Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी विविध सामाजिक उपक्रम राबवणार्‍या समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रविवार रोजी उनपदेव, मंगरुळ परिसरातील आदिवासी ऊसतोड कामगार वस्त्यांवर साड्या, पातळं, स्वेटर, दप्तर, बिस्किटचे पुडे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. सहकार्य – उपक्रमासाठी भगीरथ शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनिता मधुकर पाटील, चंद्रशेखर पिंपरकर, सुदाम निकम, आशिष पाटील, रेखा म्हात्रे, शालिनी सैंदाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, पत्रकार शरद भालेराव, संस्थेचे अध्यक्ष आर.डी. कोळी, कवी गोविंद पाटील, दिपेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read More

शेंदुर्णी, ता.जामनेर ः वार्ताहर अनेक प्रकारचे दान आहेत. परंतु, त्यामध्येही श्रेष्ट आहे रक्तदान. यामुळे दातृत्वात रक्तदान श्रेष्ट असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन संजय गरूड यांनी विधानसभेचे माजी उपसभापती तथा धी शेंदुर्णी एज्यु. सोसायटीचे संस्थापक कै.आचार्य गजाननराव गरूड यांच्या ३६ व्या व कै.श्रीमती प्रभावती गजाननराव गरुड यांच्या दुसर्‍या पुण्यतीथीनिमित्त पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिरात अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केेल याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सीतशराव काशीद, महिला संचालिका सौ उज्वलाताई काशिद, जिल्हा रुग्णालयाचे अधिष्टाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जि.प.सदस्या सरोजिनी संजय गरूड, ज्येष्ट संचालक सागरमल जैन, मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन शेरू काझी, यु. यु पाटील, पं.स.सदस्य डॉ.किरण सुर्यवंशी, माजी उपसभापती सुधाकर बारी, माजी पं.स.सदस्य…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी भारत भूमितील सर्व जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाचा तन-मन-धनाने सहभाग असावा व या मंदिरासाठी माझेही योगदान आहे, अशी प्रत्येकाच्या मनात आंतरिक भावना उत्पन्न व्हावी, या प्रमुख उद्देशाने श्रीराम तीर्थक्षेत्र अयोध्या यांनी देशात विभागवार समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देवगिरी प्रांत भुसावल जिल्ह्याचे मुख्य कार्यालय भुसावळ येथे स्थापन करण्यात येऊन त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी झालेल्या बैठकीत समिती गठीत करून सर्वानुमते परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची देवगिरी प्रांत भुसावल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यालय व स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहे. दि.१५ जानेवारी २०२१…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी परिवर्तन उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती करून सांस्कृतिक क्षेत्रात जळगावचा नावलौकिक वाढवत आहे. भाऊंच्या उद्यानातील अ‍ॅम्पी थिएटरचा उद्देश परिवर्तनने पूर्ण केला असल्याचे मत भावांजली महोत्सवाच्या समारोपात जैन उद्योग समूहाचे संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचा समारोप रविवारी संत कबिरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्‍या ‘हंस अकेला’ने झाला.त्यात दर्शना पवार लिखित ‘बहिणाबाई’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.दीपक बारी यांनी भंवरलाल भाऊंवर लिहिलेली इंग्रजी कवितेची फ्रेम अतुल जैन यांना भेट देण्यात आली. प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारती सोनवणे, डॉ. अमोल सेठ, यजुर्वेद महाजन, रंगकर्मी जगदीश नेवे उपस्थित होते. ‘माटी कहे कुम्हार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शासकीय जमिनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका अध्यादेशाद्वारे तुर्त स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात त्वरीत करण्यात यावी, असे महाराष्ट्र शासनाचे सहसचिव रमेश चव्हाण यांनी अध्यादेशात म्हटले आहे. शासनाने भाडेपट्ट्याने अथवा कब्जे हक्काने प्रदान केलेल्या भोगवटदार वर्ग-२ शासकीय जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याच्या कारवाईस राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र जमिन महसुल नियम २०१९ संदर्भाधिन अधिसुचनेद्वारे हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सदर स्थगिती आदेशाचा अंमल तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती येथील एन.रामाराव गृहनिर्माण संस्थेचे सचिव डी.