Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा झुंड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. यामुळे या सिनेमाला एक वेगळं महत्व आहे. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ओटीटी की चित्रपट गृहात रिलीज होणार अशी चर्चा होती. अखेर त्याला पूर्णविराम लागला आहे. नागराज मंजुळे यांचा झुंड सिनेमा 4 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.कोवीड -19 मुळे, चित्रपटाला त्याची रिलीज डेट अनेक वेळा मागे घ्यावी लागली. पण, शेवटी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा झुंड हे स्पोर्ट्स ड्रामा, एनजीओ स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । गेल्या जवळपास 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसतो तेव्हाच एक नवा व्हेरिएंट समोर येऊन चिंता वाढवतो. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जास्त धोका पसरवला नसला तरीही त्याच्या बी.ए..2 या सब-व्हेरिएंटबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. डेन्मार्कमध्ये केलेल्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की,बी.ए.2 हे पेक्षा अधिक संक्रमण पसरवणारा आहे. 33 टक्के वेगाने पसरतो बी.ए.2 कोपनहेगन युनिवर्सिटी आणि डॅनिश आरोग्य मंत्रालयाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभ्यास केला. या अभ्यासात असं आढळून आलंय की, ओमायक्रॉनचे नवा सब व्हेरिएंट बी.ए.1 पेक्षा 33 टक्के वेगाने पसरतो. डेन्मार्कमधील बी.ए.2 ची लागण झालेल्या लोकांद्वारे हा नवीन व्हेरिएंट वेगाने…

Read More

पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था । एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीचे अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस शिपायासह सात जणांना अटक केली आहे. संबंधित पोलीस शिपाई हा पुणे पोलीस दलात सायबर विभागात कार्यरत असताना एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी असल्याचे त्याला समजले होते. पैशाच्या लालसेपोटी त्या व्यक्तीचे अपहरण केले तर मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी आणि पैसे मिळू शकतात, असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्या व्यक्तीचे अपहरण केले. मात्र, वाकड…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्‍या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्‍या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्‍या, कुणाशीही न बोलणार्‍या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला.…

Read More

सातपूर, वृत्तसंस्था । येथील औद्योगिक वसाहतीतल्या निलराज कारखान्यात (Nilraj factory) आज (दि. ०२) बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत पहिला मजला जळून खाक झाला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कुठलीही जीवित हानी झाली नाही. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास (Municipal fire brigade) संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे ०३ बंब, एमआयडीसीचा (MIDC) ०१ बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा (Mahindra and Mahindra Company) ०१ बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या कर्मचार्‍यांसह एकूण २५ जणांनी मिळून ही आग विझवली. या घटनेत कंपनीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. आगीत कॅपॅसिटर (capacitor) बसवण्यासाठी…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । गुन्हेगारी करण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन जणांकडून बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळातील वांजोळा रोड भागात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून तिघांना अटक केली. काही संशयित पिस्तूल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सापळा रचून केलेल्या कारवाईत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारी मंडळाची सभा संघटनेच्या कार्याध्यक्ष अँड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार रोजी भगीरथ के सोमानी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा येथे संपन्न झाली. या सभेत शैक्षणिक संस्थांमधील नोकरभरतीचा अधिकार हा खासगी शिक्षण संस्थांचा घटनात्मक अधिकार आहे यावर अतिक्रमण करून शासनाने सुरु केलेले पवित्र पोर्टल प्रणाली ही तातडीने रद्द करण्याचा निर्णय पारित करावा अशी जोरदार मागणी बैठकीत संस्थाचालकांनी केली यासोबतच वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार तातडीने द्यावे covid-19 मुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत व म्हणून शैक्षणिक वर्ष 2020 21 नुसार संच मान्यता देत ज्याप्रमाणे सवलत देण्यात आली होती…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य शासनाने १ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार्‍यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारीत नवीन नियमावली जाहीर केली आहे. 1) परिशिष्ट अ मध्ये ज्या जिल्ह्यात 18 वर्ष वयापेक्षा मोठ्या असलेल्या 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे 70 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागास मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे प्रत्येक आठवड्यात अद्ययावत…

Read More

यावल, प्रतिनिधी । दि. ३१ रोजी डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा,याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान चौथ्या सत्रात पोचले असता, हे अभियान दिनांक ३०व ३१ ०१-२०२२ असे दोन दिवस पंचवटी मंदिरा जवळ डोंगर कठोरा तालुका यावल येथे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास चौथ्या टप्यात पोचले . सदर अभियानास डोंगर कठोरा गावातील एकूण ९५६ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. या प्रसंगी लुकमान तडवी, विलास चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, हर्षल पाटील प्रकाश झोपे, नवाज तडवी सरपंच, धनराज पाटील उपसरपंच, कमलाकर राणे माजी सरपंच मनोहर महाजन माजी सरपंच, दिलीप तायडे उदय…

Read More