जामनेर ः प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील विद्यमान शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे यांची जामनेर विधानसभा शिवसेना प्रवक्तापदी साईमतचे पत्रकार गणेश पांढरे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खा.तथा प्रवक्ता संजय राऊत, जिल्हा संपर्क नेते विलास पारकर यांच्या आदेशाने जामनेर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यात पहूर येथील गेल्या ३५ वर्षापासून शिवसेनेची कमान सांभाळणारे निष्ठावंत शिवसैनिक तथा शिवसेना विभाग प्रमुख गणेश पांढरे यांची शिवसेना तालुका प्रवक्तापदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील, सुकलाल बारी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, ऍड. भरत पवार आदी पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे १ ते ३ जानेवारी असे तीन दिवस येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांना महोत्सवास उपस्थित राहता येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकोणिसाव्या बालगंधर्व महोत्सवाची सुरुवात १ जानेवारी २०२१ रोजी होणार असून प्रथम सत्रात ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम असलेल्या तरुण उदयोन्मुख आणि आश्वासक अशी कलावंत शरयू दारेच्या गायनाने होणार आहे, द्वितीय सत्र वेणूवादनाने अर्थात बासरी वादनाने होईल. द्वितीय सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत अश्विन श्रीनिवासन आपली कला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेचे सामाजिक कार्य विस्तारित असून त्या अनुषंगाने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आर्थिक व्यवहार करण्यासोबतच सामाजिक कार्यात सहभाग घेणे, व्यवसायिक प्रशिक्षण आदी उपक्रमांचा सहभाग असतो. जळगाव शहरातील जलग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान हे सुमारे ५०० वर्षांची परंपारा लाभलेले खान्देशातील प्रमुख संस्थानांपैकी एक आहे.या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे. मंदिरात भगवान श्रीरामांची सुंदर अशी उत्सवमूर्ती स्थापित आहे.संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याच अनुषंगाने जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने श्रीराम मंदिर संस्थानच्या कामकाजास आधुनिकतेचा हातभार लावण्याच्या अनुषंगाने काल रोजी आयोजित कार्यक्रमात लॅपटॉप व प्रिंटर भेट म्हणून देण्यात…
मुंबई / जळगाव : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. त्यांच्यावर तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातही त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहे. शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात सकाळी केक कापून या कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, माजी खा. ईश्वरलाल जैन, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आ. संतोष चौधरी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फारभाई मलिक, जिल्हा महिला अध्यक्षा कल्पनाताई पाटील,…
जळगाव ः प्रतिनिधी परिवर्तन जळगावतर्फे पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्त ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भवरलाल भाऊ हे उद्योगपती म्हणून जगात प्रसिद्ध होते पण यासोबतच साहित्य, कला, नाट्य, संगीत, चित्रकला अशा कलांविषयी भाऊंना आस्था होती,प्रेम होते.कला व कलावंतांविषयी जिव्हाळा होता. परिवर्तनतर्फे भाऊंना जयंतीच्या अनुषंगाने विविध कलांतून शब्द, सूर, रंग याद्वारे अनोखी भावांजली अर्पण करण्यात येणार आहे. दि. १२ ते १६ डिसेंबर या दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अनिस शहा, अनिल कांकरिया, आनंद मलारा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया व नारायण बाविस्कर हे भावांजली महोत्सवाचे प्रमुख असून नुकत्याच झालेल्या प्रमुखांच्या बैठकीत पाच दिवसीय महोत्सवाचे…
