जळगाव ः प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर भागातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संजय नामदेव झोपे यांचे कोरोना पॉझिटिव्हमुळे निधन झाले. ते अनेक वर्षापासून रेशन दुकान चालवत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना, अंत्योदय योजना,अन्नसुरक्षा योजना व व केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले होते मात्र त्यांना कोरोना झाल्याने ते आजारी पडले आणि त्यातय त्याचे निधन झाले.त्यांच्या कुटुंबियांस शासनाने विशेष बाब म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे काल निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी मयत संजय झोपे यांचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवली जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले त्यानंतर जिल्हा…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि प्रभाकर कला संगीत अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथे आजी-आजोबांसाठी ‘भक्तिरंग जेष्ठांसंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्तिक महिन्यातील जळगावच्या रथोत्सव अर्थात लोकोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ व्यक्तींसाठी अभंग-भजन यावर आधारीत नृत्यसंगीत यांची ही मैफील होती.कार्यक्रमात अयगिरी नंदिनी महिषासुर मर्दिनी स्त्रोत, कृष्ण भजन, मधुराष्टक्रम, सुंदर ते ध्यान, मिरा भजन,ध्यान लागले रामाचे, चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी, अबीर गुलाल उधळीत रंग, अवघे गर्जे पंढरपूर, आदि अभंग व भजनांवर मधूरा इंगळे, वाग्मयी देव, श्रावणी उपासनी,दिपीका घैसास, मृण्मयी कुळकर्णी, हिमानी पिले, ऋतुजा महाजन,राधिका सरोदे यांनी कथ्थक नृत्य सादरीकरण केले. सूत्रसंचालन अपूर्वा दामले हिने तर…
अमळनेर ः प्रतिनिधी राजवड आदर्श गाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांची होप आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्या उपक्रमशील शिक्षिका असून त्यांच्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. मुलींच्या शिक्षणावर त्यांचा भर असतो. शेतीवाडी वरील विद्यार्थ्यांना दाखल करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतात. व मूल्य शिक्षणाचे धडे देत असतात. प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा सुजाण नागरिक घडावा, यासाठी प्रयत्नशील असतात. पाकिजा पटेल यांना सन २०११ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार तसेच आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ७१ पुरस्कार यामध्ये मदर तेरेसा अवार्ड, सावित्रीबाई फुले पुरस्कार, महात्मा गांधी पीस अवार्ड, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, ग्रेट…
जळगाव : छगनसिंग पाटील बीएचआर अवसायक व इतरांनी संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक केली.संघटितपणे कट रचून संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक केल्याने संबंधितांवर संघटित गुन्हेगारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या सार्या घटनाक्रमात गुन्ह्यातील आरोपींच्या घरावर छापा टाकला असता सुनिल झंवर यांचेकडे शंभराच्या वर अधिक उच्च पदस्थ अधिकारी यांचे सिक्के सापडले.नेमके हे सिक्के संबंधित अधिकारी यांच्या परवानगीशिवाय सिक्के बनविणार्या व्यावसायिकाने बनविलेच कसे? ते बनविण्यासाठी त्याच्यावर कुणाचा दबाव होता? की अधिकच्या लाभापोटी त्याने हे बेकायदेशीर काम करण्याचे धाडस केले? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी चौकशी होण्याची दाट शक्याता आहे. गेल्या काळात आर्थिक व्यवहार असणार्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे शहारातील सिक्के बनविणार्या…
जळगाव ः गणेश पाटील नुकताच दोन दिवसांपूर्वी झालेला शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांचा धावता दौरा संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.या दौर्यासंदर्भात कार्यकर्ते, पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांच्यातही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील या दौर्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे जाणून घेण्यासाठी अनेकांना फोन आल्याचे समजते. इतका काय महत्त्वाचा विषय होता की, संपर्क प्रमुखांना विमानाने तात्काळ त्यासाठी धाव घ्यावी लागली.पक्ष बांधणीची जबाबदारी पार पाडण्यासाठी खरं तर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.