मुंबई, वृत्तसंस्था । पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून…
Author: saimat team
अमरावती, वृत्तसंस्था । गावाच्या विकासप्रक्रियेत नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची प्राधान्याने निर्मिती करण्यात येईल. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी शासन स्तरावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिली. गावात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या माध्यमातून नागरिकांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश बच्चू कडू यांनी यावेळी दिले. आज (दि.3) विविध योजनेअंतर्गत प्राप्त 43 कोटी 63 लक्ष रुपयांच्या निधीतून चांदुर बाजार तालुक्यात विविध विकास कामाचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शारदा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ललित बोबडे, उपविभागीय अभियंता मिलिंद…
चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथील रोडवर रात्रीच्या सुमारास अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील वाघळी ते हिंगोणे रोडवर पोलिसांनी साधारण सव्वानऊ लाखांचा अवैध गुटखा पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोना शांताराम सीताराम पवार तसेच पोलीस स्टाफ शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना अवैध गुटखा व पानमसाला पकडला असून ९ लाख २३ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अजय नारायण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक असे की, दि. ३ जानेवारी २०२२ रात्री २ वाजेच्या सुमारास वाघळी ते हिंगोणे रोडवर…
जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्करोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहे. आतापर्यत ३ स्तनांच्या, २ तोंडाचा कर्करोगाच्या तर १ कर्करोगसदृश्य शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णांना यशस्वीपणे रुग्णालयातून निरोप दिला आहे. शरीरामध्ये कुठे गाठी असतील किंवा कर्करोग असल्याचा संशय असेल तर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे. शुक्रवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस आहे. त्या निमित्ताने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. येथील शल्यचिकित्सा व दंतशल्यचिकित्सा विभागातर्फे कर्करोगाच्या विविध शस्त्रक्रिया दररोज पार पडत आहेत. कोरोना महामारीमुळे वर्षभरानंतर कर्करोग शस्त्रक्रिया सुरु झाल्या…
जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद गावातील प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने आज नशिराबाद नगर परीषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. नशिराबाद गावातील प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने आज गावातील अपंग बांधवांसाठी गेल्या दोन वर्षापासून कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आज नशिराबाद नगरपरिषद मुख्य अधिकारी साहेब यांना 5% अपंग निधी लवकरात लवकर उपलब्ध करण्यात यावा, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मोहन माळी, शहर उपाध्यक्ष ईशार शेख, महिला शहराध्यक्ष वर्षा माळी, मयुरी टाकरे, आबीत भाई, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी कोळी महासंघ चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रल्हाद भगवान सोनवणे जळगाव यांची भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा च्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. दि. २ रोजी वसंत स्मृती भारतीय जनता पार्टी कार्यालय जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री मा. रवि दादा अनासपुरे साहेब यांच्या उपस्थितीत तर आमदार तथा भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे ( राजु मामा भोळे) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी नियुक्ती केली. प्रल्हाद सोनवणें ना असलेली बहुमूल्य साथ व कुशल…
कजगाव ता भडगाव, प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या घुसर्डी ता भडगाव येथील भूमिपुत्र व पोलीस दलात कार्यरत असलेले प्रविण उत्तमराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक ह्या पदावर पदोन्नती झाली आहे. घुसर्डी सारख्या अगदी छोट्याश्या खेड्यातून त्यांनी कठोर मेहनत घेऊन पोलीस निरीक्षक पदावर मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांनी यापुर्वी चाळीसगाव शेगाव औरंगाबाद भुसावळ नाशिक येथे सेवा बजावली आहे व आता पदोन्नतीवर त्यांची नियुक्ती अकोला येथे झाली आहे पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ते माजी मुख्याध्यापक उत्तमराव शिंद यांचे सुपुत्र तर विलास व अनमोल शिंदे यांचे बंधू आहेत
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका दुकानाचे मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळील एका दुकानाचे गोडावून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश गंगाराम चौधरी (वय ३४, रा. दत्त मंदीरजवळ खडके चाळ, शिवाजी नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी शहरातील अजिंठा चौफुलीजवळील सपना हॉटेलच्या पाठीमागे एक गोडावून भाड्याने…
मुंबई, वृत्तसंस्था । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केली. एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ही अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 2010 मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता. त्यानंतर आता संजय…