जळगाव : प्रतिनिधी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज मनपाच्या सरदार वल्लभभाई पटेल प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात झाली. गेल्या सात महिन्यानंतर या सभेला स्थायी समिती सदस्यांना प्रत्यक्ष हजर रहाता आले. यापुर्वी त्यांना ऑनलाईन सभेत सहभागी व्हावे लागत होते. त्यामुळे आजच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत १४ प्रशासकीय प्रस्तावांवर चर्चा होवून निर्णय घेण्यात आले. त्या प्रामुख्याने काही प्रभागातील रस्ता दुरुस्ती, शहरातील काही मनपा मालकीच्या खुल्या जागेस चेनलीक फेन्सींग करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे, वाघुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहीनी पाईपलाईन व वार्षीक व्यवस्था व दुरुस्ती करणे, नागरी दलितेत्तर वस्त्यात सुधारणा…
Author: saimat team
चोपडा ः प्रतिनिधी पुनर्विवाह व्हावे, अशी सर्वांची इच्छा असते परंतु पुढाकार कोणी घेत नाही. आजची सामाजिक परिस्थिती बिकट झाली असली किंवा मुलीचे प्रमाण कमी असले तरी चांगल्या वधुसाठी चांगला वर मिळणे कठीण झाले आहे. तर चांगल्या वरासाठी उत्तम वधू मिळणे फारच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जो तडजोड करेल त्याचेच विवाह जुळतील, असे अलिखित नियम होऊन गेला आहे. असाच एक आदर्श विवाह चोपडा शहरात पाहायला मिळाला. तालुक्यातील विरवाडा येथील व चोपडा शहरातील लव्हली ट्रेलरचे संचालक स्व.सचिन हरकचंद सुराणा यांचे जवळपास ३ वर्षा पूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांची धर्मपत्नी घोडगाव येथील माहेर असलेली रिना ही कमी वयातच विधवा झाली…
जळगाव ः प्रतिनिधी नववर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात दारु आदी व्यसनांचे सेवन केले जाते. कुठलेही व्यसन घातकच असते यासाठी जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र व मुक्ती फाऊंडेशनतर्फे नववर्षाच्या पुर्वसंध्येला ‘दारु नको दुध प्या’ उपक्रम राबवत जनजागृती करण्यात येणार आहे. वाढती व्यसनाधीनता व कोरोना विषाणुच्या विळख्यामुळे सारा समाज हैराण झाला असतांनाच नववर्ष स्वागताला (३१ डिसेंबर) मोठ्या प्रमाणात दारु, तंबाखु, गुटखा, बिडी, सिगारेट, गांजा, भांग आदी व्यसनाचे सेवन केले जाते. कुव्यसन कुठलेही असो ते घातकच ठरते व शेवटही अतिशय वाईट होते. व्यसनाचे प्रमाण नेस्तानाबूत व्हावे या करीता जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या आवारात दि. ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील पोलन पेठ दाणा बाजारामधील दत्त मंदिरात गुरुदत्त सेवा मंडळातर्फे दत्त जयंती निमित्त गुरुदत्ताची महापुजा करून महाप्रसादाचे वाटप करत दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. याप्रसंगी नामदेव चौधरी, जितेंद्र पानसर, अशोक पाटील, मधुकर बारी, राधेश्याम उपाध्ये, प्रकाश चौधरी, अनिल पाटील, सिताराम देवरे, प्रभाकर महाले, मयुर चौधरी, भगवान मराठे, शिवा दळवी, आदिनाथ काकडे, हिरासिंग परदेशी, भागवत निकम, मोहन शिंदे, भगवान मराठे, नाना टेलर, दशरथ चौधरी, बबन हरसुळ, लोकेश चौधरी, ज्ञानदेव पाटील, सुभाष भोळे, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडून यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजित जिल्हास्तरीय युवा संसदचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव, बुलढाणा विभागासाठी ऑनलाईन पद्धतीने युवा संसद पार पडली. जळगाव जिल्ह्यातून हर्षल पाटील, गिरीष पाटील तर बुलढाणा विभागातून अभिजीत खोडके आणि सलोनी त्रिवेदी यांनी बाजी मारली. तरुण, तरुणी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव, बुलढाणा जिल्ह्याची युवा संसद दि.२८ रोजी ऑनलाईन पध्दतीने पार पडली. जिल्हास्तर…