जे कार्यकर्ते सेनेत आहेत ते टिकवून नवीन वाढीसाठी त्यांचेकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. इथ सत्ता मिळूनही कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कामे होत नसल्याने त्यांचेकडे नेहमीच गार्हाणे मांडत असतात. त्यांच्या व्यथा,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा हुडकोमध्ये एका विवाहित महिलेने तर तालुक्यातील मोहाडी शिवारात एका परप्रांतीय बांधकाम मजुराने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना आज सकाळी उघडकीस आल्या. यामुळे पिंप्राळा हुडको परिसरात व मोहाडी शिवार परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्त्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. पहिला घटना शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. आनंद श्रावण चौधरी (वय ३२, रा. पिंप्राळा, हुडको) हे पत्नी सुवर्णा आनंदा चौधरी (वय ३५), आई इंदूबाई चौधरी आणि दोन मुलांसह राहतात. आंनद चौधरी हे व्यवसायाच्या निमित्ताने धुळे येथे कामासाठी गेले होते. घरी पत्नी सुवर्णा आणि आई इंदूबाई होते. मध्यरात्री सुवर्णा चौधरी यांनी सर्वजण झोपले असतांना दोरीने…
जळगाव ः प्रतिनिधी यावल नगरपरिषदेच्या १४व्या वित्त आयोगाअंतर्गत अतिरिक्त साठवण तलाव निर्मितीसाठी यावल नगरपरिषदेने मागविलेल्या ई-प्रकारच्या निविदेमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असून त्यात शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने सदर निविदा प्रक्रिया त्वरीत रद्द करुन नव्याने निविदा मागविण्यात यावी अशी मागणी जळगावचे शिवाजी चुडामण बाविस्कर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे केली होती.यासंदर्भात जिल्हा प्रशासन अधिकार्यांनी यावल नपा मुख्याधिकार्यांना यापुर्वी पत्र पाठवून,निविदा संदर्भात शिवाजी बाविस्कर यांंनी नमूद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने शासन नियमानुसार कार्य्वाही करण्याचे आदेश दिले होते मात्र पंधरा दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांनी पुन्हा या संदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल सात दिवसाचे आत सादर करावा…
एरंडोल ः प्रतिनिधी तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह काल पळासदळ शिवारात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोदविण्याची प्रक्रिया एरंडोल पोलिस स्टेशनला सुरू आहे. राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात काल सकाळी आढळून आला होता.परवा सायंकाळी ते एका कार्यक्रमात गेले होते परंतु ते तेथून रात्री उशिरा घरी परत आले होते मात्र मध्यरात्री कुणाचातरी फोन आल्याने ते पुन्हा घराबाहेर पडले होते. ते सकाळपर्यंत घरी परत आले नव्हते. परंतु सकाळी दहा वाजता…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील दुरदर्शन टॉवरजवळ आयशर आणि गॅस कंन्टेनरची समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.त्यात आयशर चालक जखमी झाला असून गॅस कंटेनरचा चुराडा झाला आहे.सुदैवाने प्राणहानी टळली. घटनेची अधिक माहिती अशी की, यमुना ईश्वर माळी रा. धुळे यांच्या मालकीचा ट्रक (एमएच-१८बीएच५३५५) नागपूरहून मालेगावकडे कापडाचे सुत घेवून निघाला होता. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावरील दुरदर्शन टॉवरजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्या गॅस कंन्टेनरने आयशरला जोरदार धडक दिली. त्यात गॅस कंटेनरच्या पुढचा भागाचा पूर्णपणे चुराडा होवून गॅसने भरलेले कंटेनर रोडाच्या बाजूला असलेल्या गड्ड्यात पडला. गँस कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे.तर आयशर…
जळगाव ः प्रतिनिधी बीएचआर घोटाळा प्रकरणात एका नेत्याने बारामतीला जावून पवार साहेबांंची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र पवार साहेबांनी त्याला भेट दिली नाही.आमचे नेते अशा प्रकरणात चुकीच्या माणसांची कधीच पाठराखण करणार नाहीत,याची शाश्वती आम्हाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पाठीराखा असल्याशिवाय सुनिल झंवर इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही,याची जाणीव सर्वसामान्यांना नक्कीच झाली आहे अशा शब्दात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी,गिरीश महाजन यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत चौफेर टोलेबाजी करून संभ्रम दूर केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी काल राष्ट्रवादीची बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी बीएचआर प्रकरणावर भाष्य केले. ते…