एम. अडकमोल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करा आणि कामगारविरोधी कायदे मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे गेल्या अठरा दिवसापासून सुरु असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भारतभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विविध सामाजिक तसेच शेतकरी संघटनातर्फे धरणे आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय आंदोलनास प्रतिसाद देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह केला जात आहे.या आंदोलनात शेतकरी, कामगार तसेच बुद्धीजीवी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला आहे. या आंदोलनात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, लोक संघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, नियाजअली…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त असल्याचे मत आ.अनिल पाटील यांनी अक्कलकोट संस्थानला दिलेल्या भेटप्रसंगी व्यक्त केले. यावेळी बोलतांना आ.पाटील म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांचे मार्गदर्शन बहुमोल असल्यानेच न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चौफेर प्रगती साधत आहे. ज्या-ज्या वेळी तीर्थक्षेत्र अक्कलकोटला येतो त्या-त्या वेळी अन्नछत्र मंडळास आवर्जून भेट देतोच, असे म्हणताना ‘श्रीं’च्या आशिर्वादाने आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याचे मनोगत आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते श्री क्षेत्र अक्कलकोट तेथे सहकुटुंब श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे सचिव शामराव मोरे…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची नागरी पतपेढी जळगाव तसेच लोकसहकार गटातर्फे ज्येष्ठ सभासद सन्मान योजनेअंतर्गत संस्थेत चोपडा तालुक्यातील २५ वर्ष असणारे सभासद यांना ५००० रु.तथा ३० वर्ष असणारे सभासद यांना ७५०० रु.चा अशा ३४ सभासदांना धनादेश देत सत्कार पंचायत समितीमधील मिटींग हॉलमध्ये करण्यात आला. दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या संख्येने जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे जळगावला होतो परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमाची सुरुवात चोपडा तालुक्यापासून करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन तथा लोकसहकार गटाचे नेते मनोज पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक तथा लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर,संचालक सुनिल निंबा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे विलास…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा व महाराष्ट्र राज्य मानियार बिरादरीचे अध्यक्ष तथा विविध क्रीडा संघटनावर कार्यरत फारुक शेख अब्दुल्ला यांना सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन आदिलशहा फारुकी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्हा पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्ल्ड मेमन बिरादरीचे अब्दुल मजिद झकेरिया हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे विजय पवार, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, चोपड्याच्या उपसभापती अमिनाबी तडवी, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, सरकारी अभियोक्ता ऍड.कलंत्री व डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.प्रमाणपत्र, शाल व मेडल देऊन फारुख शेख यांना गौरविण्यात आले. कोरोना काळातील दहावा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी दोन महिन्यांपुर्वी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथराव खडसेंनी महापालिका लक्ष केले आहे. त्यादृष्टीने काही दिवसांपुर्वी खडसे समर्थकांनी मागणी केलेले ‘वॉटरग्रेस’चे संपुर्ण दस्तऐवज त्यांच्या ताब्यात आले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात साफसफाई ठेक्यातील चुकांवर बोट ठेवत प्रशासनासह सत्ताधार्‍यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. मक्तेदाराकडून प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचे उघड झाल्यामुळे प्रशासनाकडून याप्रकरणात सतर्कता दर्शवली जात आहे. शहरातील साफसफाईसाठी महापालिकेसोबत करारनामा करताना वॉटरग्रेस कंपनीने परस्पर दुसर्‍या व्यक्ती अथवा संस्थेसोबत करारनामा करू नये, असे अटी व शर्तीत नमूद आहे. असे असतानाही वॉटरग्रेस कंपनीने परस्पर साई मार्केटींग सोबत करारनामा करत पोट ठेका दिला असल्याचे उघडकीस आले आहे. वॉटरग्रेसने पोट ठेकेदार…

Read More