जळगाव : प्रतिनिधी केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गणेश कॉलनी येथील आशादीप महिला वसतिगृहास शिशुंसाठी दोन पाळणे भेट देण्यात आले. परितक्त्या महिला, कुमारी माता, पीडित-शोषित महिलांसाठी गणेश कॉलनी येथे आशादीप महिला वसतिगृह चालवले जाते. अनेक महिलांसोबत असणार्या आपल्या बाळांसाठी या शिशुगृहात पाळण्याची सोय नव्हती. या मुलांना झोळी करून झोपवण्याची व्यवस्था केली जात होती. ही अडचण लक्षात घेऊन केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे आशादीप महिला वसतिगृहास दोन पाळणे भेट देऊन वसतिगृहाच्या अधिक्षिका जयश्री पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. आपल्या बाळांसाठी मिळालेल्या पाळण्यांमुळे तेथील महिलांना आनंद झाला व त्यांनी चाईल्ड लाईनचे कौतुक केले. या वेळी चाईल्ड लाईनचे समन्वयक भानुदास येवलेकर, समुपदेशिका वृषाली जोशी, टिम सदस्य रोहन सोनगडा, राहुल…
जळगाव ः प्रतिनिधी उमाळा रोड, नशिराबाद येथील श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशन कंपनीच्या दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन दर्जी फाऊंडेशन चे संचालक गोपाल दर्जी व उपशिक्षण अधिकारी (प्राथमिक ) विजय पवार यांचे हस्ते करण्यात आले. श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशन दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध करुन आपल्या सन्माननीय शेतकरी ग्राहकांना वितरीत करीत असते. या दिनदर्शिकेत विविध तिथी व नाविन्यपूर्ण माहितीचा समावेश असतो. यावेळी श्री साईराम प्लास्टिक अॅन्ड इरिगेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, संचालक प्रमोद पाटील, महाव्यवस्थापक धनराज चौधरी, प्रविण महाजन, प्रविण पाटील, जयवंत भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन जयवंत भालेराव यांनी तर प्रास्ताविक धनराज चौधरी यांनी केले.
जळगाव : प्रतिनिधी बदलत्या युगात लहान मुला-मुलींच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार नाट्य, नृत्य, वत्कृत्व, चित्र व इतर कलांचे योग्य मार्गदर्शन व्हावे, कृतीशील शिक्षणातून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशातून अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेच्या संलग्न बालरंगभूमी परिषदेची स्थापना करण्यात आली. बालरंगभूमी परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रकाश पारखी व सहकार्यवाह सतीश लोटके यांच्या मान्यतेने बालरंगभूमी परिषद जळगावची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार मार्गदर्शक अॅड.रोहिणीताई खडसे खेवलकर, अध्यक्ष – योगेश शुक्ल, उपाध्यक्ष (उपक्रम) – हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष (संस्थात्मक कामकाज) – संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह – विनोद ढगे, सहकार्यवाह – वैभव मावळे, सचिव – अमोल ठाकूर, सहसचिव – आकाश बाविस्कर, कोषाध्यक्ष – सचिन…
जळगाव ः प्रतिनिधी वास्तूविशारद दिवाकर देव यांच्या प्रथमस्मृती दिनानिमित्त महाबळ परिसरातील हतनूर हॉल येथे त्यांच्या अप्रकाशित ‘अबोध अवकाश’ या ९९ कविता संग्रहांचे प्रकाशन व निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. काव्यसंग्रहाचे प्रकाशन लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जनता बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रा.शरच्चंद्र छापेकर व मकरंद देशमुख उपस्थित होते. व्यवसायाने वास्तुविशारद असताना विटा, सिमेंट यासोबत अफाट निरीक्षण, संवेदनशीलता दिवाकर देव यांनी आपल्या भावविश्वातील अबोध विचार काव्यबद्ध व चित्रातून मांडली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते; पण ‘अबोध’ होते, असे विचार विविध वक्त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन देव यांच्या…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात मुद्रांकशुल्क सवलत ३१ डिसेंबरपर्यंत मिळत असल्याने नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी एकच गर्दी केली आहे. प्रत्यक्षात ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत असली तरी त्या तारखेच्या आत मुद्रांक शुल्क अदा केले तर असे दस्तऐवज नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यापर्यंत केव्हाही दस्तनोंदणीस दाखल करता येतात. ही बाब जनतेने लक्षात घ्यावी व कार्यालयात गर्दी करु नये असे आवाहन सुनिल मधुकर पाटील सहजिल्हा निबंधक वर्ग २ जळगाव यांनी पत्रकाव्दारे केले आहे.