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनने नागझिरा जंगलातील आदिवासी बांधवांना हिवाळ्याच्या थंडीत ब्लँकेट्स, स्वेटर्स, साड्या, कानटोप्या आदि प्रकारचे ९०० कपडे देऊन जणू मायेची ऊब दिली आहे. रोटरी मिडटाऊनने नागझिरा जंगलातील पाच आदिवासींचे गावे या कपडे दान प्रकल्पासाठी दत्तक घेतली होती. या प्रकल्पात रोटरी सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे, रोटरी मिडटाऊनचे आनंद खांबेटे, डॉ.रवि महाजन, रमेशचंद्र जाजू,अनिल डी.अग्रवाल, किशोर सुर्यवंशी, डॉ. सुरेंद्र सुरवाडे , संजय बारी, डॉ. सुमन लोढा, सुरेखा शिरोळे, सुनंदा देशमुख आदिंसह इतरही अनेक सदस्यांनी योगदान दिले. यशस्वीतेसाठी मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ.रेखा महाजन, मानद सचिव सौ.शशी अग्रवाल यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची फैजपूर शहरासह परिसरात गल्लोगल्ली सर्रास विक्री होत असून यास स्थानिक अधिकार्यांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांनी टाकलेल्या धाडीत मिल्लत नगर परिसरातील शाळेच्या मागे तब्बल सात लाख ६८ हजार ७६८ रुपयांचा विमल गुटखा व व्ही-१ सुगंधित तंबाखू पाकिटे मिळून आले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून संशयित शेख मोहसीन शेख युनूस उर्फ कल्लू हा फरार असल्याचे तपास अधिकारी पीएसआय रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले. फैजपूर शहरात गुटख्यावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. याआधी अनेक वेळा शहरात गुटखा पकडला गेला.…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक १७ अंतर्गत कालिंका माता मंदीर परिसरातील रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. काल सकाळी महापौर भारतीताई सोनवणे आणि उपमहापौर सुनिल खडके यांच्या हस्ते या कामास प्रारंभ झाला.स्थानिक नगरसेविका मिनाक्षी गोकुळ पाटील,रंजना विजय सोनार, नगरसेवक डॉ.विश्वनाथ खडके यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती कैलास सोनवणे, महिला बालकल्याण समिती सभापती रंजना भरत सपकाळे, विधी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, प्रभाग समिती सभापती मनोज आहुजा, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत,कुंदन काळे आदींची यावेळी उपस्थिती होती. रस्ते डागडुजीच्या या कामांसाठी ४२ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असून काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय ते एस.टी. वर्कशॉप या १८ मीटर मार्गासह परिसरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती…
जळगाव ः प्रतिनिधी दिल्ली आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काल जळगांव मधील नॅशनल हायवे क्र ६ वरील इच्छादेवी परिसरातील रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपासमोर काल निदर्शने करण्यात आली केंद्र शासनाने शेतकरी विरोधी हे कायदे या बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठीच आणले असून रिलायन्स व अदानी सारख्या कंपन्या या मोदी धोरणांचे खरे सूत्रधार आहेत एकीकडे रिलायन्सच्या मालकीच्या न्यूज चॅनल्स वरून शेतकरी आंदोलनाची बदनामी करायची देशाला भ्रमित करायचे आणि दुसरीकडे स्वतः च्या फायद्याचे कायदे लोकांच्या माथी मारायचेत हे आता इथला शेतकरी सहन करणार नाही त्यामुळे केंद्राने दर्शवलेला प्रस्ताव नाकारत शेतीविरोधी ३ कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आता कुठलीही माघार नाही व त्यासाठी तीव्र आंदोलनासोबतच रिलायन्स सारख्या कंपन्यांवर…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर भागातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संजय नामदेव झोपे यांचे कोरोना पॉझिटिव्हमुळे निधन झाले. ते अनेक वर्षापासून रेशन दुकान चालवत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना, अंत्योदय योजना,अन्नसुरक्षा योजना व व केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले होते मात्र त्यांना कोरोना झाल्याने ते आजारी पडले आणि त्यातय त्याचे निधन झाले.त्यांच्या कुटुंबियांस शासनाने विशेष बाब म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे काल निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी मयत संजय झोपे यांचा अहवाल शासनाकडे तातडीने पाठवली जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले त्यानंतर जिल्हा…