होणार असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज निर्भया पथकाचे तर मान्यवरांच्या उपस्थितीत इतर विविध निर्भया उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर,…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । येथे यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी राज्य महिला आयोगाचा इतिहास आणि त्यांनी गेल्या ३ महिन्यात राज्य महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यावर केलेली कामे सर्वांसमोर मांडली. यावेळी महिला आयोगाच्या १५५२०९ या टोल फ्री क्रमांकाचे तसेच कॅलेंडर आणि वार्षिक डायरीचे अनावरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सर्वच प्रमुख पाहुण्यांनी गेल्या ३ महिन्यात विविध माध्यमातून महिला आयोग करत असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलींच्या लग्नाचे वय २१ असावे का १८ यावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी असे मत…

Read More

बोदवड, प्रतिनिधी । शेतकरी दूध उत्पादक सहा.सोसायटी मर्या. बोदवडच्या चेअरमनपदी शांताराम कोळी व व्हाईस चेअरमनपदी धनराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शेतकरी दूध उत्पादक सह. सोसा. मर्या. बोदवड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक संस्थेच्या कार्यालयात बिनविरोध पार पडली त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ई ए हावळे साहेब यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. तसेच आज दि. २५ चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे निवड ही एकनाथ हावळे, लेखापरीक्षक सहकारी संस्था उडते पथक (पदम) जळगाव यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात एकमताने निवळ करण्यात आली. त्यावेळी नवनिर्वाचित संचालक देवानंद भोई, भास्कर गुरचळ, विनोद काळे, रतन सूर्यवंशी, चिंधाबाई माळी, मंजुराबाई माळी, निलेश ठाकरे, युवराज ठोंबरे, विकास भोई,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन दि. २५ रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या शुभहस्ते फित कापुन सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणिस एजाज मलिक, महिला आघाडीच्या महानराध्यक्षा मंगला पाटील, विनोद देशमुख, योगेश देसले, वाल्मिक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, दुर्गेश पाटील, मजहर पठाण, अकील…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील लोककलावंतांसाठी तमाशा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. राज्यात तमाशा फड सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांच्याकडून मिळाली होती. यानंतर आता सरकारने राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोककलावंतांनी मोठा दिलासा मिळणार आहे. अजित पवार यांनी पहिल्या भेटीत लोककलावंतांना राष्ट्रवादी हेल्पलाइन कडून १ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. प्रत्येकी कलावंताला 3 हजार रुपये देण्याचे शरद पवार यांनी कबूल केले त्यानंतर अजित पवार यांनी 1 फेब्रुवारीपासून तमाशा कार्यक्रमाला परवानगी देत असून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील २२ वर्षीय विवाहितेचा तीन लाखासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध पाच एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी येथील तुळजामाता परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेला माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणारी पल्लवी किरण शिंदे (वय-२२) हिचा विवाह १८ एप्रिल २०१९ रोजी किरण हरचंद शिंदे रा. कापुसवाडी ता. जामनेर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचा एक महिन्यानंतर पती किरण शिंदे यांनी ‘स्वयंपाक व शेती काम येत नाही असे’…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार- 2022 प्राप्त कु.शिवांगी प्रसाद काळे (रा. कोल्हेनगर, जळगाव) हिच्या घरी आज मंगळवार, दि.25 जानेवारी 2022 रोजी जाऊन तिचा जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत यथोचित सत्कार करून तिच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच उत्तम संस्कार व धैर्यशील पालकत्व निभावणार्‍या शिवांगीच्या आई सौ.गुलबक्षी व वडील श्री.प्रसाद काळे यांचेही त्यांनी मनापासून अभिनंदन केले. कु.शिवांगी काळेचा जन्म 16 एप्रिल 2015 मधील. तिने अवघे सहा वर्षे वय असताना स्वतःमधील धैर्यता दाखविली. त्यात कु.शिवांगीने स्वतः समयसूचकता दाखवत आपली आई व…

Read More

नांदेड, वृत्तसंस्था । भारतीय पोलीस सेवेतील १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत असलेल्या अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर, यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान हा देशातील पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना दिला जातो. संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्षे देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्यात व सीआरपीएफ मध्ये सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी आठ विभिन्न पदके देऊन सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, दोन वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखंड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण…

Read More